अजूनही मिटले नाहीत चंद्रावरील ‘ते’ ठसे
पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह असलेल्या चंद्राची अनेक वैशिष्ट्ये आहेत. नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. विशेष म्हणजे अद्यापही चांद्रभूमीवर त्यांच्या पावलांचे ठसे अस्तित्वात आहेत. याचे कारण म्हणजे चंद्रावर हवा नसल्याने धुळीने हे ठसे झाकून जाण्याची भीती नाही!
450 कोटी वर्षांपूर्वी एका लघुग्रहाच्या धडकेने पृथ्वीचाच एक भाग वेगळा होऊन तो पृथ्वीभोवती फिरू लागला व तोच चंद्र बनला. चंद्रावर पृथ्वीच्या तुलनेत गुरुत्वाकर्षण नगण्य आहे. त्यामुळे जर पृथ्वीवर आपले वजन 60 किलो असेल तर ते चंद्रावर अवघे दहा किलोच भरते! चंद्र 27.3 दिवसांमध्ये पृथ्वीभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. चंद्रामुळेच पृथ्वीवरील समुद्रांमध्ये भरती आणि ओहोटी होत असतात. चंद्रावर वातावरण नसल्याने कितीही मोठ्याने ओरडले तरी दुसर्या व्यक्तीला तुमचा आवाज ऐकू येऊ शकणार नाही! 1972 पर्यंत 12 अंतराळवीर चंद्रावर जाऊन आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत एकही माणूस चांद्रभूमीवर उतरलेला नाही.*
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━
Tags
माहिती