इव्हीएम मशिन हॅक करता येते का?

 

इव्हीएम मशिन हॅक करता येते का?


इव्हीएम मशिन हॅक करता येते का? 

१९५२ पासुन भारतातील सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर (पारंपरिक शिक्का मारून मतदान) वर घेण्यात आल्या, नंतर काळ बदलत होता, वैज्ञानिक प्रगती होत होती.डिजिटल युग येऊ घातले होते.आणि प्रगत देशात सार्वत्रिक निवडणूका पण डिजिटल म्हणजे इव्हीएम मशिन वर घेणे चालू झाले होते.पण भारतात अजुन त्यावर विचार चालू होता. 

इव्हीएम मशिनचा वापर करण्यास सुरुवात

केरळमधील उत्तर परवूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत १९८२ मध्ये इव्हीएमचा प्रथम वापर करण्यात आला.इलेक्ट्रॉनिक मतदान हे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा वापर करून निवडणूक घेण्याचे मानक साधन आहे हे मान्य करण्यात आले.निवडणूक प्रक्रिया अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी तसेच मतदान केंद्रावरील बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी ही यंत्रणा आणण्यात आली होती. त्यावेळी १९९४ मध्ये केंद्रात कॉंग्रेस सरकार होते.मनमोहन सिंग हे अर्थमंत्री तर नरसिंहराव पंतप्रधान होते. त्यांनी या मशिनचा सर्व प्रथम स्विकार केला व निवडणूक आयोगाने त्याचा प्रत्यक्ष वापर सर्वप्रथम स.न १९९८ साली दिल्ली, राजस्थान व मध्यप्रदेश विधानसभांच्या निवडणूकीत प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आला.हा प्रयोग यशस्वी झाला तोवर केंद्रात वाजपेयी, देवेगौडा, गुजराल यांची सरकारे येत होती.जात होती तोवर कोणत्याही पक्षाने या मशिन विरुद्ध तक्रार केली नव्हती म्हणुन निवडणूक आयोगाने ही मशिन देशात सर्वत्र वापर करण्यास सुरूवात केली. 

पण १९९८च्या एका राज्याच्या विधानसभा निवडणुकीत एका राजकीय पक्षाच्या उमेदवार पराभूत झाला पण त्याने त्याचे खापर पक्षाच्या नेत्या वर कसे फोडायचे? म्हणुन इव्हीएम मशिनवर फोडले. झाले या गोष्टीचा गवगवा झाला व येथुनच मशिनवर शंका घेणे चालू झाले. तेव्हापासून आतापर्यंत पराभूत झालेला राजकीय पक्ष व उमेदवारांकडून कायमच ईव्हिएमच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले गेले

ईव्हीएम वर  २ प्रकारचे आरोप कायम केले आहेत.

१) ईव्हीएम चांगले काम करीत नाही.

२) ईव्हीएम मशिन हॅक केले जाते.

खरोखर मशिन हॅक केले जाऊ शकते का? 

भारतात ईव्हीएम मशिनची निर्मिती ही 'भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड' या कंपनीकडून केली जाते आणि त्यात असलेली प्रोग्रॅमिंगची चीप ही वन टाईम लोडेड  केलेली असते.म्हणजे ती एकदा बसवली की पुन्हा दुरुस्त होत नाही किंवा त्यामध्ये घातलेला  प्रोग्राम नंतर कोणालाही बदलता येत नाही. त्यामुळे त्यात फेरफार करणे शक्य नाही. कारण जर असा प्रयत्न कोणी केला तर त्यात बिघाड होऊन ते मशीन भंगारात टाकण्याच्या योग्यतेची होईल. समजा एका ब्रॅण्डेड कंपनीचा मोबाईल दुसऱ्या तत्सम कंपनीने घेऊन त्या मोबाईलच्या सॉफ्टवेअर मध्ये फेरफार करून  आपल्या कंपनीचे नाव घालण्याचा प्रयत्न केला तर त्या ब्रॅण्डेड कंपनीचा मोबाईल काम करणे बंद होईल.तसे या मशिनचे आहे. 

दुसरा एक आरोप करतात की ब्लयुटुथ द्वारे दुरून  हे मशिन हॅक करतात.पण वस्तुस्थिती अशी आहे की, मोबाईल,कॉम्युटर किंवा लॅपटॉप हे इंटरनेट किंवा ब्लू – टूथ च्या माध्यमातून बाहेरून नियंत्रित करता येते.तशी त्यात सोय असते परंतु, ईव्हीएम मध्ये असे काही नसल्यामुळे ते कोणालाही नियंत्रित करता येत नाही.म्हणुन ईव्हीएम हॅक करणे अशक्य आहे.

 दुसरे उदाहरण पहा, ईव्हीएम हे वन टाइम लोडेड सॉफ्टवेअर मशिन आहे.त्यात बदल करता येत नाही उदा. कॅलक्यूलेटर. कॅलक्यूलेटर कोणाला हॅक करता येईल का ?

आपल्या देशात कितीतरी टॅलेंट सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत.आणि ते वेगवेगळ्या पक्षाचे समर्थक आहेत ते याचे उत्तर देऊ शकतील. 

इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या काळात  जेव्हा बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायच्या तेव्हापण बॅलेट पेपरवर मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला गेला आहे.असे मतपत्रिका अशा कागदापासून बनविल्या आहेत की काँग्रेस सोडून कोणालाही मत दिले तरी ते आपोआप पूसले जाते. असा आरोप शाईच्या बाबतीत सुद्धा केला होता. 

भारताने जॉर्डन, मालदीव, नामिबिया, इजिप्त, भूतान आणि नेपाळला ईव्हीएमशी संबंधित तांत्रिक सहाय्य दिले आहे.  या देशांमध्ये भूतान, नेपाळ आणि नामिबिया हे भारतात बनवलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर करत आहेत.

 ब्राझील, भारत आणि फिलीपिन्ससह जगातील काही मोठ्या लोकशाहीमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे वापरली जातात.  अजुन काही देश या मशिनची उपयुक्तता पाहुन हे मशिन वापरणार आहेत. 


1. बेल्जियम


 2. एस्टोनिया


 3. व्हेनेझुएला


 4. संयुक्त अरब अमिराती


 5. जॉर्डन


 6. मालदीव


 7. नामिबिया


8. इजिप्त


 9. भूतान


 10. नेपाळ

अमेरिका, जर्मन येथे अजुनही बॅलेट पेपरवर निवडणुका होतात कारण त्या देशाची घटना व न्यायालया त्यांना इव्हीएम मशिन वापरण्यास परवानगी देत नाही.आयलँड या देशाने तर भारताप्रमाणे ईव्हीएम वापरण्यास सुरुवात केली आहे.

माहितीसाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की, ईव्हीएममध्ये डेटासाठी फ्रिक्वेन्सी रिसीव्हर वा डिकोडर नसते. हे कोणत्याही वायरलेस डिव्हाईस, वाय-फाय वा ब्लूटूथसारख्या यंत्राने हॅक करणे, छेडछाड करणे सोपे नाही

EVM बाबत मुद्धाम रान उठवणे सुरू आहे श्री कांबळे एस आर यांचा प्रत्यक्ष अनुभव......

मी स्वतः दोन्ही प्रकारे मतदान प्रक्रियेत सामील झालो होतो. त्यात आधी बॉलेट बॉक्स होते नंतर EVM आले.

मी केंद्र सरकारी ऑफिसर होतो त्यामुळे मी आणि आमच्या ऑफिस मधील माझ्या इतर सहकारी वर्गाने म्हणजे सुमारे 450 लोकांनी मतदान प्रक्रियेत ट्रेनिंग घेऊन प्रत्यक्ष मतदान लोकानकडून करून  घेतले आहे. 

आमच्या ऑफिस मधील लोकांनी पोलिंग ऑफिसर, presiding ऑफिसर आणि एरिया इन्चार्ज (observer) असे वेगवेगळे काम केले आहे. 

मी पोलिंग ऑफिसर आणि presiding ऑफिसर म्हणून बऱ्याच मतदानाच्या वेळेला काम केले आहे. 

प्रत्येक वेळी जिल्हा returning ऑफिसर हे सर्व निवडणूक प्रक्रियेत समावेश असलेल्या लोकांना ट्रेनिंग देते. 

मतदान सुरू करणेचे अगोदर प्रत्येक पोलिंग स्टेशन मध्ये माँक पोल घेतले जाते. जसे समजा ७.३० ला मतदान होणार असते तेव्हा ७ वाजताचे सुमारास सदर माँक पोल घेणे बंधनकारक असते. असे माँक पोल दोन वेळा देखील करू शकता. 

माँक पोल घेताना सर्व पक्षाचे पोलिग एजंट हे हजर असावेत त्यांना कोणतीही आडकाठी नसते. त्यांच्या समोरच सदर माँक पोल करायचे असते. अर्थात काही वेळेला काही पक्षांचे पोलीग एजंट वेळेवर उपस्थित राहत नाहीत तेव्हा त्यांचा साठी थांबणे बंधनकारक नाही. परंतु तरीही माँक पोल करणे presiding ऑफिसर वर बंधनकारक असते. सर्व बूथ मधील हजर असलेल्या पोलिंग एजंट आणि पोलिंग ऑफिसर तसेच पोलीस ऑफिसर यांच्या समोर माँक पोल घेऊन ते बरोबर आहे का हे तपासले जाते. काही तांत्रिक बिघाड असेल तर पोलिंग मशीन तात्काळ बदलली जाते यात ballet unit आणि कंट्रोल युनिट असे दोन्ही मशीन असतात. 

काही हजार मशीन मध्ये एखादी मशीन खराब असू शकते.  माँक पोल मध्ये सर्व पक्षाच्या लोकांना   random मतदान केल्या नंतर ते त्याप्रमाणे बरोबर येते आहे का हे तपासले जाते. म्हणजे एका उमेदवाराला १० मते, दुसऱ्याला ३, तीसऱ्याला ७ असे काहीही संख्येत मतदान करून ते बरोबर आल्यानंतर सदर मशीन परत क्लिअर करून सिल केली जाते त्यावर उपस्थित सर्व पक्षाच्या पोलिंग एजंट ची स्वाक्षरी होते आणि presiding ऑफिसर देखील सही करतो आणि सदर मशीन पुढे प्रत्यक्ष मतदानासाठी वापरली जाते.

मतदान संपल्यावर परत सदर मशीन क्लोज करून एकूण किती मतदान झाले आहे हे नमूद केले जाते. पोलिंग ऑफिसर जो मतदान करायला येतो त्याचे नावावर टिक करतो आणि एक चार्ट असतो त्यात किती मतदान झाले हे नमूद करत असतो त्याची एकूण बेरीज आणि मशीन ची एकूण मतदान झालेली टोटल जुळते आहे का हे तपासले जाते. त्यानंतर मतदान यंत्र (मशीन) सिल केली जाते त्यावर उपस्थित उमेदवारांच्या पोलिंग ऑफिसरच्या सह्या घेतल्या जातात शिवाय सदर मशीन एका बॉक्स मध्ये ठेवली जाते आणि सदर बॉक्स पण सिल केले जाते त्यावर पण उपस्थितांच्या सह्या घेतल्या जातात. पोलिंग चे सर्व कागद पत्र त्यात मतदार याद्या, पोलिंग चार्ट, शाई  पोलिंग रिपोर्ट इत्यादी असते ते सर्व सिल केले जाते. पोलीस बंदोबस्तात सर्व मशीन आणि कागद पत्रे एकत्र करून ठराविक ठीकाणी म्हणजे त्या मतदार संघात एकत्र मत मोजणी साठी नेल्या जातात. 

मत मोजणी करताना प्रत्येक मशीन ही सिल चेक करून मग उघडली जाते आणि त्यावर किती मतदान आले आहे याची टोटल घेतली जाते आणि उमेदवार निहाय किती मतदान झाले हे नोंदवले जाते. त्यावेळी उपस्थित उमेदवार प्रतिनिधी हे स्वतः हजर असतात. त्यात काही गडबड असेल तर लगेच त्यावर अक्षेप घेता येतो. आक्षेप आल्यावर प्रत्यक्ष मतदान किती झाले ते मशीन चा रिपोर्ट, कागदावर presiding ऑफिसर ने तयार केलेला रिपोर्ट आणि मतदार यादी याप्रमाणे चेक केले जाते आणि नंतर निर्णय दिला जातो. शिवाय आता vvpat म्हणजे तुमच्या मतदानानंतर मशीन मधून तुम्हाला तुमचे मतदान बरोबर झाल्याची स्लीप मिळते. 

https://en.wikipedia.org/wiki/Voter-verified_paper_audit_trail

काही पक्षाच्या लोकांना, काही निगेटिव्ह लोकांना उगीच काहीही बरळत जायचे आणि काहीही आरोप करायची सवय आहे. आपली खरी लोकशाही आहे हे मी प्रत्यक्ष अनुभवलेले आहे आधी मतपत्रिका आणि बॅलेट बॉक्स पळवणे, बुलेटचे जोरावर मतदान करून घेणे, कोणीही गुंडांनी शिक्के मारणे, तुमचे मतदान झाले आहे तेव्हा तुम्ही निघा, presiding ऑफिसरला दम देऊन, मारहाण करणे असे सर्व प्रकार रोखले गेले आहेत. शिवाय निवडणूक खर्च हा पेपर द्वारे निवडणूक घेतली तर खूप जास्त होतो आणि त्याच्यात वेळ आणि पैसा यांचा अपव्यय होतो त्यामुळे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा वापर करणे खूप सोईस्कर आहे.

EVM वर सुप्रीम कोर्टाने देखील  निर्णय दिले आहेत, कित्येक वेळेला जनहित याचिका फेटाळल्या आहेत. त्याची लिंक खाली देत आहे.👇

https://www.livelaw.in/amp/top-stories/supreme-court-dismisses-pil-seeking-independent-audit-of-evm-source-codes-238408

रोजच्या व्यवहारात आपण गुगल पे चा वापर करून जगासमोर चांगला आदर्श घालून दिला आहे. जवळ जवळ ९५% जनता ही डिजिटल पेमेंटचा वापर करते आहे तेव्हा आपण पुढे जायचे, प्रगती करायची की काही ठराविक लोकांच्या अप प्रचाराला बळी पडून उगीच शंका घ्यायच्या. 

═━═━═━═━═━═━═

इलेक्शन कमिशन मधील निवडणूक यंत्रणेचे बाबत वेगवेगळे HANDBOOK ची लिंक खाली देत आहे. त्यात काही चूक आहे का हे तपासा आणि काही चूक असेल तर दुरुस्त करणे साठी कमिशनला आग्रह करा.👇

https://old.eci.gov.in/files/category/3-handbooks/

═━═━═━═━═━═━═

काही जण दावा करतात की, चंद्रावर गेलेले यान आपण येथुन नियंत्रित करतो मग इव्हिएम का नियंत्रित करू शकत नाही? 
-गुगल पे चा लाखो लोक वापर करतात तेव्हा त्यांना विश्वास असतो की, गुगल पे सुध्दा दुरवरून नियंत्रित करता येऊन पैशाची अफरातफर करता येते नाही असे नाही म्हणून कोणीही गुगल पे वापर करणे सोडलेले नाही. कारण "विश्वास" तसाच विश्वास इव्हिएम बद्दल ठेवायला हवा. 

═━═━═━═━═━═━═

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম