विंचवी म्हणजे मादी विंचू हिच्या🦂 आयुष्याचा न दिसणारा पैलु

विंचवी म्हणजे मादी विंचू हिच्या आयुष्याचा न दिसणारा पैलु 

माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव

१ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3ubC5jz
विंचवांच्या रहायच्या जागा त्यांच्या जातीनुसार वेगवेगळ्या असू शकतात. काही विंचू झाडावर रहातात, काहींना खडक प्रिय असतात तर काही मऊ वाळून रहातात. सर्वसाधारणपणे विंचू हे त्यांनी खास खणलेल्या बिळात रहातात. विंचवाच्या जीवनक्रमातील सगळ्यात वैशिष्टपूर्ण कृती म्हणजे मिलनापूर्वीचे नर मादीचे नृत्य. मिलनासाठी उत्सुक असलेला नर विंचू काळजीपूर्वक मादीजवळ जातो आणि तिच्या नांग्या आपल्या नांग्यांमधे पकडतो. अशाप्रकारे मादीचे आक्रमणाचे शस्त्र नाकाम केल्यावर, नरमादीचे अनोखे मिलननृत्य सुरू होते.
विंचविने मुलांना जन्म दिला की तिचे आयुष्य त्याच क्षणी फक्त आणि फक्त आपल्या पिल्लाना वाचविण्यासाठी पूर्णपणे समर्पित करते ...

विंचवी म्हणजे मादी विंचू हिच्या आयुष्याचा न दिसणारा पैलु

विंचवा विषयी आपल्याला जास्त माहिती नसते.तो विषारी आहे,किळसवाणा प्राणी आगे इतकेच माहिती असते.विंचवाची मादी विंचवी म्हणुयात तिला,श्रेष्ठ मातृत्व समजायचं असेल तर विंचवीला  समजुन घेतले पाहिजे.विंचवी प्रसवते म्हणजे बाळंत होते तेव्हा सरासरी तिला सहा सात पिलं होतात,अगदी अंगठ्याच्या नखावर मावतील एवढी.काही तासांनी पिलांना भुक लागते,निसर्गाचा कोप झालेल्या जीवापैकी एक म्हणजे विंचवी.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,तिला पिलांच पोषन करण्यासाठी कुठलीच व्यवस्था नाही.आता हळुहळु पिलांची भुक अनावर होऊ लागते. विंचवी बिचारी कासाविस होते, पण द्यायला तर काहीच नाही. पिलं तिला चावा घ्यायला सुरुवात करतात ती अंग चोरुन निमुट बसुन रहाते. आता पिलांची भुक अनावर होते, ते विंचवीचेच लचके तोडायला सुरुवात करतात, पहाता पहाता पिलं पोट भरुन तृप्त झालेली असतात, आणि विंचवी बिचारी,हो ती स्वतःच्या पिलांना तृप्त करण्यासाठी स्वतः संपूर्णपणे समर्पित झालेली असते!याला म्हणायचं आईचं आईपण. "आई "मग ती मुंगी, शेळी, वाघीण, गाय असो कि तुमची माझी माय असो, आईपण तेच ! मातृत्व अशी जादु आहे कि जिच्या दातृत्वापुढे देवही फिके आहेत. ज्याला आई समजली त्याला विश्व समजलं. असो,आता आपण वैज्ञानिक भाषेत पाहु,पिल्लांनी आईला खाणं ह्याला विज्ञानाच्या भाषेत ‘मॅट्रीफॅगी’ (मॅट्री – आईशी संबंधित | फॅगी – गिळणे) म्हणतात. विंचवांमध्ये हे फार क्वचीत होतं. सहसा पिल्लं त्यांचं एग्झोस्केलेटन म्हणजे बाह्यकवच कठीण होईपर्यंत संरक्षणासाठी आईच्या पाठीवर राहतात (दहा-पंधरा दिवस). नंतर उतरून आपापल्या वाटेने निघून जातात. पण दरम्यान जर अन्नाची उपलब्धी कमी असेल तर आईवर हल्ला होऊ शकतो. अनेकवेळा अन्नाच्या दुर्भिक्ष्यात आईसुद्धा पिल्लांना खाते. कारण त्यांच्यात तेवढं रेकग्निशन नसतं.
पण बिळं करून राहणार्‍या काही कोळ्यांच्या जातीमधे हे कॉमनली दिसतं उदा वुल्फ स्पायडर किंवा टॅरेंट्युला वगैरे. आई तिची अनफर्टीलाईझ्ड अंडी पिल्लांना खायला देते. आणि ती खाता खाता पिल्लं आईलाही खाताना आढळली आहेत.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম