दारूच्या नशेत सेक्स करावा की करू नये?

दारूच्या नशेत सेक्स करावा की करू नये?

--
सेक्स हा आनंदी सहजीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आनंदी सहजीवनाच्या अनेक रहस्यांपैकी ते एक महत्त्वपूर्ण रहस्य असल्याचं अनेक संशोधकांचे मत आहे. आनंददायी सेक्स जीवन तुम्हाला दीर्घ काळापर्यंत एकमेकांशी बांधून ठेवते. पण, दारू अर्थात मद्याच्या नशेत सेक्स करावा की करू नये? असा प्रश्न अनेकांना सतावत असतो. याच विषयी लैंगिक समस्या तज्ञ डॉ. राहुल पाटील यांना विचारले असता त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 
सेक्स करताना स्नायू दुखावू शकतो का?
डॉ. पाटील म्हणतात की, तुम्ही सेक्स किती वेळा करता त्यापेक्षा कसे करता यावर सेक्सचा आनंद अवलंबून असतो. अनेकांना दारूचे व्यसन असते थकवा जातो म्हणून काही पुरुष, स्त्री मद्यप्राशन करतात आणि मद्याच्या धुंदीत ते आपल्या जोडीदाराशी सेक्स करण्याचा प्रयत्न करतात. या परिस्थितीत दारू किती मात्रेत घेतली आहे ही बाब महत्त्वाची आहे. काहींना मद्याच्या नशेत सेक्स केलेले चांगले वाटते पण ते सेक्सचा किती आनंद घेऊ शकतात? याबद्दल शंका आहे.

डॉ. पाटील यांनी सांगितले की, मद्याच्या नशेत पुरुष सेक्स साठी योग्यरित्या उत्तेजित होईलच असे नाही. तसेच वीर्यपतन लवकर किंवा उशिरा होते. त्याचबरोबर सतर्क नसल्याने सेक्स करताना दुखापत होणे आणि अनोळखी व्यक्तीबरोबर सेक्स करताना सुरक्षितता पाळली न जाणे हेही घटक महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे गुप्तरोग होण्याची शक्यता असते. चित्रपट, सिरीअल्समध्ये दारूला मुद्दाम पाठिंबा दिला जात आहे. दारू पिल्यावर लगेच उत्तेजित होऊन सेक्स होतो असे जे दाखवतात तेच सत्यात होते अशा भ्रमात लोक असतात. स्त्रीला दारूचा दुर्गंध आवडत नसेल तर ती सेक्समध्ये फार सक्रीय राहील असे नाही.

दारूच्या नशेत सेक्स करावा की करू नये?

ज्या जोडप्याचं कामजीवन समृद्ध, समाधानी असतं ते जोडपं सुखी, असं म्हटलं जातं, पण हे कळणं आणि प्रत्यक्षात आणणं यात खूप अंतर आहे. कारण अनेकांना वैवाहिक आयुष्यातलं सेक्सचं स्थान, त्याची मर्यादा याचं महत्त्वच लक्षात येत नाही, असंही डॉ. राहुल पाटील मत व्यक्त केले आहे.
(दै पुढारी वरून) 
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম