मंगळावर होणार शेती!

 मंगळावर होणार शेती! 

फेसबुक लिंक https://bit.ly/30WGz1i
🌖 🌔  मंगळावर जाण्याची मानवी महत्त्वाकांक्षा दिवसेंदिवस अधिक प्रबळ होत चालली आहे. एलन मस्क यांच्यासारखे तर मंगळावर मानवी वसाहत स्थापन करण्याची स्वप्ने पाहत आहेत. अर्थात मंगळावर शेतीही कशी करता येईल, याचे प्रयोग सुरू आहेत.

मंगळावर होणार शेती!
पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात लाडा, झुचिनी, सोयाबीनपासून लेट्यूसपर्यंत अनेक वनस्पतींचा विकास घडवून आणण्याचे प्रयोग झालेले आहेत. आता ‘नासा’च्या केनेडी स्पेस सेंटर व फ्लोरिडा टेक बझ आल्ड्रिन स्पेस इन्स्टिट्यूट यांनी याबाबतचे प्रयोग केले आहेत. त्यात मंगळावर वनस्पतींची लागवड करण्यातील आव्हाने संशोधकांनी दूर केल्याचे दाखवले आहे. मंगळावरील शेती ही पृथ्वीपेक्षा वेगळी असणार आहे. मंगळावरील मातीत ज्वालामुखी खडक असून सेंद्रिय घटक नाहीत, त्यामुळे तेथे वनस्पती जगणे अवघड आहे असे ‘नासा’चे म्हणणे आहे.नासाच्या केनेडी स्पेस सेंटरचे व्हेजिटेबल प्रॉडक्शन सिस्टीम प्रयोगाचे प्रकल्प व्यवस्थापक ट्रेन्ट स्मिथ यांनी सांगितले की, विज्ञानातील प्रगतीचा वापर करून वनस्पतींच्या आहारासाठी पूरक वनस्पतींची लागवड केली जाऊ शकते. यात अवकाशवीर हे अवकाशात विविध वनस्पतींची लागवड करू शकतील. त्याचे प्रयोग आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात करता येतील. मंगळ बगीच्याच्या सादृश्यीकरणात हवाई बेटावरील माती वापरण्यात आली, कारण ती मंगळासारखी आहे. यात नेमकी किती माती वापरावी लागेल, कोणती पोषके समाविष्ट करावी लागतील, याचा अंदाज घेण्यात आला. लेटयूसची लागवड कुठल्याही पोषकांचे मिश्रण न करता होऊ शकते, असे दिसून आले आहे; पण या मातीत लेटयूसची मुळे कमकुवत ठरली व अंकुरण दर कमी दिसून आला.🌔🌖

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম