बेळगाव जवळचा किल्ला "राजहंसगड"
दि ३ फेब्रुवारी २०२१
गोव्याकडील पोर्तुगीज व कोकणातील जंजिऱ्याच्या सिद्दीला लगाम घालण्यासाठी शिवाजी महाराजांनी बेळगाव भागातील राजहंसगड या किल्ल्यांचा उपयोग केला. एका गडावरून दुसरा गड नजरेस पडत असल्याने एका गडावरून दुसऱ्या गडावर संदेश देणे शक्य होत असे. या गडाच्या आसपास पारगड, वल्लभगड, सामानगड हे किल्ले आहेत. राजहंसगड हा येल्लुर जवळ असल्याने या गडास "येल्लुरगड" असेही म्हणतात.
बेळगाव पासून १५ किमि अंतरावर असलेल्या येळ्ळूर या गावच्या माथ्याशी आहे. इ.स. ८७५ ते १२५० दरम्यान बेळगाव मध्ये रटृा राजवंशाची राजवट होती, इ.स. १२१० ते १२५० काळात त्यांनी हा किल्ला बांधला.त्यानंतर १५व्या शतकात आदिलशाही सत्ता आल्यावर विजापूरचा पर्शियन सरदार असद खान लारी याने ह्या किल्ल्याचे दगडात बांधकाम करून पुन्हा नूतनीकरण केले.त्यानंतर बहमानी, चालुक्य, शातवाहन, कदंब, मराठा, पेशवे, मुघल, टिपु सुलतान आणि ब्रिटीश राजवट यांसारख्या अनेक सत्ता या किल्ल्यावर राज्य करुन गेल्या.
गडाचा मुख्य दरवाजा या बुरूजाआड लपला आहे. गोमुखी बांधणीच्या या दरवाजातून आपला थेट गडात प्रवेश होतो. गडाच्या दरवाजाच्या आत दोनही बाजुला पहारेकऱ्यासाठी देवड्या बांधलेल्या आहेत. दरवाजातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच शिवमंदिर दिसून येते.मंदिराच्या आवारात एक विहीर आहे.किल्ला इतक्या उंचीवर असुनसुद्धा त्या विहिरीला ३६५ दिवस पाणी असते.खुप वर्षांनी किल्ल्यावरील सिध्देश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आपल्या दिसतो.गडाच्या भागात इतरही बरेच अवशेष व एका वाड्याचा पाया दिसून येतो. गडाला एकुण तेरा बुरुज असुन असुन यातील दोन बुरुज उध्वस्त झालेले आहेत व यातुनच गाडीरस्ता गडावर आलेला आहे. गडाच्या उत्तर टोकाच्या बुरुजाखाली एका घुमटीत गडदेवतेची स्थापना केलेली दिसते. तटबंदीवरून संपुर्ण गडाला फेरी मारता येते. हि फेरी मारताना ठिकठिकाणी तटबंदीवर चढण्याकरता पायऱ्या दिसतात याशिवाय तटबंदीत एकुण पाच शौचालय व दोन कोठारे दिसून येतात. गडाला पुर्वपश्चिम असे दोन दरवाजे असुन पूर्वेला महादरवाजा तर पश्चिमेला चोरदरवाजा आहे.
हा किल्ला व त्याच्या परीसरात झालेल्या तीन लढाया वाचनात येतात. पहिली लढाई सवानुर चा नवाब विरुद्ध पेशवे, दुसरी टिपू सुलतान विरुद्ध पेशवे आणि तिसरी लढाई
भीमगड किल्ल्याचे सैनिक विरुद्ध राजहंसगड किल्ल्याचे सैनिक यांच्यात
बेळगाव येळ्ळूर अंतर १४ किलोमीटर आहे . येळ्ळूर ते राजहंसगड अंतर ४ किमी आहे . खाजगी वहानाने थेट किल्ल्याच्या दरवाजाजवळ जाता येते .
Tags
गडकिल्ले