शेवग्याच्या पानांपासून आता चॉकलेट तयार होणार

   शेवग्याच्या पानांपासून आता  चॉकलेट तयार होणार 



दि. २५ फेब्रुवारी २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3uw4hP1
            कार्यक्रम असो वा सणांच्या निमित्ताने नातेवाईक व मित्रांना काय भेटवस्तू द्यावी, असा अनेकांना प्रश्‍न पडतो. शिवाजी विद्यापीठाच्या फूड टेक्नॉलॉजी विभागातील विद्यार्थिनींनी संशोधन करून शेवग्याच्या पानांच्या पावडरचा वापर करून क्रेझी चॉकलेट बनविले आहे.

शेवग्याच्या पानांपासून आता  चॉकलेट तयार होणार


युवा पिढीमध्ये चॉकलेटची क्रेझ दिसून येते. शाळा, महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमावेळी मित्र-मैत्रिणींना चॉकलेट देऊन खूश करण्याचा प्रयत्न केला जातो. सध्याच्या परिस्थितीत मुले जास्त प्रमाणात चॉकलेट खात असल्याचे निदर्शनास आले आहे. याचा होणारा परिणाम विचारात घेऊन विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील फूड टेक्नॉलॉजीमध्ये चौथ्या वर्षात शिकणार्‍या विद्यार्थिनी नेहा बागवान, वैष्णवी घाडगे, अस्मिता नेवसे यांनी व्हेजिटेबल चॉकलेट बनवण्याचे ठरवले. ऑक्टोबर 2018 मध्ये प्रा. डॉ. ए. के. साहू यांच्या मार्गदर्शनाखाली चॉकलेट बनविण्याचा प्रकल्प सुरू केला.  मोरिंगा पावडर म्हणजेच शेवग्याच्या पानांच्या पावडरमध्ये व्हिटामिन ए व सी, मिनरल्स, प्रोटिन्स जास्त असल्याने याचा चॉकलेट बनविण्यासाठी वापर केला. त्याचबरोबर चॉकलेट बनविताना कोको बटर, कोको पावडर, मिल्क पावडर, शुगर, लेसीथीन वापरल्यानेे चांगले चॉकलेट तयार झाले आहे. सध्या हे चॉकलेट कमी प्रमाणात तयार केले असले; तरी मोठ्या प्रमाणात अधिक चांगल्या पद्धतीने कमर्शियलस्तरावर बनविण्याचा प्रयत्न असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. शेवग्याच्या पानांच्या पावडरचा चॉकलेट बनविताना वापर केल्याने हेल्दी चॉकलेट बनविता आले. लवकरच ग्रीन टी व वेगवेगळ्या पालेभाज्यांचा वापर करून चॉकलेट बनविण्याचा मानस आहे. हे चॉकलेट आरोग्यदायी असल्याने याचा मुलांसह मोठ्यांनादेखील फायदा होईल.
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🎖     
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            ϻÃĤĮŤĮ*

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম