कोल्हापूर : वीजयंत्रणा धोकादायक असल्यास द्या व्हॉटस् अॅपद्वारे माहिती

⚡कोल्हापूर : वीजयंत्रणा धोकादायक असल्यास द्या व्हॉटस् अॅपद्वारे माहिती


कोल्हापूर जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमीनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती मोबाईलच्या व्हॉटस् अॅपद्वारे द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.


कोल्हापूर जिल्ह्यासाठी  7875769103  हा व्हॉटस् अॅप मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर फक्त वीजवितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती किंवा तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. या क्रमांकावर नागरिकांना कॉल करण्याऐवजी फक्त व्हॉटस् अॅपद्वारे माहिती द्यावी. तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉटस् अॅप नाहीत त्यांनी ‘एसएमएस’द्वारे या मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे.
व्हॉटस् अॅपद्वारे प्राप्त झालेली फोटोसह माहिती किंवा तक्रार लगेचच संबंधीत विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात येत आहेत. त्याप्रमाणे वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर संबंधीत तक्रारकर्त्यांना व्हॉटस् अॅपद्वारेच दुरुस्तीनंतरचे छायाचित्र पाठवून कळविण्यात येत आहे.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম