आठवणी बाळासाहेबांच्या

  आठवणी बाळासाहेबांच्या  

फेसबुक लिंक http://bit.ly/3oaSIIE
बाळासाहेबांचा जन्म पुण्यात 23 जानेवारी 1926 रोजी झाला होता. जन्‍माने त्यांचे बाळ केशव ठाकरे असे होते. त्यानंतर मराठीजणांनी त्यांना बाळासाहेब असे नाव दिले. पुढे देशातील लोकांनी हिंदूहृदयसम्राट ही अघोषित पदवी दिली. आपल्या करिअरची सुरुवात त्यांनी दैनिक 'द फ्री प्रेस जर्नल' मध्ये एक कार्टूनिस्‍ट म्हणून केली होती. 1960 मध्ये बाळासाहेबांनी कार्टूनिस्‍टची नोकरी सोडली व आपले राजकीय साप्‍ताहिक मार्मिक काढले. बाळासाहेबांची कार्टून 'टाईम्‍स ऑफ इंडिया'त दर रविवारी छापली जात असत.
चळवळीतील मोठे नेते होते बाळासाहेबांचे वडिल-
बाळासाहेबांचे पिता केशव सीताराम ठाकरे हे संयुक्‍त महाराष्‍ट्र चळवळीतील एक मोठे नेते होते. त्यांनी भाषेच्या आधारावर बनलेल्या महाराष्‍ट्र निर्मितीत योगदान दिले. मुंबईत गुजराती, मारवाडी आणि दक्षिण भारतीय लोकांचा वाढत्या प्रभावाविरोधात जोरदार मोहिम राबवली होती. ज्याचा परिणाम आज दिसून येत आहे. त्यांच्या प्रेरणेतून बाळासाहेबांनी 1966 मध्ये मराठी माणसांच्या हितासाठी शिवसेनेची स्थापना केली होती.

आठवणी बाळासाहेबांच्या

हिटलर आणि लिट्टेचे समर्थक होते बाळासाहेब...

बाळासाहेब आपल्या भाषणात नेहमी हिटलरचे कौतूक करायचे. ते श्रीलंकेत दहशतवादी संघटना मानणा-या लिट्टेचे कौतूक करायचे. व्हॅलेटाईन डेला शिवसेनेचा विरोध ठरलेला असायचा. पोरींना घेऊन फिरणा-या तरूणांना शिवसैनिकांनी चोप दिला की त्यांना ते आवडायचे. हिटलर आणि माझ्यात अनेक बाबतीत समानता आहे. भारतासारख्या देशाला एका हुकुमशहाची गरज आहे असे ते सांगायचे.      
१९९५ मध्ये बनविले शिवसेनेने राज्यात सरकार
शिवसेना आणि भाजपने मिळून 1995 मध्ये महाराष्‍ट्र विधानसभा निवडणूक जिंकली. 1995 ते 1999 पर्यंत शिवसेना नेते मनोहर जोशी महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री राहिले. त्यावेळी भाजप नेते गोपीनाथ मुंडे उपमुख्‍यमंत्री होते. शिवसेनेने द्वेषाचे आणि धमकीचे राजकारण केले. शिवसेनेत बाळासाहेबांचा खरा उत्तराधिकारी राज ठाकरे यांना मानले जात होते. मात्र, बाळासाहेबांनी पुतण्या राज ऐवजी पुत्र उद्धवला गादी सोपवली. अखेर राज सेनेतून बाहेर पडला व मनसेची स्थापना केली.
मुंबई बॉम्बस्फोटात अभिनेता संजय दत्तचे नाव येताच त्याला खरा खलनायक असे बाळासाहेबांनी म्हटले होते. मात्र, संजय त्यांच्यासमोर नतमस्तक झाल्यानंतर त्याच्यावर प्रेम करू लागले. जर संजय खरोखरच दोषी असेल तर त्याला फासावर लटकवा मात्र दोषी नसेल तर त्याला त्रास कशाला देता? असा यू-टर्न बाळासाहेबांनी घेतला होता. माय नेम इज खान या शाहरुख खानच्या चित्रपटावर त्यांनी जाहीर बंदी घातली होती. तसेच शाहरूखला देशद्रोही ठरवले होते.

💫बाळासाहेब कधीच कोणाला भेटायला गेले नाहीत-
बाळासाहेब ठाकरे हे एक असे व्यक्तिमत्त्व राहिले जे आयुष्यभर कोणालाही भेटायला गेले नाहीत. भारतातील सर्व बड्या हस्तींनी बाळासाहेबांची भेट त्यांच्या मुंबईतील मातोश्रीवर जाऊन घेतली. असा नाद खुळा वट होता बाळासाहेबांचा. बाळासाहेब यांचे आणखी एक वैशिष्टये हे होते की, ते एखाद्याचा विरोध करतील ते कट्टर शत्रूसारखा तर कौतूक करतील एकदम जवळच्या मित्रासारखी. बाळासाहेब कोणत्या वेळी काय बोलतील याचा समोर बसलेल्या व्यक्तीला कधीच अंदाज यायचा नाही. त्यांनी माजी पंतप्रधानाची जबरदस्त टीका केली होती. तर कटटर काँग्रेसविरोधी असतानाही इंदिरा गांधींचे कौतूक करताना ते थकत नसत. त्या भारताची दुर्गा आहेत असे ते म्हणत. बाबरी मशिद पाडली तेव्हा संघ व त्यांच्याशी संबंधित परिवार ती जबाबदारी घेण्याचे टाळत असताना बाळासाहेबांनी माझ्या शिवसैनिकांनी मशिद पाडली असेल तर मला गर्व आहे असे जाहीररित्या म्हटले होते. 96 च्या सुमारास गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना बरखा प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत आणि अडचणीत आले होते. त्यावेळी एका जाहीर सभेत गोपीनाथरावांची पाठराखण करताना 'जब प्यार किया तो डरना क्या' असे म्हटले होते.

=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🎖       
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            _*ጦඹիiᎢi

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম