३७० कलम व राजकीय चातुर्य

 गुपचुप नियोजन 

🔹३७० कलम व राजकीय चातुर्य🔹



आठवतंय का?
पाच वर्षांपूर्वी पी डी पी बरोबर जम्मू आणि काश्मीरच्या सत्तेत भाजपा सामील झाली होती.
अनेक भाजपाप्रेमींना हा निर्णय मनापासून पटला नव्हता. या मुद्द्यावरून भाजपाच्या प्रवक्त्यांना सुद्धा अनेक वेळा चॅनेल वरच्या आरडाओरड्यात पडती बाजू घ्यावी लागली होती पण भाजपाची वरीष्ठ फळी अगदी शांतपणे त्यांचे काम करत होती.
चार साडेचार वर्षांनी बरोब्बर लोकसभा निवडणुकांच्या आधी पीडीपीशी अचानक काडीमोड घेण्यात आला होता. तेव्हाही अनेक जणांनी भाजपा पळपुटी असल्याचेही निष्कर्ष काढले होते. भाजपाची वरीष्ठ फळी शांतपणे काम करतच होती. काय मिळाले या चार वर्षात? अनेक " क्लासिफाईड " फाईल्सवर नुसते डोळेच नाही तर चक्क हातही घालता आला होता. कुठल्या टेबलवरून काय हालचाली होतात याची खडानखडा माहिती गोळा होत होती. सरकारी मशिनरीमधे नक्की मोल्स कोण आहेत याची यादी तयार केली जात होती. दरम्यान सैन्यापासून ते कार्यकर्त्यापर्यंत सगळे शांत होते. अनेकदा रक्त उकळेल इतकी परिस्थिती बिघडली होती. डोक्यात बर्फच भरला होता.
अस्वस्थ पाककडून आगळीक करणारी हालचाल झालीच. अगदी सडेतोड उत्तर दिल गेलं. संपूर्ण देश मोदींच्या पाठीशी परत उभा राहिला. संपूर्ण बहुमत !!! लगेच हालचाल सुरू झाली. बॅंक ऑफ काश्मीर मधला भ्रष्टाचार उघडकीस आला. राष्ट्रपती राजवट होतीच. साडेचार वर्षातल्या सर्व गोपनीय फाईल्समधली माहिती संगतवार लावून झाली होती. एसीबीची नोटिस मेहबुबाला गेली. संपूर्ण बहुमतातल्या मोदींकडून " सबका साथ, सबका विकास " ची भूम उडवली गेली. मोदींना अक्षरश: लाखोली वाहिली गेली. अगदी कट्टर भक्तांनीही त्यांना मौलाना म्हणायलाही सुरुवात केली. काम शांतपणे सुरूच होते.
कधी नव्हे ते संसदेचे सत्र उशिरापर्यंत चालायला लागले. राष्ट्रपतींचा परदेश दौरा परवाच संपला. काल ते भारतात परत आले. काश्मीरमधे नुसता धुरळाच उडत होता. आयतेच सगळे राजकीय नेते एकाच घरात गोळा होऊन सापडले.
आज अखेरचा घाव घातला गेला. १२५ / ६१ मतांनी राज्यसभेने मान्यता देऊनही टाकली. संसदेतलं २/३ बहुमत लागेल, घटना दुरुस्ती करावी लागेल, इतकं सोप नाही, सगळीकडे आयात सुरू आहे, लवकरच कॉंग्रेस होणार भाजपाची ... अनेक तर्क, कुतर्क !!! अत्यंत धूर्तपणे हा डाव टाकला गेलाय. अमित शहा जेव्हा भर राज्यसभेत भाजपा सदस्यांना हात वर करून सांगतात की, कुठल्याही कोर्टात काही अडचण येणार नाही, तेव्हा किती अभ्यास झाला आहे याची खात्री बाळगायला हरकत नाही. आजच मतदान आणि उद्याची औपचारिकता गेल्या पाच वर्षांच्या नियोजनाची फलश्रूतीच म्हणावी लागणार आहे.
मला भाऊ तोरसेकरांचे एक वाक्य आठवते आहे, मोदीशहा जोडगोळी चोवीस तास राजकारणाचा विचार करते. परफेक्ट वर्णन आहे. त्यात दोघेही संघाचे अगदी कट्टर स्वयंसेवक. प्रचंड संयम, चिकाटी, नियोजन, प्रखरच राष्ट्रभक्ती अगदी ठासून भरलेली. त्यात गुजरातमधे दोघेही प्रचंड दुखावलेले. जंगलातलं दुखावलेल श्वापद जास्तच धोकादायक असतं असं म्हणतात. पूर्ण आदर ठेवून अस म्हणावस वाटत की कॉंग्रेसने या दोघांनाही प्रचंड दुखावून स्वत:ची कबर खणून घेतली आहे. २०१९ ची निवडणूक ही त्या कबरीतल्या कलेवरावर माती घालणे असेल तर आजचा डाव म्हणजे कबरीवरचा दगड सरकवायला सुरुवात म्हणायला लागेल. २०२४ पर्यंत बहुतेक कॉंग्रेसच आपल्या कबरीला फायनल टच देईल. आज त्यांच्या व्हिपनी राजीनामा देत इशारा दिला आहेच !!!

येणारा काळ इंटरेस्टिंग असणार आहे हे नक्की !!!
___

३७० कलम व राजकीय चातुर्य

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম