१२ वीत कमी गुण मिळाले? नो टेन्शन. : हे आहेत तुमच्यासाठी कोर्स

 १२ वीत कमी गुण मिळाले? नो टेन्शन. : हे आहेत तुमच्यासाठी कोर्स 


बारावीचे गुण कमी मिळाले किंवा नापास झाल्यावर मुलांना त्यांच्या पुढील करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यासारखं वाटतं. पण निराश होऊ नका. . तुम्ही बारावीत नापास झाला आहात म्हणजे तुम्ही दहावी पास आहात. आता यापुढे तुम्हाला शिक्षणाच्या दृष्टिकोनातून काय पर्याय आहेत ते पाहू.बारावी नापास झालेने पदवी परीक्षेचा प्रवेश खुंटतो. काही विद्यार्थी परत उमेदीने ऑक्टोबरला पुनर्परीक्षा देतीलच. मात्र त्यातही एक वर्ष फुकट जातंच. तर काही विद्यार्थी मात्र निराश होऊन शिक्षण सोडून देण्याचा विचार करतात. एखादी हलकी नोकरी किंवा एखादा व्यवसाय करण्याचा विचार मुलं करतात. याला कारणंही अनेक असतात. काहींच्या घरची परिस्थिती गरिबीची असते. अशा वेळेस निराश न होता मुलांनी धीर धरून शांतपणे आपल्या पुढच्या भवितव्याचा विचार करायला हवा.
🔹तांत्रिक शिक्षण – आयटीआय
दोन वर्षाचा आयटीआयचा कोर्स करता येतो. आयटीआयची विद्यालयं महाराष्ट्रभर पसरलेली आहेत.
🔹आयटीआयमध्ये काय शिकाल?
आयटीआयमध्ये एक वर्ष, दोन र्वष आणि तीन र्वष अशा प्रकारचे कोस्रेस उपलब्ध असतात.
डिझेल मेकॅनिक, वेल्डर, कार्पेटर, प्लंबर हे कोर्स इंजिनीअरिंग विभागात तर कॉम्प्युटर, टेलिरग, स्टेनो आणि हेअर व स्किन केअर हे कोर्स इतर विभागात उपलब्ध आहेत. हे सर्व एका वर्षाचे अभ्यासक्रम आहेत.
दोन वर्षासाठी, ड्राफ्टमन (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रमेंट्स, इलेक्ट्रिशिअन, फिटर, टर्नर, वायरमन इ. कोस्रेस उपलब्ध आहेत.
तीन वर्षासाठी टूल व डायमेकिंग आणि मशिन टूल, मेंटेनन्स इ. कोस्रेस उपलब्ध आहेत.
🔹नोकरी / व्यवसाय
आयटीआयनंतर शासकीय आस्थापनांमध्ये उदाहरणार्थ रेल्वे, कारखाने, वर्कशॉप्स येथे वर्षभर खूप मोठय़ा प्रमाणात संधी उपलब्ध होतात. मात्र, ब-याचदा विद्यार्थ्यांना त्याची माहितीच नसल्याचं दिसून येतं.
अनेक खासगी कंपन्या, फॅक्टरी, कारखाने यांच्यामध्येसुद्धा आयटीआय मुलांसाठी अनेक संधी राखून ठेवलेल्या असतात.
याव्यतिरिक्त वायरमन, हेअर, स्क्रिन टेक्निशिअन हे स्वयंरोजगारसुद्धा ही मुलं सुरू करू शकतात. ज्याला आज बाजारात प्रचंड मागणी आहे.
🔹 स्टेनो
शासकीय आणि खासगी कंपन्यांना लिपिकांची गरज मोठय़ा प्रमाणात असते. विशेषत: शासकीय नोकरीच्या संधी वर्षभर उपलब्ध होत असतात. काही ठिकाणी बारावीनंतर स्टेनो पद मिळत असले तरी महानगरपालिकेत दहावीनंतरही अर्ज करता येतो. यासाठी एखाद्या चांगल्या संस्थेतून मराठी व इंग्रजी टायिपगचा शासनमान्य प्रमाणपत्र कोर्स करून घ्यावा. मराठी ३० शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी ४० शब्द प्रती मिनिट असा वेग हवा असतो. तसेच शासनमान्य एमएससीआयटी हा संगणक कोर्सही शक्य झाल्यास करावा. टायिपगचा सतत सराव ठेवावा जेणेकरून प्रात्यक्षिकाच्या वेळेस त्रास पडत नाही..
👨‍🎨 सैन्य भरती
सातवी-आठवी उत्तीर्णापासून सैन्यात भरती सुरू होते. हे प्रत्यक्ष लढणारे सैनिक असतात. तुमची शारीरिक क्षमता चांगली असेल आणि कठीण परिस्थितीमध्ये जगण्याची तयारी असेल तर देशप्रेमाचे हे सर्वोत्तम करिअर तुमची वाट पाहत आहे.
याव्यतिरिक्त अतिरिक्त पोलिस बळ, सन्य दलातील इतर शाखा यांचे अर्जसुद्धा गरजेनुसार निघत असतात, त्यातही चांगली संधी आहे.
👨🏽‍✈️पोलिस भरती
बारावीनंतर पोलिस भरतीसाठी प्रयत्न करता येतात. यासाठी काही खासगी संस्था प्रशिक्षण देतात. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरती प्रशिक्षण कार्यक्रम असतो.
नुकतीच एक पोलिस भरती होऊन गेली आहे. या वर्षाखेरीस पुन्हा येण्याची शक्यता आहे.
👉हॉटेल मॅनेजमेंट
बारावीनंतर चांगले गुण मिळाले असतील तर या अभ्यासक्रमाचादेखील विचार तुम्ही करू शकता. मात्र, बारावीत कमी गुण मिळाले तरीही, इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये या विषयाशी संबंधित अल्प मुदतीचे अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत.

