मांजर का गुरगुरतं?

   मांजर का गुरगुरतं ? 


.        📯 दि २०  आॅक्टोबंर २०२० 📯

फेसबुक लिंक http://bit.ly/34d0uLD
  .          मांजराला कुरवाळल्यावर किंवा त्याला मांडीवर घेतल्यावर ते गुरगुरत असते. कधी कधी मादी आपल्या पिलांना हाक देत असतानाही गुरगुरते. मांजराची गुरगुर हा नक्की कसला आवाज असतो हा जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून वादाचा मुद्दा ठरलेला आहे.


हृदयाच्या उजव्या बाजूला अशुद्ध रक्त वाहून नेणारी मुख्य रक्तवाहिनी, जिला ‘अध:स्थ महानीला’ म्हणतात, तिच्यातून होणार्या रक्तप्रवाहाचा हा आवाज असतो असा काहींचा अंदाज आहे.परंतु हा आवाज मांजराच्या स्वरयंत्रातल्या स्नायूंचा असावा असा अंदाज अधिक संशोधनातून समोर आला आहे.

स्वरयंत्राचा ‘ग्लॉटिस’ नावाचा भाग, जो स्वरतंतूंच्या भोवती असतो, तो मांजराच्या प्रत्येक हालचालीसोबत आकुंचन-प्रसरण पावत असतो. प्रत्येक श्वासाला हवेच्या होणार्या कंपनांचा परिणाम म्हणून मांजराच्या स्वरयंत्रातून हा आवाज येत असावा.विज्ञानाला या प्रक्रियेबद्दल जवळजवळ खात्री असली तरी यामागचे कारण अजूनही ठामपणे सांगता आलेले नाही.

मांजर का गुरगुरतं ?

____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম