लहान वयात केस पांढरे होत असतील तर करा हे उपाय
फेसबुक लिंक http://bit.ly/3cDCjdf
लहान वयामध्येच अनेकांचेकेसपांढरेहोतात. तणाव, चिंता, चुकीचा आहार, अनुवंशिक दोष आणि प्रदुषण ही केस पांढरे व्हायची प्रमुख कारणं आहेत. पांढरे केस लपवण्यासाठी अनेक जण ते कलर किंवा डाय करतात पण नैसर्गिक उपायांनीही तुमचे केस पांढरे होणं थांबवता येऊशकतं. याघरगुती उपायांवर एक नजर टाकूयात. 🍈आवळा - केस पांढरे होणं थांबवण्यासाठी आवळा मदत करतो. यामुळेच तेल आणि शाम्पूमध्येही आवळ्याचा वापर केला जातो. नारळाच्या तेलामध्ये आवळ्याचे तुकडे टाका, हे तुकड्यांना काळा रंग येईपर्यंत ते मिश्रण गरम करा आणि डोक्याला लावा. याबरोबरच आवळ्याचा रस पिला तरीही केस पांढरे होणं कमी होतं.
🌿पेरुची पाने-पेरुची पाने वाटून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट केसांना लावल्याने केस काळे होण्यास मदत होते. पेरुच्या पानात व्हिटॉमिन बी, सी असते. त्यामुळे केसगळती रोखण्यास आणि केस पुन्हा उगवण्यास मदत होते.
🍃कडीपत्ता-कडीपत्ता फक्त पदार्थाचा स्वाद वाढवत नाही तर त्यात अनेक आरोग्यदायी गुणधर्म ही आहेत. कडीपत्ता खोबरेल तेलात घालून रोज त्या तेलाने केसांना मसाज करा. रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवा. असे नियमित केल्यास लवकरच परिणाम दिसू लागेल.,कांदा - गळणारे आणि पिकणारे केस थांबवण्यासाठी कांदा हा उपाय आहे. कांद्यामध्ये कॅटालेस एंजाईम मोठ्या प्रमाणावर असतं. केस पांढरेहोत असतील तर अर्धा कांदा घेऊन तो डोक्यावर चोळा किंवा कांद्याचा रस डोक्याला लावा आणि एका तासानंतर शाम्पूनं केस धुवा. 🎍मेहंदी - केस पांढरे होणं थांबवण्यासाठी डोक्याला मेहंदी लावा. मेहंदी लावताना बनवण्यात येणाऱ्या मिश्रणामध्ये एरंडाचं तेल आणि लिंबाचा रस टाका आणि एक तासापर्यंतहे मिश्रण तसंच ठेवून मग ते डोक्याला लावा.
ही मेंहदी म्हणजे (तयार मिळणारी डाय मेंहदी नव्हे)
☄तिळाचे दाणे - तिळाचे दाणे बदामाच्या तेलात टाकून हे मिश्रण डोक्याला लावा आणिअर्ध्या तासानंतर केस धुवा, यामुळेतुमचे केस पांढरे व्हायचं प्रमाण कमी होईल.
__________________________________
💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव
✆ ░9░8░9░0░8░7░5░4░9░8░
__________________________________
Tags
आरोग्य