भाषा शिकण्यासाठी आपला मेंदू साठवतो 1.5 मेगाबाईट माहिती
दि. १ एप्रिल २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3cDDg5j
आपला मोबाईल किती जीबीचा आहे यानुसार त्याचा प्रोसेसर काम करतो. जर आपल्या मोबाईल मध्ये साठवणूक क्षमता म्हणजे जीबी कमी असेल तर आपला मोबाईल काही दिवसांनी हँग होतो.म्हणजेच त्याची साठवण क्षमता जेवढी जास्त तेवढं तो जास्त वेगाने काम करतो. तसंच अगदी तसंच आपल्या मेंदूच आहे. आपल्या मेंदूची वाढ ही मूल गर्भात असल्यापासूनच होत असते.त्याचा वाढीचा वेग हा आईच्या गर्भात प्रचंड असतो म्हणजे 80% आणि त्यानंतर एक वर्षापर्यंत 15% असा वाढीचा वेग होतो. मित्रांनो माणसाच्या मेंदूवर वळकट्या असतात.हा वळकट्याने बनलेला मोठ्या मेंदूचा बाहेरच्या आवरणाचा भाग म्हणजेच कॉर्टेक्स. इतर अनेक प्राण्यात हा अशाप्रकारे दिसत नाही. या कॉर्टेक्स मुळेच माणसाला बुद्धी मिळते. माणसाचा कॉर्टेक्स सरासरी दोन मिलिमीटर जाडीचा असतो. या कॉर्टेक्सचे सहा थर असतात.या प्रत्येक थरातल्या मज्जापेशी आकाराने वेगवेगळ्या असतात. इतर प्राण्यांना कॉर्टेक्स नसतो असं नाही. पण माणसासारख्या खूप वळकट्या नसतात. माणसाच्या कॉर्टेक्स वरच्या वळकट्या काढून टाकल्या आणि तो एका मोठ्या कापडासारखा अंथरून ठेवला तर त्याचा आकार A4 आकाराच्या कागदाच्या चौपट एवढा होईल. इतर प्राण्यांचे बघितलं तर चिंपांजीच्या बाबतीत असंच केलं तर हा आकार फक्त एकाच A4 कागदाएवढा होईल इतर माकडांच्या बाबतीत हा आकार पोस्टकार्ड एवढा तर उंदराच्या बाबतीत हाच आकार पोस्टाच्या तिकिटाएव्हडा होईल. बुद्धी जेवढी जास्त तेवढे या आवरणातल्या मज्जापेशी जास्त. पण या सगळ्या मज्जापेशी माणसाच्या त्या बाहेरच्या कॉर्टेक्सच्या आवरणावर मावत नाहीत म्हणूनच या सुरकुत्या किंवा वळकट्या पडल्या असाव्यात असा तज्ज्ञांना वाटतं आणि म्हणूनच जेवढे वळकट्या जास्त तेवढी बुद्धी जास्त असंही मानलं जातं.मातृभाषा शिकत असताना मुलं एकूण दीड मेगाबाईटची माहिती आपल्या मेंदूत ग्रहण करतात, असे संशोधकांनी म्हटले आहे. एखाद्या भाषेला खर्या अर्थाने जाणण्यासाठी बाल्यावस्थेपासून युवावस्थेपर्यंतचा काळ जातो. या काळात भाषेची समज विकसित होण्यासाठी एकूण 1.25 कोटी बिटस् डाटा मेंदूत साठवला जातो. याचा अर्थ भाषेवर पकड घेण्याच्या काळात मुलं दर मिनिटाला दोन बिटस् माहिती ग्रहण करतात.
____________________________
WᕼᗩTᔕAᑭᑭ 9890875498* ☜♡☞
‼ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ‼
______________________________
Tags
जनरल नॉलेज