गुळाला दर मिळाला नाही म्हणून तात्यासाहेब कोरेंनी साखर कारखाना काढला.
फेसबुक लिंक http://bit.ly/3oYl89z
तात्यासाहेब कोरे हे नाव पश्चिम महाराष्ट्रातील यशस्वी सहकार चालवणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाते. तात्यासाहेब कोरे यांचा. १७ ऑक्टोबर १९१४ रोजी पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे विश्वनाथ कोरे तथा तात्यासाहेब कोरे यांचा जन्म झाला. १९३९ मध्ये कोल्हापूरला स्थापन झालेल्या प्रजापरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यारंभ केला. स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले होते. प्रतिसरकारच्या भूमिगत क्रांतिकारांना आश्रय दिला. पण, संधी मिळूनही त्याचा मोबदला घेतला नाही. वारणेकाठी सहकारी तत्त्वावर साखर कारखाना उभारला आणि त्या परिसराचे नंदनवनात रूपांतर करणे हेच आपले जीवितकार्य मानलेवारणा खोऱ्यातील शेतकऱ्याच्यात खऱ्या अर्थाने सोन पिकवनारे तात्याच आहेत. तात्यासाहेब प्रगतशील शेतकरी होते. त्यावेळीही ते ऊसाची शेती करत, पण कारखाना नसल्यामुळे गुळ उत्पादनासाठी गुऱ्हाळवर ऊस पाठवावा लागत असे. त्यावेळी गुळाला चांगला दर मिळायचा म्हणून सगळी शेतकरी उसाचेच पीक घेत होते.
एका रव्याला 35 ते 40 रुपये भाव मिळाला होता. त्यामुळे त्यावर्षी शेतकर्यांचे चांगले उत्पन्न झाले होते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,पण 1951 हे वर्ष शेतकर्यांसाठी वाईट ठरले करण त्यावर्षी गुळाला सर्वात कमी भाव मिळाला. कोल्हापूरच्या बाजारात गुळ चुळ भरण्यासाठी पाणी झाला. त्यावर्षी गुळाच्या एका ढेपेला सव्वा रुपये ते दोन रुपये एवढाच भाव मिळाला. ज्या गुळाला 1949 या वर्षी 40 रुपये भाव मिळाला होता. त्याच गुळाला 1951 साली फक्त सव्वा रुपये भाव मिळाला होता. चांगला गुळ त्यावेळी चुन्यात मळन्याची वस्तू झाली होती. त्यामुळे बर्याच शेतकर्यांनी ऊस पेटवून दिला होता. तात्यासाहेब कोरेंनीही 18 एकरातील ऊस पेटवला होता. पण त्याच वर्षी साखरेचा दर मात्र उत्तम होता. त्यावेळी गुळाची हलाखी नि साखरेची नवलाखी होती.
अनेक हाल सोसुन त्यांनी शेअर्स जमा केले. 1959 मध्ये तात्यांच्या स्वप्नातील साखर कारखाना वास्तवात आला. 6 नोव्हेंबर 1959 रोजी प्रत्यक्ष साखरेचे उत्पादन सुरू झाले. सुरुवातीला या साखर कारखान्याची गाळप क्षमता 1 हजार टीसीडी होती ती आता 10 हजार टीसीडी आहे. त्यावेळी चांदोलीचे धरण झालेले नव्हते, वारणेचे पाणी वाहून जात होते. त्यावर उपसा जलसिंचनद्वारे पाणी आणून ऊस पिकविण्याचे धाडस केले. त्यांनी वारणेवर 4 बंधारे आणि 65 सहकारी पाणीपुरवठा संस्था उभ्या केल्या. एवढ्यावर न थांबता शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे यासाठी पूरक उद्योगही त्यानी सुरू केले, दुग्धोपादन सुरू करून शेतकऱ्यांचे घरातील महिलांनाही सक्षम केले. आज वारणा हे नावच दुधाची ओळख झाले आहे. साखरेबरोबर कागद आणि विद्युत निर्मिती हे साखर कारखान्याचे पूरक उद्योगही उभे केले.त्यांना विधानसभेसाठी उमेदवारीही मिळत होती पण राजकारण हे माझे क्षेत्र नाही म्हणून त्यांनी नम्रतापूर्वक नकार दिला. त्यांनी वारणा उद्योग समूह आपले कुटुंब मानले व त्याचा विकास हाच ध्यास जपला.
༺━━━━━━━━━━━━━━━༻
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞
_🎈 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 🎈
༺━━━━━━━━━━━━━━━༻
Tags
माहिती