दि १ आॅगष्ट २०२०
बेंगळुरू येथील वेकलिफ्ट (Wakelift) या स्टार्टअपने कंपनीची ही अनोखी नोकरी आहे. काम काय तर, रोज कंपनीने दिलेल्या गाद्यांवर 9 तास गाढ झोपी जायचं आहे.
या झोपेच्या कामासाठी नुकत्याच 23 जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.
झोपण्याच्या नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना कंपनीला एक व्हिडिओ पाठवण्यास सांगितलं होतं.या व्हिडिओमध्ये आपल्याला झोपायला का आवडतं, ते स्पष्ट करायला सांगितलं होतं.
यातील ज्यांची उत्तरं आवडली, त्यांना कंपनीने आमंत्रित केलं.या उमेदवारांना शांतपणे झोपण्यास सांगितलं. जे उमेदवार आरामात गाढ झोपून गेले, त्यातील 21 जणांची निवड करण्यात आली.LinkedIn वरून या नोकरीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. लाखो अर्जांमधून 23 जण निवडले गेले.
या इंटर्न्सना 100 रात्री 9 तास झोपण्याची नोकरी देण्यात आली आहे.या इंटर्न्सना 1 लाख रुपये पगार मिळणार आहे.यासाठी 21 भारतीय आणि 2 विदेशी इंटर्न्सची निवड करण्यात आली.या इंटर्न्सना रोज कंपनीने दिलेल्या गाद्यांवर 9 तास गाढ झोपी जायचं आहे.त्यासाठी स्लीप ट्रॅकरदेखील लावण्यात येणार आहे, आणि किती चांगली झोप लागली आहे, हे तपासले जाणार आहे.
याशिवाय तज्ज्ञांसोबत कौन्सिलिंगही होणार आहे.घरातच या इंटर्न्सला गादी देण्यात येणार आहे. तसंच स्लीप ट्रॅकरही पुरवण्यात येणार आहेत. आठवडाभर इंटर्न्सना घरातच दिवसभर झोपायचं आहे.
या सर्वांना युनिफॉर्मही देण्यात आला आहे. हा युनिफॉर्ममध्ये ‘पायजमा’घालून झोपणं इंटर्न्सना बंधनकारक आहे.
🔹 हे सर्व कंपनी कशासाठी करत आहे
वेकफिट इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड लोकांच्या झोपण्याच्या पॅटर्नवर रिसर्च करत आहे. लोकांना शांत झोप लागण्यासाठी काय आवश्यक आहे, याचा अभ्यास या स्टार्टअपतर्फे करण्यात येत आहे. त्यासाठीच त्यांनी ही स्लीप इंटर्नशिप देऊ केली आहे.
______________________________
Work only 9 hours sleep: Salary Rs. 1 lakh
August 1, 2020
This is a unique job of the company with the startup Wakelift in Bangalore. After all, I want to sleep 9 hours a day on the mattresses provided by the company.
23 people have recently got jobs for this sleep job.
Candidates interested in sleeping jobs were asked to send a video to the company. In this video, they were asked to explain why they like to sleep.
Those who liked the answers were invited by the company. The candidates were asked to sleep peacefully. Of the candidates who slept soundly, 21 were selected. Applications for the job were invited from LinkedIn. Out of millions of applications, 23 were selected.
These interns have been given the job of getting 9 hours of sleep for 100 nights. These interns will get a salary of Rs. 1 lakh. For this, 21 Indian and 2 foreign interns have been selected. Yes, and how well you sleep is going to be checked.
Apart from this, there will also be counseling with experts. These interns will be given a mattress at home. Sleep trackers will also be provided. Interns want to sleep at home all day for a week.
All of them have been given uniforms. Interns are required to wear pajamas in uniform.
Why is the company doing all this
WakeFit Innovation Pvt Ltd is doing research on people's sleep patterns. This startup is studying what people need to get a good night's sleep. That is why they have offered this sleep internship.