आपल्या मेंदुतही आहे डिलिट बटन, काढून फेका जुन्या आठवणी!

 आपल्या मेंदुतही आहे डिलिट बटन, काढून फेका जुन्या आठवणी!
____________________________
   माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव
╰──────•◈•──────╯
____________________________
🌀 दि.  13  सप्टेंबर 2020 🌀
  .        
🌹..............................................._..............................................._

फेसबुक लिंक https://bit.ly/2Ri2smG
अनेकदा आपण कितीही प्रयत्न करा पण काही गोष्टी आपल्या डोक्यातून कधीच निघत नाहीत. जसे म्हटले जाते की, तुम्ही एखाद्याला माफ करु शकता पण विसरु शकत नाही. पण तुम्ही जर पुन्हा पुन्हा त्याच त्याच जुन्या आठवणी काढत राहिलात तर मेंदुसाठी नवीन आठवणी तयार करणे कठीण होईल.
पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, त्या आठवणींपासून सुटका कशी मिळवावी ज्या आठवणींनी आपलं जीवन एका जागेवर बांधून ठेवलं आहे. विज्ञान असं सांगतं की, याचं उत्तर आहे.
आपणा सर्वांना हे माहीत आहे की, सराव केल्याने माणूस परफेक्ट होतो. मग ते क्रिकेट असो वा एखादं वाद्य वाजवणं असो किंवा डान्स शिकणं असो. तुम्ही एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करता तेव्हा ती गोष्ट आपण चांगल्याप्रकारे करु शकतो. हीच गोष्ट जुन्या आठवणी काढण्यावर लागू होतात. जर तुम्ही एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा आठवता तेव्हा ती गोष्टी आपल्या डोक्यात आणखी आतपर्यंत जाते आणि नंतर ती गोष्ट डिलिट करणे फार कठीण होतं.
╔══╗
║██║      _*M⃟   a⃟   h⃟   i⃟   t⃟   i⃟  * _
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
____________________________
     मग काय करायचं?
तुम्ही कल्पना करा की, तुमचा मेंदू एखाद्या भाजीची बाग आहे. यात टोमॅटो, बटाटे, कांदे आणि इतरही भाज्या आणि फळांचं उत्पादन होतं. फरक केवळ इतका असेल की, मेंदुमध्ये भाज्यांच्या जागी न्यूरॉन्समध्ये सिनेप्टिक कनेक्शन निर्माण होत आहेत. याच कनेक्शनच्या माध्यमातून गोष्टी मेंदुपर्यंत पोहोचतात.
ज्याप्रमाणे तुम्हाला तुमची बाग सुंदर ठेवण्यासाठी झाडे कापावी लागतात, तसंच मेंदुसोबत करावं लागतं.

मेंदुमध्ये हे काटछाट करण्याचं काम ग्लियाल पेशी करतात. या तुमच्या सिस्टममधून खराब किंवा कडवट आठवणी काढून टाकतात आणि मेंदुच्या एखाद्या कोपऱ्यात फेकून देतात.
या पेशी सक्रिय कशा करायच्या?
पुरेशी झोप घ्या
जेव्हा तुम्ही पुरेशी झोप घेत नाही तेव्हा डोक जड वाटतं. मेंदू स्टॅंडबाय मोडवर जातो. आणि जास्तीत जास्त प्रत्येक प्रकारच्या आठवणी एकत्र करणे सुरु करतो. पुरेशी झोप न घेतल्याने लक्ष केंद्रीत करण्याची क्षमताही प्रभावित होते. उदाहरणार्थ ऑफिसमध्ये तुमचं कुणाशी भांडण झालं असेल आणि एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करायचं असेल तर तुमचा मेंदू प्रोटेक्टला सोडून तुमच्या भांडणाबाबत विचार करायला लागतो.
पण जर तुम्ही आराम केला जर तुमच्यातील ग्लियाल सेल्स चांगल्या आणि वाईट आठवणीत फरक करु शकेल आणि खराब आठवणी सिस्टिममधून काढू शकेल. इतकेच नाही तर तुमचा मेंदूची पूर्णपणे क्लीनिंग प्रोसेसही होते. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा मेंदुतील पेशी जवळपास ६० टक्के आकुंचन पावतात. जेणेकरुन ग्लियाल पेशींसाठी स्पेस निर्माण व्हावा.
स्वत:ला बिझी ठेवणे आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. दिवसातून साधारण ६ ते ७ तास काम केल्यानंतर मेंदू इतका थकतो की, त्याला जास्तीच्या गोष्टींबाबत विचार करायला शक्ती नसते. काम करणे आणि स्वत:ला व्यस्त ठेवल्याने तुमच्या मेंदुला नवीन आठवणी तयार करण्यास मदत मिळते आणि याने जुन्या आठवणी नष्ट होतात. ____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9011714634* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম