पुण्यात धोतराची उलाढाल कोटीच्या घरात आहे
दि. २ जानेवारी २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/38VcnXv
आपल्याकडे पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण खाण्यापासून ते कपड्यांपर्यंत सर्वच बाबतीत सर्रास केले जाते. या भडिमारात आपल्याकडील अस्सल मातीतल्या गोष्टींचे महत्त्व मागे पडता कामा नये, म्हणून त्या नव्याने लोकांसमोर येताना दिसत आहेत. यातच नव्या स्वरूपात आलेले महाराष्ट्राच्या परंपरेतील शानदार वस्त्र म्हणजे धोतर. या वस्त्रातील पुण्यातील उलाढाल किती असेल? विश्वास नाही बसणार.. तब्बल एक कोटी रुपये!*पूर्वी व आता थोड्या फार प्रमाणात आजोबामंडळी धोतर नेसताना दिसत. मात्र, शहरांमध्ये हे प्रमाण फारच अल्प आहे. पण जीन्सच्या जमान्यात धोतराचा ट्रेंड येणे म्हणजे महाराष्ट्रीय संस्कृतीला सुखद धक्काच! पारंपरिक पांढऱ्या रंगाचे कॉटनचे साधे धोतर परिधान करण्याची पद्धत जवळपास बाद झाली होती. मात्र, धोतर आता नवीन स्टाईलमध्ये बाजारात आले आहे. त्यामुळे आजची तरुणाई या कधीकाळी बाद झालेल्या वस्त्राला नव्या रूपात तितक्याच आवडीने स्वीकारत आहे. साडेचारवार ते पाचवार कापड असणारे धोतर हा प्रकार तसा मूळचा उत्तर भारतीय आहे. मात्र, तो महाराष्ट्रात फार वर्षांपूर्वी रुजला. पूर्वी केवळ पांढऱ्या कापडामध्ये येणारे धोतर आज रंगीबेरंगी रंगात आणि विविध प्रकारच्या कापडांत बाजारात उपलब्ध आहे. तसेच एक इंचापासून ते बारा इंचापर्यंतची किनार धोतराला आली आहे. ज्यात प्रामुख्याने काठाच्या साड्यांवरील डिझाईनचे अनुकरण धोतराच्या किनारीवरही दिसून येईल. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, कॉटन, आर्टिफिशिअल सिल्क, प्युअर सिल्क या तीन प्रमुख प्रकारच्या कापडांची जरीकाठ धोतर उपलब्ध होत आहे. राजापुरी पंचा हा हॅंन्डलुम धोतरचा प्रकार सध्या ट्रेंडमध्ये आहे. सोवळं हे आधी केवळ भटजी किंवा पूजेसाठीच नेसले जायचे. पण आता घरातील साध्या पूजेपासून ते कोणत्याही पारंपरिक विधीसाठी सोवळ्याची मागणी असते, असे पारंपरिक वस्त्र विक्रेत्यांनी नमूद केले. धोतर या पारंपरिक वस्त्राचीमागणी पाहता, ‘साडी डे’ प्रमाणे मुलांनी ‘धोतर डे’ साजरा केला तर नवल नसेल.
```जुनी पिढी तर आमच्याकडे येतेच, पण अलीकडे तरुणवर्ग धोतर खरेदीसाठी गर्दी करत आहे. सध्या धोतर कापडाची वार्षिक उलाढाल एक कोटीच्या जवळपास आहे. घरगुती कार्यक्रम, सणउत्सव यासाठी रंगीबेरंगी जरीकाठचे धोतर परिधान करण्याचे प्रमाण वाढले आहे.```
- संजीव बगाडिया, धोतर विक्रेते
पॅंटसारखेच रेडिमेड धोतर!
धोतर नेसण्याचीही एक विशिष्ट पद्धत असल्याने ती प्रत्येकालाच जमत नाही. याच्यावरही फास्ट जनरेशनसाठी रेडिमेड धोतर हा प्रकार आला आहे. धोतर शिवून ते पॅंन्टप्रमाणे घालता येईल, अशीही सोय झाली आहे.=
Tags
नवल