तरूणांचे प्रेरणास्थान,एक आधारवड, लोकप्रिय आमदार विनय कोरे

 

तरूणांचे प्रेरणास्थान,एक आधारवड, लोकप्रिय आमदार विनय कोरे 

ज्या पायांना ऊन, वारा, पाऊस, पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते अशी पावले शेवटपर्यंत थकत नाहीत. गेल्या चार दशकांपासून वारणा आणि कोरे कुटुंबिय एक समीकरण झाले आहे. वारणा खोरयातील माणूस राज्यात कुठेही गेला आणि सांगितले की मी वारणेचा आहे तर समोरील जाणकार मनूष्य विनय कोरेंच्या वारणा गावचा का? असे लगेच म्हणतो.
गोरगरिबांचा भक्कम आधारवड… क्षितिजाला कवेत घेणारा लोकप्रिय क्रियाशिल आ.विनय कोरे यांनी विकासाच्या रंगांनी ज्यांनी सर्वसामान्य जनतेचं अंगण सजवलं, गोरगरिबांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं अशा आपल्या मनातील… मातीतील.. सर्वसामान्यां नेता… अडीअडचणीच्या,दुःखद प्रसंगांमध्ये अर्ध्या रात्री धावून येणारा वाघाच्या काळजाचा पाठीराखा…लोकांच्या गळ्यातील ताईत म्हणजे आमदार विनयराव कोरे.
मातीशी नातं जोडणारा आणि माणुसकी जपणारा हा नेता आपल्या कौशल्याने कार्यकर्तृत्वाने यशाची शिखरे पादाक्रांत करत आहे. आपल्या सत्कार्याच्या माध्यमातून ज्यांनी सभोवतालच्या जीवनात सातत्याने आनंददायी उत्साहाची पेरणी केली आणि येणाऱ्या पिढीला दिशा दिली. ज्यांनी इतरांच्या दुःखात कधी मदतीचा हात दिला तर कधी पाठीवर सहानुभूतीची थाप दिली अशा समाजमान्य लोकनेते तात्यासाहेब कोरे यांच्या तालमीत वाढलेले, घडलेले आमदार विनयराव कोरे आहेत.
तरूणांचे प्रेरणास्थान,एक आधारवड, लोकप्रिय आमदार विनय कोरे

रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो.आपल्या शाहुवाडी मतदार संघात कोरोना हातपाय पसरत होता.तेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून जनतेसमोर जाऊन सार्‍यांना विश्वासात घेण्याची जबाबदारी ओळखत आ. विनय कोरे यांनी मदतकार्याचा धडाका लावला. कोरोनाच्या भीतीने भलेभले घरी बसले. या काळात कोरोनामुळे रंजलेल्या गांजलेल्यांची दिवसरात्र सेवा करण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आ.विनय कोरे यांनी मेहनत आणि समाजनिष्ठेची पराकाष्ठा केली. त्यांनी गरजूंच्या मदतीसाठी कधीही राजकारण केले नाही.समिती या माध्यमातून  कार्यरत आहेत.ग्रामीण भागातील राजकारण हे सहकाराच्या पायावर उभे असते. व सहकाराची वीण आम. विनय कोरे यांनी भक्कमपणे बांधून कार्यकर्त्यांचे कुशल संघटन केले.गेल्या तीस वर्षांपासून वारणा साखर कारखाना, वारणा दुध संघ यावर त्यांचे वर्चस्व आहे. महाराष्ट्रात नव्हे तर देशात वारणेचा नावलौकिक विनय कोरे यांनी मिळवून दिला.स्वच्छ कारभार,भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेला नेता म्हणून आ.कोरे यांचे नाव घेतले जाते.श्री .वारणा सहकारी उद्योग व शिक्षण समूहाच्या माध्यमातून दरवर्षी भव्य रक्तदान शिबिर, गणेशोत्सव, नवरात्री च्या मोठ्या देखाव्यांचे आयोजन व ह्या माध्यमातून धार्मिक,अध्यात्मिक उत्सव राबवणे यातून कायम जनतेच्या संपर्कात ते राहतात.जनतेशी नाळ अशा विविध माध्यमातून ते जोपासत आहेत.नेहमी सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी ते ऊभे असतात. सामान्य कार्यकर्त्यांचा नेहमीच आदर करून विविध प्रसंगी जो मानसन्मान दिला जातो,विचारपूस केली जाते ह्या जवळीकतेच्या भूमिकेमुळे जनमाणसाची निष्ठा वृद्धिंगत होत गेलेली आहे.अत्यंत कार्यक्षमपणे मतदारसंघातील कामे करणे ह्यामुळे जनतेच्या मनात आम विनय कोरे अत्यंत आदराचे स्थान मिळवुन राहिलेले आहेत.विविध प्रसंगी ते मदतीचा हात पुढे करतात.समाजहिताची अनेक कामे स्वखर्चातून करतात.
आपल्या कार्याने त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले जांबुर येथील केशव डिगे हे त्यापेकीच एक. सर्व जाती,धर्माना सोबत घेऊन सर्व समाजास नेतृत्वाची संधी आम विनय कोरे यांनी दिली आहे. श्री केशव डिगे यांनी सांगितले की सर्वांना समान न्याय देण्याची आम विनय कोरे यांची भूमिका आहे.
आज ह्या वाढदिवसप्रसंगी आदरणीय आम विनय कोरे यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

अनिल पाटील पेठवडगाव, 9890875498 



थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম