मजले पठारावरील अदभुत दगडी कोडे

 मजले पठारावरील अदभुत दगडी कोडे


रविवार दि २ आॉक्टोबर २०२२ रोजी मी व माझे मित्र विक्रम धनवडे भादोले सकाळी ९ वाजता मजले येथील डोंगरावर जाण्यासाठी निघालो.मजले हे गाव हातकणंगले पासुन चार किमीवर आहे तर पेठवडगाव पासुन हे अंतर सुमारे १९ किमी आहे

मजले या गावी डोंगरावर पठारावर वर्तुळाकार दगडी प्रचिन कोडे आहे हे समजले होते यासाठी प्रथम मजले गाठले  गावात जाऊन चौकशी केली असता तेथील लोंकानी सांगितले की, मजले गावातुन त्या ठिकाणी जाण्यास अंतर खुप लांब पडते त्यापेक्षा बाबुजमाल या ठिकाणी गेल्यास तेथुन हे अंतर जवळ पडेल.

हातकणंगले- कुंभोज रोडवर बाबुजमाल फाटा लागतो.रस्त्यापासुन ३ किमी आत कच्चामिक्स डांबरी रस्ता गेला आहे. रस्त्याला दुतर्फा हिरवीगार पिके, एक दोन घराची वस्ती वगळता हा भाग निर्मनुष्य आहे.रस्ता वळणदार असुन डोंगराच्या पायथ्या पर्यन्त चांगला आहे.डोंगराच्या पायथ्याशी 'बाबुजमाल' या मुस्लिम संताची समाधी आहे.सभोवती डोंगर असुन डोंगरातुन आलेल्या आोढ्याच्या काठी गर्द झाडाखाली हा दर्गा आहे.येथे तुरळक भाविक येत असतात. 

येथुन वर डोंगरावर पायवाट गेली असुन ती खडतर चढाईची व दमछाक करणारी आहे, निसरडया दोन-दोन वाटा,व बाजुला दिसणारी दरी पाहत आपण वर पठारावर पोहोचतो.वर गेल्यावर झोंबणारा वारा अंगाला लागल्यावर शीण नाहीसा होतो. पठारावरून समोर बाहुबलीचा डोंगर, कुंभोज गाव व तळे स्पष्ट दिसते. पठारावर गेल्यावर चौबाजुला पायवाटा दिसतात त्यामुळे नक्की कोठे जायचे समजत नाही सुदैवाने आम्हाला मेंढरे चारणारा धनगर भेटला त्याला या दगडी कोडयाबद्दल विचारले असता त्याने लगेच दाखवण्याची तत्परता दाखवली व आम्हाला घेऊन तो दानोळीच्या दिशेने जाणाऱ्या पायवाटेने घेऊन गेला पाचच मिनिटांत आम्ही त्या दगडी कोडयाजवळ पोहोचलो. 

 सपाट मैदानावर लहानमोठ्या दगडगोठंयाची मांडणी केलेले हे कोडे आहे,महाभारतात युध्दातील चक्रव्यव्हु ज्या आकाराचा होता तशी मांडणी या दगडाची असुन इशान्य बाजुकडुन प्रवेश करून सर्व गोलातुन फिरून विनाअडथळा नैऋत्य बाजुकडुन बाहेर येणे अशी ही योजना केलेली आहे. या मार्गावरून जाताना एकाच मार्गावरून परत जायचे नाही असा नियम आहे. 

मजले पठारावरील अदभुत दगडी कोडे

याबद्दल धनगराला विचारले असता तो म्हणाला की, मी लहानपणापासून या डोंगरावर मेंढ्या चरावयास येतो तेव्हापासून हे असेच आहे, त्याचा आजोबा, वडीलही याबाबत बोलताना हे कोडे आहे असे सांगत असत. 

मजले पठारावरील अदभुत दगडी कोडे
डोंगरपठारावरील दगडी कोडे

आम्ही या दगडी रचनेतुन चालत जाऊन कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला असता जाताना व्यवस्थित गेलो पण येताना काहीतरी चुकले. 

या दगडी संरचनेबद्दल माहिती घेतली असता असे समजले की, ही रचना अश्मयुगातील किंवा प्रागैतिहासिक काळातील मानवाने केलेली असावी. पण तिचा कालखंड ठरविता येत नाही. ही रचना करण्यामागे काय कारण असावे हे आजतरी अज्ञात आहे. अशाच प्रकारची रचना कोकणातील गोव्यात रिवण व सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी येथे आहे. अभ्यासकांच्या मते, या दगडी संरचना भारत- रोम दरम्यान इसवी सनापूर्वीपासून चालू असलेल्या व्यापार आणि व्यवहारावर प्रकाश टाकतात.  घाटमाथ्यावरील कृष्णा नदी खोर्‍यातल्या आणि घाटमाथ्यावरच्या गावांचा ऐतिहासिक रामघाट मार्गातून प्राचीन काळी पश्‍चिम किनारपट्टीवरून होणारा  व्यापार यावर  प्रकाशझोत टाकु शकतो.
तसेच मानवी समाजाच्या अगम्य इतिहास आणि संस्कृतीच्या अभ्यासकांच्या द‍ृष्टीने महत्त्वाच्या आहेत.यारचना प्रागैतिहासिक असल्या तरी (प्रागैतिहासिक म्हणजे ज्या इतिहासाचा कोणत्याही प्रकारचा लिखित स्वरूपात पुरावा अथवा वाङ्ममय उपलब्ध नाही.) त्याचा हेतु मात्र अज्ञात आहे.काहीच्या मते ही संरचना परग्रहावरील मानवाची असावी अशी शंका आहे.

मजले पठारावरील अदभुत दगडी कोडे

या पठारावर व परिसरावर आदी मानवाची पाऊले उमटलेली आहेत हे समजल्यावर क्षणभर रोमांचित होते.हा पठार परिसर आहे तो एकेकाळी व्यापार, उद्योगात गुंतलेल्या मानवी समुदायाशी निगडित होता असे म्हणतात. दिवसा दिसणारा सूर्य अन् रात्री दिसणाऱ्या चंद्र यांच्या प्रेरणेतून  आदिमानवाने  ज्या कलाकृती निर्माण केल्या त्यामध्ये सर्पकुहर ज्याला आपण लॅबरीन्थ (Labyrinth) म्हणतात.ग्रीक शब्द 'लॅबिरिंथॉस' चा शब्दशः 'दुहेरी कुऱ्हाडीचे ठिकाण' असे भाषांतरित केले जाऊ शकते ज्यात 'लॅब्रीज' म्हणजे 'दुहेरी अक्ष' आणि 'इन्थोस' म्हणजे 'स्थान होय. चक्र' हा शब्द संस्कृतच्या 'व्हर्टेक्स' शब्दापासून बनला आहे.

सर्पकुहर म्हणजे काय? 

सर्प वेटोळा घालून जसा बसतो तशी याची रचना असल्याने याला सर्पकुहर म्हटले गेले आहे. यालाच चक्रव्यूह असेही म्हणतात. हा एकेरी वळणावळणाचा मार्ग असलेला एक प्राचीन पुरातन प्रकार आहे जो बाहेरील काठावरुन मध्यभागी जातो. चक्रव्यूहाच्या विपरीत, जे कोडे सोडवण्यासाठी किंवा गोंधळात टाकण्यासाठी डिझाइन केलेले असते. चक्रव्यूहाचा एक मार्ग आहे आणि एक मार्ग बाहेर आहे.सुमारे ४००० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ, चक्रव्यूहाचा वापर एक सराव म्हणून केला जात असावा. ज्यामध्ये चालणे, शांतता आणि ध्यान यांचा समावेश होतो.  चक्रव्यूह प्रत्येक संस्कृतीत आणि जवळजवळ प्रत्येक खंडात आढळतात.

चक्रव्यूह म्हणजे नक्की काय?

 चक्रव्यूह म्हणजे  एकल-पथ चक्रव्यूह आहे.  सामान्यतः चक्रव्यूहात एक प्रवेशद्वार असते जे शेवटी मध्यवर्ती वर्तुळाकडे घेऊन जाते.तिथून चालणारा  पुन्हा प्रवेशद्वारापर्यंत पोहोचेपर्यंत चक्रव्यूहाच्या वळणाच्या मार्गाने त्यांची पावले परत शोधू शकतात.

मजले पठारावरील अदभुत दगडी कोडे
ग्रीक नाण्यावर प्रतिक्रुती

 चक्रव्यूहाचा इतिहास मोठा आहे- ते ग्रीक पौराणिक कथांचा एक भाग होते आणि इ. स. पुर्व ४३० च्या सुरुवातीच्या काळात नाण्यांवर आढळतात. आणि प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये त्यांचे चित्रण करण्यात आले आहे. तसेच मध्ययुगीन काळात, चर्चच्या भिंती आणि मजल्यांवर चक्रव्यूह बांधले गेले आहेत.

या मध्ययुगीन चर्च चक्रव्यूहांपैकी सर्वात "प्रसिद्ध" पॅरिसच्या बाहेर चार्टर्स कॅथेड्रलमध्ये आढळून आले आहेत.

ग्रीक नाण्यावर प्रतिक्रुती

ग्रीक पौराणिक कथेनुसार, भूलभुलैया ही नॉसॉस येथील क्रेटचा राजा मिनोस याच्यासाठी पौराणिक आर्टिफिसर डेडेलसने डिझाइन केलेली आणि बांधलेली एक विस्तृत रचना होती. 

 नॉसॉसने या पौराणिक कथेचे चित्रण करणारे एक नाणे समोरच्या बाजूला मिनोटॉर आणि उलट्या बाजूला चक्रव्यूहाचे चित्रण करून जारी केले होते.

ग्रीस आणि रोमच्या विविध प्राचीन स्थळांवरही चक्रव्यूह दिसतो. चक्रव्यूह असलेले वर्तुळ आणि सर्पिलची प्रतिमा एका चकचकीत पण उद्देशपूर्ण मार्गामध्ये एकत्र करते. ग्रीक कथानुसार हे त्याचा उपयोग दुष्ट आत्म्यांना पकडण्यासाठी, पवित्र नृत्यांचा मार्ग चिन्हांकित करण्यासाठी, कॅलेंडरचा एक प्रकार म्हणून आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी एक साधन म्हणून केला जातो. आपल्या स्वतःच्या केंद्रापर्यंत आणि पुन्हा जगाकडे परत जाण्याचा प्रवास दर्शवते. (गुगल मॅप येथे पहा- लिंक https://maps.app.goo.gl/AmGfHxUtSM8VeoCy5

असा हा प्रचिन इतिहास दर्शवणारा प्रवास अवघ्या दोन तासात संपवुन आम्ही परत आलो. 

-अनिल पाटील, पेठवडगाव

9890875498

YouTube video link 

https://youtu.be/51VUoSyMp8M

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম