♦️ (क्राईम डायरी). ♦️
⭕कार नं.‘ट्रीपल थ्री’⭕
________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
________________________
कर्ज फेडण्यासाठी व वरकमाई करण्यासाठी काही संशयितांनी वृद्धेचे घरातून अपहरण केले. https://m.facebook.com/story.php?story_fbid=207886202942644&id=100011637976439
तिला कारच्या डिकीत कोंबून कार शहराच्या बाहेर सुसाट निघाली. शहराबाहेर आल्यानंतर कारमधील संशयितांनी डिकी उघडून पाहिली असता, त्यांना धक्काच बसला. तर, दुसरीकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीतून तीन वेळा ‘3’ आकडा असणार्या वाहनाचा शोध घेत मुंबईतून वृद्धेच्या अपहरणकर्त्यांचा शोेध घेतला. संशयितांकडे केलेल्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली. फक्त मालमत्तेचा वाद आणि कर्जापोटी दिलेल्या पैशांसाठी केलेले अपहरण दोन कुटुंबांसाठी घातक ठरले.
दूपारच्या सुमारास शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या इमारतीत कार शिरली. कारमधून तीन व्यक्ती पटापट उतरल्या. काही क्षणातच त्यांनी इमारतीतील एका सदनिकेत प्रवेश केला. सदनिकेत एक वृद्धा झोपलेली होती. तिघांनी मिळून झोपलेल्या चादरीतच गुंडाळून वृद्धेला उचलले आणि पुन्हा कारच्या दिशेने आले. त्यांनी डिकीत चादरीत गुंडाळलेल्या वृद्धेस टाकून कार पुन्हा इमारतीच्या पार्किंगमधून बाहेर काढून शहराबाहेर भरधाव पळवली. शहर सोडल्यानंतर घाटात त्यांनी कार थांबवली. तिघांच्या चेहर्यांवर घाम निथळत होता. तरीदेखील तिघांच्या चेहर्यावर काम फत्ते केल्याचा असुरी आनंद झळकत होता. कारचालकाने घाट परिसरात मोकळा श्वास घेत कारची डिकी उघडली. चादर बाजूला करत त्यांनी वृद्धेला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वृद्धेकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे चालकाच्या पायाखालची माती सरकली. त्याने ही बाब दोघांना सांगताच पुन्हा तिघांच्या चेहर्यावर भीतीचे ढग जमा झाले. वृद्धेचा डिकीतच गुदमरून मृत्यू झाला होता. त्यामुळे तिघांनी वृद्धेचा मृतदेह घाटातच टाकून कार मुंबईच्या दिशेने पळवली.♍
दुसरीकडे, वृद्धेचा मुलगा कुंदन व त्याची पत्नी अंजलीने सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, वृद्धा सापडली नाही. त्यामुळे हतबल होत अंजलीने पोलिस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला. अंजली घाम पुसतच पोलिस ठाण्यात शिरली. ‘साहेब, माझ्या सासूचे तीन संशयितांनी घरातून अपहरण केले आहे, तिचा शोध घ्या,’ असे म्हणतच अंजलीने मदतीची याचना केली. ठाणेदारानेही याची दखल घेत ताबडतोब वरिष्ठांना माहिती कळवली. तातडीने पोलिसांचे पथक अंजलीच्या घरी आले. पोलिसांनी अंजलीसह शेजारच्यांकडे चौकशी केली. त्यावेळी अंजलीने सांगितले की, ती मुलांसोबत बाहेर गेली होती. घरी आल्यानंतर घराचा दरवाजा उघडा असल्याने घरात प्रवेश करून सासूबाईंना शोधले, तर सासूबाई दिसल्या नाहीत. शेजारच्यांकडे विचारपूस केली असता, त्यांनी सांगितले की, आम्हाला सांगता येणार नाही. मात्र, काही युवक चादरीत अवजड सामान घेऊन इमारतीतून बाहेर पडताना दिसले. पोलिसांनी त्यांचा मोर्चा शेजारच्यांकडे वळवला. त्यांनीदेखील हीच माहिती दिली.
त्या युवकांनी चादरीतील सामान एका चारचाकी वाहनाच्या मागील डिकीत टाकल्याचे सांगितले. म्हणून पोलिसांनी आणखीन खोलात शिरून शेजारच्यांकडे गाडीबद्दल, संशयितांबद्दल विचारपूस केली. त्यात वाहनाचा रंग राखाडी होता आणि वाहनाच्या क्रमांकात तीन वेळा 3 हा आकडा असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी ट्रिपल थ्री असलेल्या वाहन क्रमांकाचा शोध सुरू केला. या क्रमांकाशी संबंधित सर्व वाहनक्रमांकाची यादी आल्यानंतर पोलिसांनी शेजारच्यांना आणि अंजलीला कोणता क्रमांक होता ते विचारले. त्यावेळी अंजलीची नजर एका क्रमांकावर वारंवार जात असल्याचे पोलिसांनी हेरले. पोलिसांनी या वाहन क्रमांकांची चौकशी केली असता, ते वाहन मुंबईस्थित विलासचे असल्याचे समजले. पोलिसांनी विलासबद्दल अंजलीकडे विचारपूस केली असता, विलास आपला नातलग असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांना संशय आला.
त्यांनी आणखी चौकशी केली असता, अंजली माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे पोलिसांनी मुंबईत पथक पाठवून विलासला नाशिकला आणले. विलासकडे पोलिसांनी विचारपूस केली असता, घटनेच्या दिवशी त्याचा दिनक्रम सांगण्यात त्याला अडचण आल्याचे पोलिसांनी हेरले. त्यामुळे त्यास पोलिसांनी सखोल प्रश्न विचारले असता, तो ढसाढसा रडला. पोलिसांनी एकमेकांकडे पाहत गुन्हा उलगडत असल्याचा विश्वास व्यक्त केला.♍
विलास अंजलीचा मेव्हणा. व्यापारासाठी विलासने अंजलीचा पती कुंदनला लाखो रुपये उधार दिले होते. या पैशांच्या जोरावर कुंदनने व्यवसायात पकड पकडली. मात्र, कालांतराने मालमत्तेची विभागणी झाल्याने कुंदनसमोर पुन्हा आर्थिक संकट उभे राहिले. त्यामुळे कुंदनने विलासला पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. अखेर विलासने वैतागून अंजलीकडे तगादा लावला. संपत्तीचा वाटा पडल्याने आपल्यालाही कमी संपत्ती मिळाल्याचा राग अंजलीच्या डोक्यात होता. त्यामुळे त्यांनी संगनमत करून सासूचे अपहरण करण्याचा कट रचला. अपहरण करून कुंदनच्या भावाकडे मोठी रक्कम मागून कर्जाची परतफेडही होईल आणि आर्थिक संकट दूर होईल, असे अंजली आणि विलासला वाटले. त्यानुसार दोघांनी मुंबईतीलच दोन युवकांना हाताशी धरत अंजलीच्या सासूचे अपहरण केले. मात्र, चादरीत गुदमरून सासूचा मृत्यू झाल्याने सर्वांचेच धाबे दणाणले होते. पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून विलासच्या कारचा क्रमांक न सुटल्यानेच या गुन्ह्याची उकल करण्यात यश आल♍
Tags
क्राईम डायरी