दारूच्या मापाला 'पेग' का म्हणतात?

 दारूच्या मापाला 'पेग' का म्हणतात? 


भारतामध्ये दारूच्या ठराविक मापाला किंवा परिमाणाला वेगवेगळ्या भाषेत नावे आहेत.मराठी मध्ये पुर्वी या मापाला 'कच' असे नाव होते.पण या कचाला पण ठराविक साचेबद्ध परिमाण नव्हते.एका ग्लास मध्ये ठराविक माप झाले की त्याला कच म्हणत असत पण हे ग्लास प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या आकाराचे असले तरी त्याला ठराविक मापन पद्धत नव्हती.

दारूच्या मापाला 'पेग' का म्हणतात?
भारतावर इंग्रजी अमंल सुरू झाल्यावर इंग्रज लोक दारू पित असत त्याला 'पेग' म्हणत असत.हा पेग म्हणजे किती मापाचा किंवा परिमाणाचा असावा याबद्दल इंग्रजानी मापन पद्धती आणल्यावर त्याला ठराविक मापामध्ये मोजले जाऊ लागले.तरीही खेडोपाडी अजुनही 'कच' ही जुनाट पध्दत वापरात होती. 

पेग या मापनाबद्दल असे सांगितले जाते की, १६ व्या शतकात इंग्लंडमध्ये कोळशाच्या खाणीत कडाक्याच्या थंडीतही मजूर काम करत असत. काम सुटल्यावर संध्याकाळी जेव्हा ते आपला रोजंदारी भत्ता घेण्यासाठी मालकाकडे जात होते. त्यावेळी खाणीचे मालक मजुरांच्या हाती पगारासोबतच श्रमपरिहार म्हणून ब्रँडीचा ग्लास देत  असत.ती दिलेली  ग्लासभर ब्रँडी पिऊन हे मजुर मौजमस्ती करायचे.गाणी गायचे नाचायचे व स्वत चे मनोरंजन करायचे तेव्हापासून ते या ग्लासाला प्रिशियस इविनिंग ग्लास (Precious Evening Glass) असं म्हणू लागले. पुढे जाऊन याच शब्दाचं लहान स्वरुप म्हणून PEG हा शब्द अस्तित्वात आला आणि प्रचलित झाला तोच हा 'पेग' होय. 

नंतर यामध्ये सुधारणा होऊन ३० मिली म्हणजे एक पेग हे परिमाण अस्तित्वात आले.60 मिली परिमाण असलेला पेग मोठा मानला जातो, तर 30 मिली परिमाण असलेला पेग लहान मानला जातो.'पटियाला पेग' हा  पंजाबमध्ये लोकप्रिय असलेल्या मद्याचे मोजमाप आहे.हे प्रमाण अंदाजे १२० मि.ली.च्या समतुल्य आहे.

आतासुद्धा बारमध्ये या परिमाणानुसार दारू दिली जाते

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম