किल्ल्यासारखं घर बांधणारा शिवप्रेमी : निलेश जगताप
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खामगाव मध्ये निलेश जगताप या युवकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी व पुढील पिढीमध्ये हा वारसा उतरण्यासाठी या शिवप्रेमीने थेट किल्ल्याच्या आकाराचे घर बांधले आहे. हे घर सध्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.या घराचा दरवाजा हा महाकाय बनवण्यात आला असुन तो छ शिवाजी महाराजांच्या काळात असणारया बांधकामासारखा आहे. घरासमोर पारंपारिक तुळशी वृंदावन देखील उभारण्यात आले आहे. हे घर सुमारे २५७७ स्वकेर फुटामध्ये बांधण्यात आले आहे. या आगळ्यावेगळ्या घराच्या आतमध्ये देवघर, सभागृह, ३ बेड,किचन,स्टोअर रुम,बाथरुमला आधुनिक टच देण्यात आला आहे.या घराबद्दल निलेश म्हणतात की, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा भक्त आहे. मला लहान पणापासून किल्ले बनवण्याची , किल्ल्यांवर फिरायला जाण्याची आवड होती. त्यामुळे लहान पणापासूनच माझ्या वर महाराजांच्या विचारांचा वारसा असल्याने मी हे घर बांधले आहे.त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवावा यासाठी माझ्या डोक्यात घर बांधण्याची कल्पना आली. हे घर बांधण्यासाठी जवळजवळ १ कोटीहुन जादा रुपये खर्च आला असून हे घर बांधायला दोन वर्षांचा कालावधी लागला आहे. तसेच या घराला आतून सर्व पारंपारिक वाड्यासारखा लूक देण्यात आला असून घराचे छत उतारासारखे करण्यात आले आहे.