गाडीचा ब्रेक फेल झाला तर काय करावे?

 

 गाडीचा ब्रेक फेल झाला तर काय करावे?

तुम्ही गाडी चालवताना गाडीला कधी काय होईल काय  हे सांगता येत नाही.काहीही होऊ शकते यासाठी गाडी व्यवस्थित चालवयला येणे आवश्यक आहे. कारण गाडी चालवताना  एक चूक महागात पडू शकते. कार चालवताना गाडीला काय होईल, कोणता पार्ट कधी खराब होईल  हे सांगता येत नाही.

गाडीचा ब्रेक फेल झाला तर काय करावे?

अशी कार कंट्रोल करा-

तुमच्या गाडीचा ब्रेक फेल झाला तर घाबरू नका. हळूहळू गाडीचे गियर आणि वेग कमी करा. जर तुम्ही गाडी टॉप गियरमध्ये चालवत असाल तर आधी वेग कमी कमी करत गियर खाली करा. पण असे करताना एका झटक्यात पाचव्या गियरवरून पहिल्या गियरमध्ये आणू नका. यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. या दरम्यान वारंवार ब्रेक दाबत राहा. असं केल्याने ब्रेकला प्रेशर मिळतं आणि तो काम करू लागतो.

हँडब्रेक वापरा- कारचा वेग नियंत्रणात येत आहे असे वाटल्यानंतर गाडी दुसऱ्या गियरमध्ये आणा. वेग ४० किमी प्रतितास असल्यास हँडब्रेक खेचून गाडी थांबवू शकता. पण अशा वेळी मागून कोणतं वाहन येत नाही ना हे अवश्य पाहा. दुसरीकडे गाडीचा वेग जास्त असताना हँडब्रेक खेचला तर गाडी पलटी होऊ शकते हे लक्षात ठेवा.

रिव्हर्स गियर टाकू नका- गाडी ब्रेक फेल झालेल्या  स्थितीत कार चुकूनही रिव्हर्स गियरमध्ये टाकू नका. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एक्सलेटरचा वापर करू नका आणि फक्त क्लचचा वापर करा. अशा स्थितीत तुम्ही एसी ऑन करा. त्यामुळे इंजिनवर दाब वाढेल आणि वेग कमी होईल.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম