चिनी महिलांच्या टवटवीत त्वचेचे रहस्य...

चिनी महिलांच्या टवटवीत त्वचेचे रहस्य...     


.        दि.  ९ आॅगष्ट २०२०

http://bit.ly/3iBfLgq
      बीजिंग : चिनी महिलांची त्वचा तुलनेने अधिक सतेज आणि टवटवीत असते असे मानले जाते. सुंदर, स्वच्छ, डागरहित आणि तेजस्वी त्वचा ही त्यांना नैसर्गिकरीत्याच मिळालेली आहे असे नाही. एका तज्ज्ञाने आता त्यासाठी चिनी महिला ज्या घरगुती पद्धती वापरतात त्यांची माहिती दिली आहे.*

अर्थातच हे सर्व एखाद्या तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच करून पाहणे योग्य ठरते; पण कुतुहल म्हणून त्याची माहिती देण्यात आली आहे. चीनमधील अनेक महिला शिंपल्याचे कवच किंवा मोत्याच्या चूर्णमध्ये मध आणि अंडी मिसळून त्याचा लेप चेहर्याला लावतात. आठवड्यातून किमान दोन वेळा असा लेप लावल्याचे त्वचेला लाभ मिळतो, असा त्यांचा दावा आहे. ग्रीन टीचे सेवन आरोग्यासाठीच नव्हे तर सौंदर्यवृद्धीसाठीही होतो, असे चिनी महिलांचे म्हणणे आहे. त्यासाठी त्या रोज असा चहा पितात व त्यामुळे त्या दीर्घकाळ तरुण दिसू शकतात! पुदिनाच्या पानांचा लेप, तांदळाचे (फ्रीजमध्ये थंड केलेले) पाणी चेहर्याला लावूनही त्या आपल्या चेहर्याचे सौंदर्य वाढवतात.

चिनी महिलांच्या टवटवीत त्वचेचे रहस्य...

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম