रेल्वे फलाटवर खुणा केलेल्या फरशा का असतात?
facebook https://parg.co/UN0H
आपण रेल्वेने प्रवासाकरिता स्टेशनवर जातो त्यावेळी कडेला किंवा मधोमध मार्गावर जी फरशी बसवलेली असते. कधी बारकाईने पाहिले तर रेल्वे फलाटवर विशिष्ट प्रकारच्या खुणा असलेल्या फरशा दिसतात, का असतात त्या फरशा? काय कारण आहे?
रेल्वे फलाटावर, फलाटाच्या कडेने किंवा मार्गावर असलेली रांगोळीच्या ठिपक्यांसारखी एक पट्टी दिसते. पहा सोबतचा फोटो. ही पट्टी म्हणजे नेत्रहीन व्यक्तींसाठी चालण्यासाठी मार्गिका असते. आपण सवयी नुसार कुठे ही उभे राहतो, अगदी ह्या पट्टी वर देखील. ज्यामुळे नकळत त्यांचा मार्ग अडवत असतो.हे आपणास समजुन येत नाही, म्हणुन या मार्गिकेवर ऊभे राहु नका. ही माहिती लोकांना पोहचवुन त्यांचा मार्ग मोकळा ठेवण्यात मदत करा. मला सुद्धा एका अशाच व्यक्ती कडून हे समजले.ही फरशी म्हणजे नेत्रहिन लोकाकरिता आधार आहे. ती फरशिची मार्गिका अंध लोकांना दिशादर्शकीचे काम करते.
खुणा केलेल्या फरशा
या फरशा दिसायला व स्पर्शाला आोबडधेबड, खडबडीत असतात कारण या फरशा अंध व्यक्ती त्यावर असलेल्या विशिष्ट खुणाने आोळखतात व त्या आधारे ती अंध व्यक्ती आपली मार्गक्रमना करत जाते.अंधव्यक्तींच्या मूलभूत गरजांकडे समाजाचे एक नागरिक म्हणून दुर्लक्ष करणे आणि त्यांना आपल्यासारखेच एक सामान्यव्यक्ती म्हणून समाजाने न स्वीकारणे हे फक्त भारतातच नव्हे तर अगदी जगात दिसून येते. त्यांच्या शारीरिक हालचाली एकदम मंद असतात.म्हणुन कधीही रेल्वे फलाटावर ऊभे राहु नका.