रामदास आठवले नावाचा झंझावात

 रामदास आठवले नावाचा झंझावात 


माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव 
महाराष्ट्राच्या राजकारणात रामदास आठवले हे नाव निश्चितच दुर्लक्ष करण्याजोगे नाही.बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्या नंतर आठवलेंचा विचार होतोच होतो. लोकांना यांचे मंत्रिपद दिसते पण त्यांनी केलेला संघर्ष दिसत नाही. 
रामदास आठवले नावाचा झंझावात

अशी कोणतीही दलित वस्ती नाही जेथे रामदास आठवलेना आोळखत नाही. रामदास बंडू आठवले (जन्म: २५ डिसेंबर, इ.स. १९५९)यांचा जन्म अगलगाव जि.  सांगली येथे झाला. प्राथमिक शिक्षण ढालेवाडीत (तासगाव, जि. सांगली) झाल्यानंतर पुढे काकांकडे मुंबईत शिक्षण घेण्यासाठी गेले. 
पुढे वडाळ्याच्या सिद्धार्थ विहार वसतिगृहात राहायला गेले. त्यांची तेथे खऱ्या अर्थाने जडणघडण झाली. इ.स. १९७२ मध्ये दलित पॅंथरची  स्थापना झाली व ते पॅंथर्समध्ये सक्रिय झाले. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ती व सहकारी मंडळी होती. पॅंथर्समुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्यांच्यात पॅंथर्सचा झंझावात निर्माण झाला.आठवले दलित पँथरची पत्रके, स्व:त लिहिलेल्या बातम्या वर्तमानपत्राला द्यायचे.आंबेडकरी वस्त्यांमध्ये जाऊन संघटना बांधायचे.बैठका घ्यायचे तेव्हा कार्यकर्ते त्यांना चहा आणि वडापाव द्यायचे. तो खाऊनच आठवले यांनी दिवस काढले, संघटनेकरता खस्ता खाल्या.वस्त्यातील बायका कधी जेवण द्यायच्या. तर कधी एखाद्या कार्यकर्त्याकडून वडापाव मिळायचा.खिशात दमडी नसायची पण डोक्यात फक्त संघटना असायची. अन्यायाविरोधात पॅंथर्सच्या माध्यमांतून त्यांनी आवाज बुलंद केला. त्यांच्या आंदोलनाची भल्याभल्यांनी धडकी घेतली होती.आंदोलनात त्यांनी कपडे फाटेपर्यन्त पोलींसाचा मार खाल्ला. नंतर नामांतराचा लढा काही वर्षे सुरू राहिला. शिवसेनेशी व सरकारशी त्यांनी संघर्ष केला. अनेक नेत्यांसह मोर्चे आणि आंदोलनात ते सहभागी झाले. शेवटी मराठवाडा विद्यापीठाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ’ असा नामविस्तार वा नामांतर झाले. तेव्हाचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार मुख्यमंत्री असताना हा ऐतिहासिक निर्णय झाला. मार्ग निघाला. आंदोलनाची सरकारला दखल घ्यावी लागली. आंदोलन, चळवळ आणि राजकारण सुरू असतानाच त्यांचा इ.स. १९९० मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळात समावेश झाला.. 
•  गेल्या अनेक वर्षांपासून आठवले नावाचं वादळ ऐकून होतो. महाराष्ट्रासह इतर अनेक ठिकाणीही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या माध्यामातून त्यांनी आपला राजकीय अजेंडा जाहीर करून धाडसाने निर्णय घेतला असेल आणि तेवढ्याच धाडसानं निर्णय बदललाही असेल मात्र कधी राजकारण करण्यासाठी समाजात आग ओतण्याचं काम या पँथरने केल्याचं ऐकलं नाही.
•  खऱ्या अर्थाने दलित, वंचित आणि शोषित घटकांवर अन्याय होतो तेव्हा रामदास आठवले आवाज देताना पाहिलंय.
• रामदास आठवले नावाचा नेता एका रात्रीत तयार झालेला नाही, कुण्या मिडीयाने डोक्यावर घेऊन तयार केलेला नाही, कुणाच्या पाठीमागे फिरून तयार झालेला नाही तर खेड्यापाड्यात दलित समाजाच्या वाड्यावस्तीत फिरून एक एक पँथर जमा करून त्यांच्या मनामध्ये स्फुल्लिंग पेटवण्याचं काम यांनी केलं.
• साधारण घरातून घोंघावत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्रीपदापर्यंत मारलेली मजल ही त्यांच्या इतिहासजमा झालेल्या संघर्षाचे आणि कार्याचे मोल आहे.
•  गावागावात आठवले साहेब अंगार है अशा घोषणा बाहेर पडताना पाहिल्या तेव्हा त्या फाटक्या माणसाची उंची तुम्हाला आम्हाला लक्षात येते.
• दलित समाजाला इतर नेत्यांनी काय दिलं आणि आठवलेंनी काय दिलं हे समजून घ्यायचं असेल तर आठवलेंचा संघर्ष जाणून घ्या. आपलं काम ही आपली आयडेंटीटी असली पाहिजे आणि तशी आयडेंटीटी आठवलेंनी तयार केली.१९९८ मध्ये रामदास आठवले पहिल्यांदा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून संसदेत निवडून गेले. 
दलित समाजाच्या मागण्या आणि उत्कर्षासाठी तळमळत उन्हात बसण्यापेक्षा भाजपाच्या सोबतीने जाऊन एखादं मंत्रिपद घेऊन समाजाला जेवढा न्याय देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न केला तर रामदास आठवले याचं बिघडलं कुठं?
दलितांच्या हितासाठी सातत्याने काम करून झोपडपट्टीतल्या दलितांचे प्रतिनिधित्व करणारे रामदास आठवले यांच्या कर्तृत्वाकडे पाहिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारा कार्यकर्ता आठवतो.
कारण देशाला बळ दिले पाहिजे म्हणत चुकीचे ते चुकीचे आणि बरोबर ते बरोबर म्हणण्याची ताकद रामदास आठवले ठेवतात.
रामदास आठवले नावाचा झंझावात


रामदास आठवले नावाचा झंझावात


रामदास आठवले नावाचा झंझावात

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম