या देविला फुले म्हणुन दगड वाहतात

 या देविला फुले म्हणुन दगड वाहतात 

फेसबुक लिंक https://bit.ly/33v2jTU
रायरेश्वर किल्ला कडे जाताना वडतुंबी हे छोटे गाव लागते.) भोर - टिटेघर गाडी आंबवण्यास येते, तिने वडतुंबी फाट्यावर उतरावे. तिथून १५ मिनिटांत वडतुंबी गाव गाठता येते.पुणे जिल्ह्यात असणारी रायरेश्वर-केंजळगड ही जोडगोळी अगदी लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत कोणालाही सहज बघता येईल अशीच आहे. या वडतुंबी गावातील एकाने माहिती दिली की,या गावात एक आगळावेगळी देवी आहे. वडतुंबी गावाबाहेर एक आगळी वेगऴी देवी आहे.

या देविला फुले म्हणुन दगड वाहतात
इतर देवाला आपण फुले अर्पण करतो.पण या देवीला चक्क दगड अर्पण केले जातात.एका चाफ्याच्या झाडाखाली एका जांभ्या दगडातले शिल्प आहे.याला सती आईचा चाफा म्हणतात. त्या शिल्पाला गावातील नागरिक गावाबाहेर जाताना दगड फुल म्हणून वाहतात.
ते शिल्प चाफ्याच्या झाडाखाली आहे. गावातून कोणीही बाहेर पडताना थोड थांबून दगड फुल म्हणून वाहण्याची प्रथा आहे.ही प्रथा का व कशासाठी पडली याबद्दल कोणालाही माहिती नाही.किल्याच्या आसपासचा हा परिसर असल्याने कोणीतरी विर लढाईत मुत्यु पावला असावा व त्याची पत्नी सती गेली असावी. तिची आठवण म्हणुन मिळाली तर फुले नाहीतर दगड लिहायची प्रथा पडली असावी.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম