गणपती मंडळ असे रजिस्टर करा
पहिला प्रकार म्हणजे काही मोठमोठी मंडळे महाराष्ट्र सार्वजनिक न्यास कायदा १९५० अंतर्गत नोंदणी करतात. तर काही मंडळे कायमस्वरूपी नोंदणीकृत नसतात. त्यांच्यासाठी सार्वजनिक न्यास ४१ (सी) अंतर्गत अल्पकाळासाठी म्हणजे सहा महिन्यांपर्यंत नोंदणी करता येते. यात सर्व खर्च धर्मदाय आयुक्तांना दाखवावा लागतो. मुळात ज्या संस्था नोंदणीकृत असतात त्यांची घटना असते. या घटनेत तीन ते पाच वर्षे असा कालावधी दिलेला असतो. यात निवडणूक घ्यावी लागते. त्यानंतर जो बदल होतो तो धर्मदाय आयुक्तांना कळवावा लागतो. कार्यकारिणी, त्यानंतर दुसरी कार्यकारिणी असते.याआधी गणेशोत्सव मंडळांना स्वतः जाऊन संबंधित कार्यालयांना अर्ज द्यावा लागायचा. मात्र, आता सर्व गोष्ट ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध असल्याने खटाटोप कमी करण्यात आला आहे.
आता नोंदणी अॉनलाईन असुन नोंदणीसाठी धर्मादाय कार्यालयाच्या www.charity.maharastra.ov.in या वेबसाईटवरून नोंदणी करता येते.
अर्ज सादर करताना सदस्यांच्या सहीचा हस्तलिखित ठराव, सदस्यांच्या ओळखपत्राची प्रत (आधार कार्ड,पॅनकार्ड,) जागा मालकाचे परवानगी पत्र, प्रतिष्ठीत व्यक्ती यांचे सदस्यांच्या ओळखीबाबतचे पत्र, मागील वर्षीच्या उत्सवाचे हिशेब आणि मागील वर्षी घेतलेल्या परवानगी पत्राची प्रमाणित प्रत सादर करणे आवश्यक आहे.
🚩या वर्षापासून नव्याने कार्य, उत्सव साजरे करीत असल्यास- नगरपालिका/ ग्रामपंचायत (प्रथम वर्ष उत्सव साजरा करीत असल्याबाबतचे) वरील आशयाचे शिफारसपत्र आवश्यक आहे.
🍭कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर - राज्य शासन व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वेळोवेळी जाहीर झालेल्या अटी व शर्तींचे काटेकोर पालन करण्याची हमी या प्रतिज्ञापत्राव्दारे देत आहोत असे प्रमाणपत्र क्रमांक 5 इतर कागदपत्रांमध्ये असणे आवश्यक आहे.
अर्ज केल्यानंतर या संबंधित माहिती अर्जदाराला ई-मेल द्वारे दिली जाईल. या सोबतच या ई-मेल मध्ये दिलेल्या तपशिलानुसार अर्जदाराने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग द्वारे या साठी आवश्यक अशी रक्कम जमा करायची आहे.
काही अडचण असल्यास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष संपर्क साधल्यास त्यांना मार्गदर्शन करतात.