🔹 रेल्वे
रेल्वेमध्ये दहावी-बारावीनंतर सी व डी ग्रुपमध्ये ब-याच व्हेकन्सी असतात. तिकीट तपासनीस, स्टेशन मास्तर, क्लार्क, कमर्शिअल अप्रॅन्टीस या जागा पोस्ट बिगर आयटीआयन्सना उपलब्ध असतात, तर आयटीआय आणि इंजिनीअरिंगच्या विविध तांत्रिक पदांसाठी योग्य असतात. त्यामुळे बारावीला नापास झाल्यावर करिअर संपलंअसं होत नाही. उलट वर सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्य विद्यार्थी धोपट मार्ग सोडून जाणार नाहीत अशा क्षेत्रात तुम्ही तुमचं करिअर करू शकता आणि तुमचं भवितव्य एका वेगळ्या वाटेवर घडवू शकता. तेव्हा मित्रांनो नवीन आयुष्यासाठी ऑल दी बेस्ट!
व्यवसाय आणि कॉमर्स
कॉमर्स विभागात अनेक अल्प मुदतीचे करून नोकरी आणि स्वयंरोजगार सुरू करता येऊ शकतो.
🔹 इतर अभ्यासक्रम
एमएससीआयटी
एमएससीआयट
टॅली
सायबर कायदा
🔹रिटेल मॅनेजमेंट
कर व्यवस्थापन (मुंबई विद्यापीठ, भारती विद्यापीठ, वेिलगकर)

पत्रकारिता (मुंबई मराठी पत्रकार संघ)

आयात-निर्यात व्यवस्थापन (वेिलगकर, इंडियन र्मचट चेंबर)

फायनान्स व्यवस्थापन

बौद्धिक संपदा व्यवस्थापन

जेम्स आणि ज्वेलरी
🔹पर्यटन व्यवस्थापन
गरवारे करिअर मार्गदर्शन संस्था, मुंबई विद्यापीठ
या संस्थेत बारावीनंतर आणि पदवीनंतरचे पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. काही कोर्स पूर्ण वेळ आहेत. बारावीनंतर हे कोस्रेस करून नोकरी किंवा स्वयंरोजगाराच्या संधी मिळवता येतात.
पूर्ण वेळ :
कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन
इंटिरिअर डिझाइन
रिटेल
रंग तंत्रज्ञान
पर्यटन
ज्वेलरी डिझाइन?
🔹काही अल्प मुदतीचे अभ्यासक्रम
बारावीत ४०-५० टक्के मिळाले किंवा बारावीनंतर शिक्षण सुरू ठेवणं शक्य नसेल अशा वेळेस काही पर्यायांचा विचार करावा, ज्यातून लगेच नोकरी किंवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
🔹अर्धवेळ अभ्यासक्रम
१. कस्टम क्लिअरन्स आणि फ्रेट फॉरवर्डिग (आयात आणि निर्यात व्यवस्थापनातील एक महत्त्वाचा भाग)
२. फॉरेन ट्रेड व्यवस्थापन
३. पर्यटन व्यवस्थापन
सर्टिफिकेट अभ्यासक्रम
१. पर्यावरण तंत्रज्ञान
२. मेडिकल ट्रान्सस्क्रिप्शन
या प्रत्येक अभ्यासक्रमानंतर लहान पदांवरून नोकरी सुरू करता येऊ शकते.
तर निराश न होता आपल्या आवडीप्रमाणे कोणताही कोर्स करून स्वतच्या पायावर उभे रहा

१२ वीत कमी गुण मिळाले? नो टेन्शन. : हे आहेत तुमच्यासाठी कोर्स

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম