विमानाचा शोध सर्वप्रथम भारतीयाने लावला होता
फेसबुक लिंक http://bit.ly/2LhslTN
आपल्या भारतात चांगल्या कलागुणाचे चीज होत नाही.मग तो कोणता शोध असो किंवा चांगली प्रथा असो. परंतु तीच प्रथा वा शोध परकियांचा असला की आपल्याला धन्यता वाटते. असेच काहीसे विमानाच्या शोधाबद्दल झाले आहे.आधुनिक जगातील पहिले विमानोड्डाण अमेरिकेच्या राईट बंधूंच्याही अगोदर एका भारतीयाने केले होते. विश्वास बसत नाही? होय !! मुंबईतील वेदविद्या पारंगत श्री० शिवकर बापूजी तळपदे ह्यांनी भारद्वाज मुनींच्या ’वैमानिक शास्त्र’ या पुरातन ग्रंथावरून एका विमानाची निर्मिती केली व मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर सर्व लोकांसमक्ष १८९५ वर्षाच्या जून महिन्यात त्या विमानाचे उड्डाण करून दाखवले. प्रस्तुत मानवविरहित विमान १५०० फूट उंच उड्डाण करून मग ते जमिनीवर खाली आले.भारताकडे नेहमीच सगळ्या जगाने तत्त्वज्ञानाची जन्मदात्री म्हणून पाहिले आहे. भारतात निर्माण झालेल्या विचारधारांनी आणि साहित्यकृतींनी जगाला नेहमीच थक्क केले आहे
(पुढे १९०३ या वर्षी म्हणजे तब्बल ८ वर्षांनी विमानविद्येचे जनक मानल्या जाणार्या अमेरिकेच्या राईट बंधूंच्या विमानाने केवळ १२० फूटाचे उड्डाण केले होते.) राईट बंधूंनी विमानाचा शोध १९०३ साली लावण्याच्याही आठ वर्षे आधीच एका मराठी माणसाने हिंदुस्थानात विमानाचे पहिले उड्डाण घडवले होते अन् तेही आपल्या मुंबईतील गिरगाव चौपाटीवर! पण विमान उड्डाणाचा हा पराक्रम करणार्या शिवकर तळपदे यांच्या वारसदारांनी विमानाचे मॉडेल ‘राईट ब्रदर्स’ यांना विकून टाकल्याने विमानाच्या शोधाच्या श्रेयाला हिंदुस्थानला मुकावे लागले. हा अज्ञात इतिहास उलगडला आहे. जगदीश गांधी या लेखकाने. त्यांच्या ‘अ टेल ऑफ थ्री नेटिव्ह टाऊन्स : भुलेश्वर, गिरगाव ऍण्ड मलबार हिल’ या ऐतिहासिक पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे.
महर्षी भारद्वाज यांनी वर्णन केलेल्या वैदिक शास्त्रानुसार ‘मरुत्सखा’ हे पहिलेवहिले विमान १८९५ साली मुंबई स्कूल ऑफ आर्टस् येथे प्राध्यापकी करणार्या शिवकर तळपदे यांनी तयार केले. ते स्वत: महान वैदिक शास्री होतेच, पण त्यांची पत्नीही संस्कृत पंडिता होती. या दोघांनी मिळून विमानाचे एक मॉडेल तयार केले होते. हे चालकविरहीत विमान होते, पण ते प्राचीन ग्रंथात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी बनवले होते.पहिल्या विमानाची निर्मिती करण्याचा मान मराठी माणसाचा असूनही तो राईट ब्रदर्स या ब्रिटीशांना दिला जाणे ही निश्चितच खेदाची बाब असल्याचे गांधी यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे.
या विमानाचे उड्डाण मुंबई चौपाटीवर तत्कालीन बडोदा नरेश सर सयाजीराव गायकवाड आणि मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या लालजी नारायण यांच्यासमोर त्यांनी केले होते. या विमानात एक असे यंत्र बसविण्यात आले होते ज्यामुळे हे विमान १५०० फूट उंचीवर गेले आणि तेथून खाली आले. तळपदे यांनी आपली कलाकृती महादेव गोविंद रानडे यांनाही दाखविली होती. पण याच दिवसांत तळपदे यांच्या पत्नीचे निधन झाले आणि विमानाच्या पुढील आविष्काराकडे तळपदे यांचे दुर्लक्ष झाले. पुढे १७ सप्टेंबर १९१७ रोजी शिवकर तळपदे यांचेही देहावसान झाल्यानंतर त्यांच्या वारसदारांनी विमानाचे मॉडेल ‘राईट ब्रदर्स’ या ब्रिटीश कंपनीला विकून टाकले.
___________________________
Tags
जनरल नॉलेज