नरसोबावाडी व विजापुरचा आदिलशहा

 नरसोबावाडी व विजापुरचा आदिलशहा   


फेसबुक लिंक http://bit.ly/377dcNl
        विजापूरच्या बादशहाची मुलगी जन्मांध होती. ऐके दिवशी राजा मुलीच्या चिंतेत बसला असता एका मुसलमान साधूने सांगितले, अमरपूर (नरसोबावाडी) येथे हिंदू साधू श्री नृसिंह सरस्वतीचे जागृत स्थान आहे. तेथे मुलीस घेवून जा सेवा कर, तुझे काम होईल. राजा कन्नेस घेवून वाडीस गेला, सेवा केली, मुलीस दृष्टी आली.

राजाने नित्य दर्शन पाहिजे म्हणून स्वामीना मागणी केली. नंतर अरकील्याजवळ दोन्ही खंदकाच्या मध्यभागी अश्वस्था खाली सदैव मूर्त स्वरूपाने आहे असा राजास दृष्टात झाला. मनोकामना पूर्ण झाली. राजा तेव्हा पासून श्री नृसिंह देवाचे नित्य दर्शन घेत असे. नंतर बादशाहने नरसोबाचे वाडीस श्री चे सेवेसाठी औरवाड व गौरवाड ही दोन गांवे इनाम दिली.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,राजास दृष्टात झाला ते न्रसिंह मंदिर विजापुरात तोरवी न्रसिंह मंदिर म्हणुन अोळखले जाते.तोरवी नरसिंह मंदिर : विजापूरपासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर सुमारे ४०० वर्षांपूर्वीचे नरसिंह मंदिर आहे. आदिलशाहीच्या संगीतमहलच्या अगदी जवळ हे आहे. या मंदिराजवळ देवी लक्ष्मीचे आणखी एक हिंदू मंदिर स्थित आहे. विजापूरमधील लोक दर शनिवारी या मंदिराला भेट देतात. ‘दी ग्लोरी ऑफ विजापूर’ या इंग्रजी पुस्तकामध्ये याचे वर्णन आहे. या मंदिराबद्दल शिलालेखांत उल्लेख आहे. हे शिलालेख विजापूर किल्ल्यामागील पूर्वेकडील शहराच्या प्रवेशद्वारावर, वेशीवरील खांबावर व इतर भागांत संस्कृत व कन्नड भाषेत आहेत. या देवस्थानांना चालुक्य व देवगिरीचे यादव राजे यांनी देणग्या दिल्याचे उल्लेख आहेत. हे शिलालेख इ. स. १०१८ पासून १३०४पर्यंतचे आहेत. त्यावरून श्री नरसिंह देवस्थान एक हजार वर्षांपूर्वीचे असावे असे अनुमान निघते. ‘आर्किटेक्चर अॅट विजापूर’ पुस्तकाचे लेखक कॅप्टन मेडो टेलर यांच्या पुस्तकातही या मंदिराबद्दल चालुक्य राजांनी दिलेल्या देणगीच्या शिलालेखाचा उल्लेख केला आहे. त्याचे साल ११९२ आहे.

▶️ विजापुर येथील मंदिरातील मुर्तिचा फोटो पहा

नरसोबावाडी व विजापुरचा आदिलशहा


    🎈 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव🎈
_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓
.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম