राममंदिर लढ्यातील अदृश्य सेनापती - पी व्ही नरसिंह राव
प्रभू श्रीराम अयोध्येत त्यांच्या जन्मस्थानी विराजमान होत आहेत, आणि हा सोहळा सगळं जग पाहणार आहे.गेली पाचशे वर्षे हिंदू समाजाला यासाठी अगदी जीवघेणा संघर्ष आणि प्रतिक्षा करावी लागली,लक्षावधींना प्राण अर्पण करावे लागले.यातीलच एक कॉंग्रेस नेता न बोलता पक्षाच्या प्रतिमेला तडा न जाऊ देता मुकपणे बाबरी मस्जिद ला कोसळत असताना पडदयाआडुन सुत्रे चालवत होता त्या रामभक्ताचे नाव होते पामुलपुर्ती व्यकंट नरसिंहराव.
१९९२ मध्ये केंद्रात कॉंग्रेसचे पी. व्ही.नरसिंहराव यांचे सरकार होते.त्यावेळी रामजन्मभूमी वाद गाजत होता.अशातच एक माहिती सरकारला समजली की, जयपुर राजघराण्यातील सिटी पॅलेस संग्रहालयात ४०० वर्षापूर्वीचा अयोध्या येथील रामजन्मभूमीचा नकाशा आहे. जो त्यांच्याकडे एका साधुने दिला होता.या नकाशात असे स्पष्ट दर्शविण्यात आले होते की, तेथे ४०० वर्षापुर्वी मस्जिद नसुन राममंदिर होते.आणि हा मोठा पुरावा मानला जात होता.महाराजा भवानीसिंह यांची मुलगी दियासिंग यांनी सांगितले की, ते रामपुत्र कुश यांचे ३०७ वे वंशज आहेत. त्यांनी तसा पुरावा देखील सादर केला.
यावेळी सरकारने जयपुर राजघराण्यावर दबाव टाकून हा नकाशा मिळवला.तोपर्यन्त अयोध्या मध्ये कारसेवा चालली होती.न्यायालयात वादविवाद चालुच होता.पण संथगतीने चालणारया न्यायप्रकियेमुळे रामभक्त कंटाळले होते.आणि तो दिवस उजाडला. मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी शालिवाहन शक १९१४ म्हणजे विक्रम संवत्सर २०४९ चा तो महान दिवस (६ डिसेंबर १९९२) जगाच्या इतिहासात अहिंसक रक्तविहीन क्रांती म्हणून गणल्या गेला. शतका शतकांच्या गुलामीवर प्रहार करणाऱ्या रामभक्त करसेवकांचे ते शौर्य नाकारणे शक्यच नाही... पण ती क्रांती रक्तविहीन होण्यासाठी कॉंग्रेसचा एक रामभक्त पडद्याआडून हालचाल करत होता, ज्याचे 'ते' नियोजन जगानेच नव्हे तर सळसळत्या रक्ताच्या रामभक्तांनीही लक्षात घेतले नाही. कारण मंचावर चाललेल्या हालचाली प्रत्यक्ष दिसत होत्या, पण मंचाआडचे त्याचे खरे नियोजन अगदी बुलेटप्रूफ होते.देवभूमी, पुण्यभूमी भारताला जवळपास बाराशे वर्षांचा काळ अत्यंत प्रतिकूलतेत काढावा लागला.अधर्मी, असंस्कृत रानटी टोळ्यांनी आमचे, आमच्या मातृशक्तिचे, संपत्तीचे अक्षरशः लचके तोडून इथे जणू स्मशान करून टाकलं.उध्वस्त झालेली हजारो देवालये, भस्मसात झालेली भव्यदिव्य ग्रंथालये, भग्नावस्थेत गतकालाच्या सांस्कृतिक श्रीमंतीच्या खुणा अंगावर वागवणारे जीर्णशीर्ण राजप्रासाद,वास्तू, आणि हे सारे भयग्रस्त होवून भकास चेहऱ्याने ज्यांना पहावे लागले,सोसावे लागले, असे आमचे दुर्दैवी पूर्वज! आणि ती वेळ आली होती. कित्येक शतकाचा डाग पुसुन काढायचा होता.
बुलेटप्रूफ योजना
बुलेटप्रूफ योजना म्हणण्याचे कारण म्हणजे ३० आक्टोबर व २ नोव्हेंबर १९९० ला अयोध्येत करसेवेसाठी जमलेल्या रामभक्तांवर मुलायमसिंह यादव यांच्या पोलीसांद्वारा तुफान गोळीबार केला गेला होता. हे क्रौर्य जगासमोर येऊ नये म्हणून रामभक्तांचे निष्प्राण देह शरयू नदीत फेकण्यात आले होते. याकाळात केंद्रात भाजपाच्या पाठिंब्यावर विश्वनाथ प्रताप सिंह (व्ही पी सिंग) हे पंतप्रधान होते.
६ डिसेंबरलाही इतिहासाची ही पुनरावृत्ती सहजच शक्य होती. कारण आपल्या देशात ' सेक्युलर' या नावाखाली हिंदूंचे दमन करण्याला पुर्ण मोकळिक आहे. मात्र अहिन्दूंच्या भावना दुखावल्या जाणे, हे अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालना विरुद्ध अजामीनपात्र ठरते.
सेक्युलर व्ही पी सिंग च्या अगदी विरुद्ध त्यांचे नाव व कर्तृत्व होते. पी व्ही नरसिंह राव.... पक्ष काँग्रेस.सत्ता असो वा नसो, नरसिंह रावांच्या दैनंदिन जीवनात कधीच फरक पडला नाही. त्यांना ना कसले व्यसन होते, ना हौस होती. पंतप्रधानपदी आल्यानंतरही त्यांच्यात काही फरक पडला नाही. त्यांनी कधी जमीन सोडली नाही की कधी वैभवाचा उपभोग घेतला नाही. अगदी साधे, सरळ असे त्यांचे जीवन होते. पद मिळाले म्हणून त्यांना कधी फार आनंद झाला नाही आणि सत्ता गेली म्हणून ते कधी कष्टी झाले नाहीत.
जवाहरलाल नेहरू, इंदिरा व राजीव गांधींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे ते पंतप्रधान होते. त्यामुळे सेक्युलर बनून आपले पंतप्रधान पदाचे आसन बळकट करायला ६ डिसेंबरला अयोध्येत होणारी करसेवा होऊच नये, अशी मुलायमसिंह व विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या सारखी योजना ते करू शकले असते. त्यावेळी सोनिया गांधीं यांनी राजकारणात प्रवेश केला नव्हता ही जमेची बाजु होती.
६ डिसेंबर १९९२ वार रविवार रोजी अयोध्येत मोठ्या प्रमाणावर रामभक्त जमल्यावर काय होऊ शकते, याची त्यांना कल्पना होती. गुप्तचर यंत्रणांनीही त्यांना ही पुर्वकल्पना दिलेली होती.पण ते राव होते.... नरसिंह होते. त्यामुळे भारतीय शौर्य परंपरेवरील तो काळा डाग मिटायला हवा, हे त्यांनाही वाटत होते. नरसिंह या नावातच खंबा तोडण्याची खुमखुमी दडलेली आहे. पुर्वी एका विष्णूभक्त प्रल्हादाच्या भक्तीस्तव त्यांनी एक खंबा मोडला होता.... आता भारतीय अस्मितेला हिणवणाऱ्या अनेक खांबांना त्यांना मोडायचे होते. पुर्वी हिरण्यकश्यपू राजा होता. आता नरसिंहच राजा होता. लाखो विष्णूभक्त प्रल्हाद जमले असतांना शस्त्रधारी हिरण्यकश्यपूंना मोकळे सोडणे योग्य नाही, हे त्याने ओळखले होते. अभी नहीं तो कभी नही! अशा एका विशिष्ट वळणावर रामजन्मभूमी आंदोलन आलेले होते. अवध असे नाव असलेल्या अयोध्येने आजवर अनेक रक्तरंजित लढाया बघितल्या होत्या, पण या संघर्षाला अहिंसक पुर्णविराम या नरसिंह राव ला द्यायचा होता.
दोन करसेवा रक्ताने डागाळल्या गेल्या होत्या. तिसरीचेही नेमके काय होईल, हे माहित नव्हते. रामजन्मभूमीवरील गुलामीचे ते प्रतिक पडले तेंव्हा अनेक राष्ट्रवाद्यांचे सेक्युलर चेहरे पांढरे पडले होते. कारण त्यांचे लोक शिस्तबद्ध आहेत, व आपल्या आज्ञेबाहेर नाहीत, हेच त्यांना माहीत होते. एक आखीव रेखीव करसेवा होणार होती ती!
पण आलेला सर्वच समुह शिस्तित कवायत करणारा नसेल हे पी व्ही नरसिंहरावांनी ओळखले होते. कुठेतरी उद्रेक होणार, हे ही त्यांनी ओळखले होते.
६ डिसेंबरचे सर्व श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंहांना दिले जाते. पण रावांच्या मनात आले असते तर, ५ डिसेंबर पुर्वीही कल्याणसिंग सरकार बरखास्त करता येऊ शकत होते. राष्ट्रपती राजवट लावून काँग्रेसी दमनचक्र चालवणे सहजशक्य होते.
पण तेंव्हा राव, नरसिंह होते. जुने मोडल्या शिवाय नव्याची मुहुर्तमेढ शक्य नाही हे त्यांना माहीत होते. त्यामुळे कुजक्या सेक्युलरिजम बाहेर येत रामराज्याची स्थापना करणारी मुहुर्ताची कुदळ आपल्याच नियोजनात घडावी, हे त्यांनाही वाटत होते. पांडवांच्या पक्षात येऊन मिळणाऱ्या विकर्णाचे भाग्य त्यांना लाभणार नव्हते. पण कौरवांच्या कारवाया रोखण्याचे भाग्य त्यांनी आपल्या माथी लिहून घेतले होते. पुढे अनेक शल्य आपली निर्भत्सना करतील, हे ही त्यांना माहीत होते. प्रत्यक्ष दिसणाऱ्या घटनाच आकलीत होत इतिहास बनतात. त्यामुळे पडद्यामागील खरा नियोजनकार इतिहासाला अज्ञातच असतो. पण भविष्यकाळ याच अज्ञात नियोजनकाराचा ऋणी असतो, हे ही त्या रावाला माहित होते. त्यामुळे गुप्तचर यंत्रणेला विशिष्ट सुचना करत हा रणनितीकार मनाने त्या हज्जारो कारसेवकांमध्ये पहिलेच मिसळला होता, त्यांच्या हात एक मुठभर वाळू होती पण ह्रदयात पाचशे वर्षांची गुलामगिरी झुगारण्याची खुमखुमी होती.
योजना तडीस
या रावाच्या गुप्त नियोजनानुसारच पहिल्या करसेवकाने गुलामीच्या ढांच्याकडे धाव घेतली, तेंव्हा तेथील पोलीसांनी हतबलतेची भुमिका घेतली. यामुळे दुसऱ्या, तिसऱ्या, .... शेकडो जणांनी त्या गुलामीच्या प्रतिकाकडे धाव घेतली....दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटे झाली आणि शतकानुशतके हिंदूंनी ज्यासाठी प्राणपणाने संघर्ष केला, ती घटना घडली! बाबरीच्या तीनपैकी पहिला घुमट कोसळला. चार वाजता दुसरा घुमट खाली आला. शेकडो वर्षांच्या सांस्कृतिक गुलामगिरीचे एकेक अवशेष कारसेवकांकडून उद्ध्वस्त केले जात होते. हे होत असताना अनेक कारसेवक जखमी झाले. त्यांना उचलून बाजूला केले जाऊन पुढची तुकडी त्यांची जागा घेत होती. काम बंद होऊ नये, याची खबरदारी घेतली जात होती. सर्वत्र जल्लोष आणि घोषणा सुरू होत्या. बरोबर साडेचार वाजता मधला घुमट कोसळला आणि लाखो कारसेवक आनंदाने नाचू लागले. रामनामाचा जल्लोष आता टिपेला पोहोचला होता.
इकडे पंतप्रधान निवासस्थानी दिवसभर हाॅटलाईनचा फोन खणखणत होता. शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते, हे रावांचे एकनिष्ठ मित्र. पण एखाद्या योग्याने शरीरातील साऱ्या नाड्यांचा संकोच करावा, त्याप्रमाणे प्रशासनातील सर्वनाड्यांचा संकोच या जोडगोळीने आपल्या हातात करून ठेवला होता. त्यामुळे कणा कणाने पडणारा तो ढांचा ढेकळा ढेकळांनी उध्वस्त होऊ लागला....
पहिला ढांचा पडल्याची गुप्तचर सुचना आली तेंव्हा हा नरसिंहराव विराटपुरुषाचे वर्णन करणारे पुरुषसुक्त म्हणत विष्णूच्या अभिषेकाला बसले होते.... कारण हाॅटलाईन उचलल्या गेली असती तर प्रशासन सक्रीय झाले असते. याला तर इडा पिंगला व मध्यमेला आणखी काही काळ रोकून ठेवायचे होते. कुंभकाच्या शक्तीने एक एक चक्र चढत एक एक रामभक्ताला ढांच्यावर चढवायचे होते. आता रामभक्तांचे उर्ध्वगमन करवतच ढांच्याचे अधःपतन होणार आहे, हे या राजयोग्याने ओळखले होते. त्याचे आज्ञाचक्र आता पूर्ण सक्रिय होते. रामभक्तांना राष्ट्राच्या सहस्त्रार चक्रापर्यंत पोहचवून सहस्त्रकातून होणारी सांस्कृतिक अमृतवर्षा घडवायची होती. भारतीय विजिगिषा स्वाभिमानाच्या कण्यातून सळसळत ढांच्याकडे झेपावत होती. नरसिंहराव नामक या राजयोग्याने आपल्या आजवरच्या कॉन्ग्रेस पक्षीय मनोवृत्तीचा पुर्ण संकोच केला होता. आता ते स्वतःच एक विराट समाजपुरुष बनले होते. राष्ट्रमंदिराच्या उभारणीसाठी जन्मभुमीवर राम मंदीर बनणे आवश्यक आहे व राम मंदीर उभवायला ढांचा पडणे गरजेचे आहे, येवढेच त्याला माहीत होते.
राष्ट्रीय पुनर्निर्माण यज्ञात एका एका ढेकळाची आहूती पडत होती. सुर्यास्तापुर्वी हा यज्ञ आटोपणे गरजेचे होते. त्यामुळे विराटपुरुषाची आळवणी करत शालिग्रामरुपी विष्णूला साकडे घालत अभिषेक सुरू होता.नरसिंहराव विचारमग्न होते, अभिषेकाच्या पाण्याने ताम्हण भरत होते व राष्ट्रीय स्वाभिमानाच्या तपाचे ते पवित्र तिर्थ गंगा यमुनादी सप्तसरिता बनून ओसंडून वाहत होते. सायंकाळ अगदी टप्प्यातच आली होती व गुप्तचर संदेश आला.... दुसरा गुंबद धराशायी झाला.... विराट पुरुषाची उपासना करणारा तो रावच विराट पुरुष झाला होता.... राष्ट्राय स्वाहा, इदं नमम्... हे शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडले. आता तिसऱ्या गुंबदाच्या पुर्णाहुतीकडे त्याचे लक्ष लागले होते.... मुखातून पुरुषसुक्त सुरू असतांना मनातून ओजाची निर्मिती करणाऱ्या मन्युसुक्ताचे आवर्तनही सुरु होते. हे ओज सततच्या प्रहारांनी थकू बघणाऱ्या रामभक्तांना आणखी उत्साहित बनवत होते...
दांडपट्टा फिरवतांना विदिर्ण देहाच्या बाजीप्रभूंचे लक्ष जसे तोफेच्या धऽडाऽल धूऽम आवाजाकडे लागले होते, तसेच या नरसिंहा चे कान तिसऱ्या गुंबदाच्या धराशायी होण्याच्या धऽडाऽल धुऽम आवाजाकडे लागले होते.मित्र शंकररावांनी आपले नेत्र झाकुन घेतले होते.
इकडे सुर्य मावळतीला चालला होता. मन्युसुक्ताची आळवणी व अभिषेकाचा वेग वाढला होता.... गुप्तचर संदेश आला... तिसरा गुंबदही धराशायी झाला.... सायंकाळ होता होता सहस्रकातील गुलामीला झुगारणारा एक दीपस्तंभ तेजाळला होता. त्याच्या दीप्तीने दहाही दिशा उजळल्या होत्या. एक रक्तविहीन क्रांती घडली होती. कलशातील सारेच पाणी ताम्हणातील शालिग्रामरुपी विष्णूवर अर्पण करत ते वदले.... अमृताभिषेकोस्तु, सुवर्णाभिषेकोस्तु, शांतिपुष्टितुष्टिचास्तु..
या सांस्कृतिक यज्ञाच्या श्रेयाची त्यांना याचना नव्हती. राष्ट्राय स्वाहाः इदं न मम हे ते पुर्वीच उच्चारले होते.
नरसिंहराव आसनावरून उठले. हाॅटलाईनवर गृहमंत्री शंकरराव चव्हाण एकदमच हाॅट होते. परवलीचा शब्द उच्चारला गेला. हाॅटलाईनवर खुशीची बात होत होती, इस्पित साध्य झाले होते.लगेच मुख्यमंत्री कल्याणसिंहांशी संपर्क साधला... म्हणालेत, राजिनामा द्या, एरवी सरकार बरखास्त करावे लागेल....कारण आता परत कॉन्ग्रेसचा सेक्युलर बुरखा पांघरायचा होता.इतर कॉन्ग्रेसजन या जोडगोळीवर तुटुन पडणार होते.
राव शंकरराव चव्हाणांना म्हणाले, "जे घडायचे होते ते घडून गेले, आता गृहमंत्री म्हणून शांतता प्रस्थापित करायचे प्रयत्न सुरू करायला पाहिजे..."एका गुमनाम नियोजनकाराने राम मंदीर निर्मितीतील अडथळा दूर केला होता. त्याच्या नियोजनामुळेच राम मंदीरात रामाची स्थापना करणे सुलभ झाले.सत्याच्या रक्षणासाठी सामर्थ्य लागते.ते जनसत्तेच्या, अर्थसत्तेच्या,बाहूबलाच्या, राजसत्तेच्या आणि आत्मबलाच्या स्वरूपात प्रकट झाले,कि सत्य प्रतिष्ठीत होते.
दिवंगत पत्रकार कुलदीप नय्यर यांनी त्यांच्या ‘बियॉन्ड द लाइन्स’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकात याबद्दल तपशीलवार लिहिले आहे. त्यांनी लिहिले, “समाजवादी नेते मधु लिमये यांनी मला सांगितले की या पूजेदरम्यान राव यांच्या एका सहकाऱ्याने त्यांच्या कानात कुजबुज केली की मशीद नष्ट झाली आहे, तेव्हा काही सेकंदात पूजा पूर्ण करून राव उठले. मशीद पाडल्याच्या वेळी ते तासन्तास उपासनेत बसून राहिले होते. किंबहुना मला त्रास देऊ नका अशा सूचनाही त्यांनी दिल्या होत्या.
नरसिंह राव यांचे मीडिया सल्लागार असलेले के प्रसाद यांनीही एक पुस्तक लिहिले होते, ज्यात असे म्हटले होते की, 'मशीद पाडल्यानंतर निखिल चक्रवर्ती, प्रभास जोशी आणि आरके मिश्रा या तीन पत्रकारांनी राव यांना माझ्या उपस्थितीत ६ तारखेला असे का घडले, असा प्रश्न विचारला होता. तेव्हा राव म्हणाले, मला राजकारण कळत नाही असे तुम्हाला वाटते का?
माखनलाल फोतेदार यांनी राव यांच्याशी झालेल्या संभाषणाचा प्रसंग त्यांच्या ‘द चिनार लीव्हज’ या आत्मचरित्रात लिहिला आहे. फोतेदार यांच्या म्हणण्यानुसार, 'मी राव यांना फैजाबादमध्ये तैनात असलेल्या चेतक हेलिकॉप्टरमधून कारसेवकांना काढून टाकण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्याची विनंती केली. राव म्हणाले, ‘मी हे कसे करू शकतो?’ मग मी विनंती केली, ‘रावसाहेब, कृपया एक घुमट वाचवा. जेणेकरून नंतर आम्ही भारतातील लोकांना सांगू शकू की आम्ही मशीद वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मग गप्प बसल्यावर राव म्हणाले, मी तुम्हाला पुन्हा फोन करतो.
राम मंदिराच्या निर्माण प्रक्रीयेतील एक मुख्य आधारशिला पी व्ही नरसिंहराव ठरले.. ते २१ जून १९९१ ते १६ मे ११९६ या काळात पंतप्रधान होते. पंतप्रधान पदावरून बाजूला झाल्यावर ते एकदमच लोकजीवनातून गुडूप झालेत.चंद्रास्वामी यांच्यासारख्या तांत्रिकाच्या आहारी गेल्याचे आरोपही झाले.काही घटनांनी त्यांच्या कारकिर्दीला काहीसे कलंकित केले. मात्र, तरीही आर्थिक उदारीकरणाचे शिल्पकार म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका अनन्यसाधारण महत्त्वाची आहे.
राममंदिर बांधणे का आवश्यक आहे
ज्यावेळी बाबरच्या वतीने मिरबांका मंदिर उद्धवस्थ करण्यासाठी आलेला तेव्हा केवळ मंदिर वाचवण्यासाठी पुजारी देवीदिन पंडिताच्या नेतृत्वाखाली ज्या हिंदूंनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या हिंदूंसाठी मंदिर बांधणे गरजेचे आहे.
बाबरने ज्या १,७४,००० हिंदूंची कत्तल केली त्या हिंदूंसाठी मंदिर बांधणे गरचेचे आहे.
ज्यासाठी ५०० वर्ष हिंदूंनी लढा दिला त्या लढ्यासाठी मंदिर बांधणे गरजेचे आहे.
१९४९ मध्ये जेव्हा नेहरूंनी बाबरी मस्जिदमधून रामाची मूर्ती काढून टाकण्याचेआदेश दिले तेव्हा त्या आदेशांना झुगारून टाकणाऱ्या त्याकाळी अयोध्येच्या सिटी मॅजिस्ट्रेट KKK नायरांसाठी मंदिर बांधणे गरजेचे आहे.
∽∽∽∽∽∽
फोटो : १९९२ मध्ये मुरली मनोहर जोशी मंडपात (टेंटमध्ये) रामलल्लाचे दर्शन घेत आहेत.त्यांच्यासोबत उभ्या असलेल्या व्यक्तीचे नाव प्रसिद्ध करण्यात आले नाही कारण त्यावेळी पत्रकारांना आणि भारतातील जनतेला हे माहित नव्हते की, हया व्यक्तीच्या नेतृत्वात राम मंदिर बनणार आहे..22 जानेवारी 2024 रोजी प्राण प्रतिष्ठे वेळी यजमान म्हणून गर्भगृहात उपस्थित असणार आहेत..