सूर्यफूल सूर्याच्या🌻 दिशेनेच का वळते?

सूर्यफूल सूर्याच्या🌻 दिशेनेच का वळते?

http://bit.ly/3biIrq0

ह्याचा सूर्यासारखा गडद केशरी रंग व वर्तुळाकृती आकारामुळे त्याला सूर्यफूल हे नाव दिले गेले.
दुसरे असे की, ज्याप्रमाणे आकाशात सूर्य वाटचाल करतो त्यानुसार झाडावर असलेले हे फूल त्या दिशेने वळते. सूर्यफुलाचा वापर प्रामुख्याने तेल काढण्यासाठी केला जातो. सूर्यफुलाचे तेल हे गोड्या तेलाप्रमाणे अनेक घरगुती आणि पाककृतींमध्ये वापरले जाते.
वनस्पती जगतातील एक सर्वात जुने रहस्य आता संशोधकांनी उलगडले आहे. सूर्यफूल नेहमी सूर्याच्या दिशेनेच का वळते याचे हे रहस्य. या रहस्याचे जे उत्तर मिळाले आहे त्यामधून सौरऊर्जेच्या वापराबाबत आणखी नवी दालने खुली होऊ शकतात. संशोधकांना असे दिसून आले की, सूर्यफुलाच्या खोडामधील एका दिशेत होणार्या विशिष्ट वृद्धीमुळे हे फूल असे सूर्याच्या दिशेने वळते.
कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील सहा अमेरिकन संशोधकांच्या पथकाने याबाबतचे संशोधन केले आहे. हे फूल सूर्याच्या दिशेने वळण्याच्या प्रक्रियेला ‘हिलियोट्रोपिजम’ असे म्हटले जाते. मात्र, ही प्रक्रिया कशी होते याची माहिती आतापर्यंत मिळालेली नव्हती. आता यावर तपशीलवार संशोधन झाले आहे. या वनस्पतीचा हा अनोखा सिद्धांत कसा काम करतो आणि त्यापासून वनस्पतीला कोणता लाभ होतो हे पाहण्यात आले.
सकाळच्या वेळी फुलाचे मुख पूर्वेकडे असते. त्यानंतर दिवसभरात सूर्य जसा पुढे जाईल तसतसे हे फूल तिकडे मुख करीत जाते. रात्रीच्या वेळी ते पुन्हा विपरीत दिशेत येते जेणेकरून सकाळी पुन्हा एकदा हे मुख सूर्याच्या दिशेने होईल. यामुळे फूल आणि परागीकरण करणारे कीटकांसारखे जीव या दोन्हीला लाभ मिळतो. अशा कीटकांना आकर्षित करण्यासाठी तापमान वगैरे काही कारणांसाठीही अशी घटना घडत असते. त्यानुसार मुख्य खोड अशी हालचाल घडवून आणते.♍

सूर्यफूल सूर्याच्या🌻 दिशेनेच का वळते?


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম