अन्य देशातील गणपती

  अन्य देशातील गणपती

ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ एलिस यांनी एक पुस्तक १९३६ मध्ये प्रसिद्ध केले आहे. त्या पुस्तकात तिने विविध देशातील गणपतीचा शोध घेतला आहे. भारतामध्ये गणपतीला सिद्धी विनायक, गजानन, गणेश, गणपती, लंबोदर, वक्रतुंड अशा अनेक नावाने ओळखले जाते. तामिळ भाषेत पिल्लयर, म्यानमारमध्ये महापिएन, जपानी भाषेत कांगीतेन, विनायक, शोदेन, चीनमध्ये कुआन-शी-तिएन, मंगोलियामध्ये बातरलारूमरवागान, तर कंबोडीयामध्ये केनेस नावाने ओळखले जाते.

अन्य देशातील गणपती

इराण -हत्तीच्या चेहेरा असणारा आणि मनुष्य देह असलेली मूर्ती लुरीस्तान,पश्चिम इराण मध्ये सापडली,ही पहिली मूर्ती आहे असे मानतात...

अफगाणिस्तान- १२०० ख्रिस्त पूर्व मध्ये इथे एक संगमरविरी मूर्ती सापडली आहे,त्यात गणपती एक लढवय्या स्वरुपात आहे.अश्या खूप मूर्ती तिथे होत्या पण त्या नष्ट करण्यात आल्या आहेत,कुणी केल्या असतील हे सांगायला नको. 

कांबोडिया इथे गणपती ला "प्रहागणपती" म्हणतात..

कंबोडिया - या देशात  अंकुर वटाला अंगोरवार या नावाने ओळखले जाते. कांबोडिया इथे गणपती ला "प्रहागणपती" म्हणतात.. हे स्थापत्य कला क्षेत्र जगप्रसिद्ध आहे. भारतीय संस्कृतीचा प्रभाव या  देशांवर पडलेला आहे. येथे  गणपतीची स्थापना केली जाते. येथील गणपतीचे रूप आणि आकार वेगळा आहे. कंबोडियात गणपतीची कांस्यमूर्ती मिळते.गणेशाला ‘प्रह कनेस’. केनेस असेही म्हटले जाते. तो तुंदिलतनू दाखविलेला नाही. उजवा पाय डाव्या पायावर ठेवून मांडी घातलेली आहे. येथे मूर्तींना दोनच भुजा असून हात गुडघ्यांवर ठेवलेले व हातांत भिन्न भिन्न वस्तू धारण केलेल्या आहेत. अंग पुढे झुकल्यासारखे आहे. सोंड अगदी सरळ लोंबत असून अगदी शेवटी वाकलेली आहे. 

जपान - या देशात कांगीतेन, शोदेन आणि विनायक ,विनायाकश्र" या नावाने गणेशाचा उल्लेख केला जातो. 'कांगीतेन' म्हणजे भाग्याची देवता आणि 'शोदेन' म्हणजे प्रथम देवता! 

 ग्रीक देशात गणपतीला वेगळा देव म्हणून पूजतात,त्याचे नाव आहे "जानुस" त्याला मनुष्य देह आणि हत्ती चे तोंड असते.

Mexico मध्ये ही असाच देव पुजला जातो.

जावा मध्ये त्याला "कालांतक" ह्या नावाने ओळखतात.

बाली  -  या देशामध्ये जमबरन येथे गणपती सिंहासनावर बसलेला आहे. त्याच्या हातात मशाल आणि सिंहासनाच्या चारही बाजूने अग्निशिखा आहे. इतर ठिकाणी गणपतीची उभी मूर्ती दिसून येते. या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे जसे भारतीय पुराणात जानवाच्या जागी साप गुंडाळल्याचा उल्लेख मिळतो तसाच उल्लेख येथे मिळतो हे विशेष.

हे पण वाचा : पिता असुनही ब्रम्हचारी हनुमान

Video : आफ्रिका मधील गणेशोत्सव

सौजन्य: times now navbharat


https://m.facebook.com/story.php?story_fbid=228350487562882&id=100011637976439

----------------------------------------------

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম