म्हणुन मोबाईल आयताकृती असतात

म्हणुन मोबाईल आयताकृती असतात



 तुम्ही तुमच्या मोबाईल फोनच्या आकाराकडे बारकाईने लक्ष दिले आहे का…?नसेल तर पहा, 
फोनच्या आतमध्ये तांत्रिक बाबी असतात पण त्याचा आकार पाहिला तर आयताकृती असतो.
म्हणुन मोबाईल आयताकृती असतात

कोणतिही कंपनी असो मोबाईलचा आकार हा आयताकृतीच असतो. 
आयताकृती मोबाईल 
मग तो वर्तुळाकार, त्रिकोणी किंवा इतर कुठल्या आकाराचा का नसतो. तो आयाताकृतीच का असतो यामागील कारण पाहुया. 
ज्यावेळी सर्व प्रथम मोबाईल बाजारात आले त्यावेळी त्याला एक छोटा ऍन्टेना असायचा.त्याचा डिसप्ले, स्पीकर त्याला असलेला कीपॅड,याचे स्थान जर बघितले तर त्यासाठी आयताकृती आकारात व्यवस्थित बसायचे.ही झाली मोबाईलच्या सुरूवातीच्या काळातील गोष्ट. पण आत्ताचे मोबाईल पाहिले की तेसुद्धा आयताकृतीच असतात.त्याचे कारण असे की, तुम्ही साधी कंपास पेटीची कल्पना करून पहा.
कंपासपेटी जर गोल, षटकोनी किंवा त्रिकोणी असती तर ती हाताळयला कशी वाटली असती? 
तसेच मोबाईल जर त्रिकोणी,षटकोनी असता तर तो हाताळणे सोपे झाले असते का.? 
भौमितिक सिध्दांत पाहता आयताकृती वस्तू हाताळणे आधिक सुलभ आहे.कल्पना करा की मोबाईल हा गोल किंवा त्रिकोणी आकाराचा असता तर त्यावर टाईप करता आले असते का? तो खिशात व्यवस्थित ठेवता आला असता का? हे फार जिकीरीचे झाले असते.
आपण शाळेमध्ये भुमिती शिकलो आहे की, आयताची परिमिती ही चोकोन, वर्तुळ वा षटकोन पेक्षा जास्त असते. (सूत्रानुसार ) 
म्हणुन संशोधकांनी या सर्व बाबीचा विचार करून मोबाईलला आयताकृती आकार दिलेला आहे.
🥀सुत्र, 
आयताची परिमिती = 2×(लांबी+रुंदी)   

  आयताचे क्षेत्रफळ = लांबी×रुंदी

आयताची लांबी = (परिमिती ÷ 2) – रुंदी   

 आयताची रुंदी =(परिमिती÷2) – लांबी
आयताची रुंदी दुप्पट व लांबी निमपट केल्यास क्षेत्रफळ तेवढेच राहते.
आयताची लांबी व रुंदी दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते.
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম