घुगरया

  घुगरया 

फार दिवसानी परवा गावी गेलो होतो तेथे एक आज्जी भेटली. मी म्हटले,काय आजी बरी हायसं नव्हं! मला वाटलं कोरोनाने गेली असशील. तर आज्जी म्हटली,अशी कशी जाईन अडुन तुझ्या लेकाच्या "घुगरया" खाणार आहे मी.

घुगरया
माझे पण मन भुतकाळात गेले,लहानपणी आम्ही पण खुप जणांच्या घुगरया खाल्या. कोणाचंपण बारसं असुदे आईचा पदर धरून मी बारशाला जात असे.मुलाचं नाव ठेवण्यासाठी बायका जमलेल्या असतं. मुलाच्या कानात कुर sssकरsss करून नाव ठेवण्याचा बारसं कार्यक्रम होत असे.कोणी हौशी बाई पाळणागीत म्हणे.कुणी गोविंद घ्या,कुणी गोपाळ घ्या.म्हणत ठराविक नावावर शिक्कामोर्तब होई.मग घुगरया वाटपाचा कार्यक्रम होई.

आरोग्यवर्धक घुगरया

पोटाच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेली पोषक द्रव्ये, प्रथिने आणि फायबर हे उत्तम आरोग्याचे तीन आधारस्तंभ या घुगरया मध्ये आहेत. "घुगरया" म्हणजे, पाच कडधान्ये (हरभरा,जोंधळा,वाटाणे,शेंगदाणे,गहु) भिजवुन त्याला उकडतात.,त्यात मीठ घातले की,हा जिन्नस खाण्यासाठी तयार होत असे. त्याची खारट गोड उकडी चव पाचीपक्वानाना मागे सरत असे. आम्ही लहान मुले तर मागुन मागुन खात असु. त्याकाळी चीप्स,वेफर्सची जीभेला चटक लागली नव्हती.दुकानात गोळ्या,बिस्किटे,फुटाणे,चिरमुरे या पलीकडे मुलासाठी खाना फारसा नसे.आणी कोणी पाच पैसे पण देत नसे. यामुळे घुगरया म्हणजे आम्हा लहान मुलांना मेजवानी वाटे.नविन घराची पायाभरणी असो वा वास्तुशांती असो,शेतातील सुगीचा कार्यक्रम असो,देव बसवण्याचा अगर देव-देवीचा कोणताही कार्यक्रम असो तेथे "घुगरया" ठरलेल्या असत.प्रत्येकाला मुठमुठभर घुगरया देत असत.आणी प्रत्येकजण ते आवडीने खातही असे.आतापण काही देवाधर्माच्या कार्यक्रमात घुगरया करतात.पण हल्लीची मुले ते खातही नाहीत.हल्लीच्या मुलाना चटकमटक (घातक अजिनोमोटो असलेले) वेफर्स,कुरकरे खायची चटक लागलेली असल्याने या पौष्टिक घुगरया कडे बघतही नाहीत.

परवा आमचे घरी धार्मिक कार्यक्रम होता.म्हणुन "घुगरया" केल्या होत्या.(त्याचाच फोटो काढला आहे).म्हणुन दोन वाटी घुगरया केल्या होत्या.कार्यक्रमात लहान मुलेपण जमली होती पण त्यांच्या हातावर घुगरया ठेवल्यावर त्याला ती तोंड न लावता उधळुन टाकत होती.पण मी चांगल्या अोंजळभर घुगरया हातात घेऊन त्याचे एकेक दाणे तोंडात टाकत लहानपणीच्या आठवणीत रमलो होतो.

शब्दांकन:: अनिल पाटील,पेठवडगाव

9890875498

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম