मादी नव्हे नर देतो पिलांना जन्म !

मादी नव्हे नर देतो पिलांना जन्म !

.     
    
http://bit.ly/3mqsq7K

सर्वाना माहित आहे की पिल्लाना जन्म देण्यासाठी मादीच उपयोगी पडते.पण एक प्राणी असा आहे की, यासाठी मादी नव्हे तर नर उपयोगी पडतो.
      समुद्री घोडा हा एक प्रकारचा माशाची प्रजात आहे.  सजीवांच्या प्रत्येक प्रजातीमध्ये मादीवरच पिलांना जन्म देण्याची जबाबदारी असते. (गांडुळासारखे काही उभयलिंगी जीव सोडले तर!) समुद्रीघोडा या जलचरांमध्ये मात्र मादी नव्हे तर नरच पिलांना जन्म देण्याची जबाबदारी पार पाडतो. जगात समुद्रीघोड्यांच्या शंभरपेक्षाही अधिक प्रजाती आहेत. जलचर असूनही त्यांच्यामध्ये माशांपेक्षा अनेक वेगळी वैशिष्ट्ये असतात.

मादी नव्हे नर देतो पिलांना जन्म !

या जलचराचा डोक्याचा भाग घोड्यासारखा दिसतो म्हणून त्याला ‘समुद्रीघोडा’ म्हटले जाते. अर्थात आकाराने हे जीव अतिशय लहान असतात. हे जीव दोन्ही डोळ्यांनी एकच नव्हे तर दोन वेगवेगळी दृश्ये पाहतात! त्यापेक्षाही मोठे वैशिष्ट्य म्हणजे पिलांना जन्म देणे. नर समुद्रीघोड्यामध्ये कांगारू मादीच्या पोटावरील पिशवीसारखी थैली असते. त्यामध्ये मादी अंडी देते व निघून जाते. या अंड्यांना उबवून पिलांना जन्म देण्याचे काम नरच करतो. अंड्यातून पिली बाहेर येण्यासाठी दीड महिन्याचा काळ लागतो. त्यानंतर नर ही थैली सोडून पिलांना पाण्यात सोडतो. नर एका वर्षात तीन वेळा अंडी उबवून पिलांना जन्म देऊ शकतो. एकावेळी तो तब्बल 50 अंडी पिशवीत ठेवू शकतो. विशेष म्हणजे माशांपासून माणसापर्यंत कुणीही समुद्रीघोड्यांना आपला आहार बनवत नसल्याने त्यांची संख्या पुष्कळ असते.
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম