व्हेल माशाची उलटी काय आहे?

  व्हेल माशाची उलटी काय आहे? 

हल्ली वर्तमानपत्रात व्हेल माशाच्या उलटीबाबत अमुक अमुक यांना अटक झाली, टोळीला अटक झाली अशा बातम्या येत असतात यामुळे व्हेल माशाच्या उलटीला मिळणार्‍या कोट्यवधीच्या किमतीबाबत सर्वसामान्याना  उत्सुकता आहे.व्हेल या माशाच्या प्रजातीचे अनेक मासे समुद्रात आढळत असले तरीही ‘स्पर्म’ या व्हेल माशाच्या उलटीला परफ्युम उद्योगात अतिशय महत्त्व आहे,व्हेल माशामध्ये दात नसलेले आणि दात असलेले अशा दोन प्रकारच्या प्रजाती आहेत. उलटी उपयुक्त असलेला ‘स्पर्म व्हेल’ हा दात असलेल्या प्रजातीतील आहे. 
व्हेल मासा : व्हेल हा सस्तन प्राणी आहे.एक प्रौढ व्हेल मासा ३५ मीटर (१०० फूट) लांबीचा व १५० टन वजनाचा असतो. तो थेट पिल्लांना जन्म देतो, आणि त्यांचं संगोपन करतो आणि दूध पण पाजतो. इतर प्राण्यांप्रमाणे व्हेल आई पण आपल्या पिल्लांची खूप काळजी घेते. हा मासा सस्तन प्राणी असल्याने श्वास घेण्यासाठी समुद्री पृष्ठभागावर येतो. याचं सरासरी आयुष्य ७० ते ९० वर्षे आहे.
व्हेल माशाच्या उलटीला भरमसाठ दर मिळून कोट्यवधीची कमाई करता येत असल्याने याची तस्करी वाढली आहे. पण ही उलटी सहजासहजी मिळत नाही हेही तितकेच खरे. परफ्युमचा वास दीर्घकाळ दरवळत राहण्यासाठी नैसर्गिक तत्त्व म्हणून ही उलटी वापरतात. त्याचा आरोग्यावर विघातक परिणाम होत नसल्याने या उलटीचा वापर केलेल्या अत्तरांना दर अधिक मिळतो. याची किंमत करोडो रुपयांत असते.यापासून उत्तम दर्जाची, टिकाऊ वासाची अत्तरे बनतात. ही अत्तरे खूप महागडी असतात.यामुळे जिथे व्हेल मासा दिसतो, तिथे मच्छीमारांची नजर या उलटीवर असते पण  स्पर्म व्हेलची शिकार किंवा त्यांच्याशी निगडीत कोणत्याही घटकाची विक्री करण्यास कायदयाने बंदी आहे.
त्यामुळं कोकणच्या समुद्र किनारपट्टीवर कोळी लोकं व्हेल माशाची उलटी शोधण्यासाठी धडपडत असतात. व्हेल मासा हा समुद्र किनाऱ्यापासून खुप आत असल्याने त्याने केलेली उलटी किनाऱ्यावर येण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागतो. याचे वजन अंदाजे १८ किलोग्रॅमपासून ५५ किलोपर्य़ंत असते. 
ही उलटी म्हणजे व्हेल माशाच्या शरीरातील अपचन झालेले पदार्थ बाहेर टाकलेला भाग होय.व्हेलच्या शरीरातून निघणारा हा पदार्थ काळ्या रंगाचा असून हा ज्वलनशील पदार्थ मानला जातो. व्हेलचे आवडतं खाद्य म्हणजे, म्हाकुळ होय.या म्हाकुळचा तोंडाचा भाग पोपटाच्या चोचीसारखा असलयाने तो  या माशाला पचत नाही. तसेच व्हेल कोळंबी सुध्दा खातो. ज्याचा भाग कडक असल्यामुळे तो पचत नाही.  हा न पचलेला भाग व्हेलमासा उलटी करून बाहेर टाकतो.ही उलटी लाटांवर तरगंत राहिल्यामुळे  त्यावर रासायनिक प्रक्रिया होते आणि ती मेणासारखी बनते. समुद्राच्या लाटाबरोबर ती तरंगत किनार्‍याला लागते, वैज्ञानिक भाषेत याला अम्बरग्रीस असे म्हटले जाते. काहीच्या मते प्रत्यक्षात ती व्हेल माशाची उलटी नसून त्याची विष्ठा असते. या माशाची ही विष्ठा समुद्रावर तरंगताना आढळते किंवा किनाऱ्यावर देखील पडलेली असते.याबद्दल अजुनही मतभिन्नता आहे. 
उलटी अशी ओळखली जाते
स्पर्म व्हेलच्या उलटी सहज आोळखुन येत नाही ती ओळखण्यासाठी काही बाबी सांगितल्या जातात. उलटीतील न पचलेल्या भागात म्हाकुळच्या दातासारख किंवा कडक कवचासारखे भाग आढळताे.त्यामध्ये गरम केलेली सुई उलटीच्या गोळ्यात खुपसली तर तो भाग वितळतो आणि त्यातून काळा धूर  बाहेर येतो. त्याचा रंग काळपट असतो. तो मेणासारखा असण्याची शक्यता असते. ही उलटी उपयुक्त आहे की नाही याची चाचणी विशिष्ट ठिकाणी करून मग तिची उपयुक्तता तपासली जाते.
काय आहे व्हेल माशाची उलटी

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম