मुख्यपृष्ठअजब गजब चित्र विचित्र आडनावे byAnil Patil -जानेवारी ०१, २०२३ चित्र विचित्र आडनावे माणसाला नावाबरोबरच आडनाव ही आोळख आहे.म्हणुन काही माणसांना आडनावानेच आोळखतात.पण काही आडनावे इतकी विचित्र असतात की ती आडनावे पाहिल्यावर कधीकधी हसु येते.पुर्वी अशी विचित्र नावे बदलु म्हटले तरी बदलता येत नव्हती पण आता ती सोय उपलब्ध असल्याने बरयाच जणानी आडनावे बदलली आहेत. कोणाचे आडनाव व्यवसायावरून ,कोणाचे जातीवरून तर कोणाचे पर्दाथावरून, रंगावरून ,देवदैवतावरून, भाज्यावरून ,एवढेच काय तर प्राणी, पक्षी यांच्या नावावरुन देखिल आडनाव असतात. काही आडनावे भितीदायक सुध्दा असतात. काही आडनाव संख्या दर्शक असतात.काही आडनावे ही हास्यास्पद, निंदाजनक सुध्दा आहेत, काही आडनावे तर इतकी अश्लील आहेत की पुछो मत... रंगावरून निर्माण झालेली काही आडनावे:काळे,पांढरे,ढवळे, तांबडे,हिरवे,जांभळे, तपकिरे ही आहेत. आता ही आडनावे पहा आळणी,हागवणे,चोरकर,शांते,विविधते,भुसारी,करवंटे,मुग,टकले, बोडके,सगळे, आंधळे, किरकिरे, पोटदुखे अशी बरीच आडनावे आहेत.रामगिरीवार, रामगुडे, रामजोशी, रामटेककर, रामटेके, रामढोक, रामतीर्थकर, रामद्वार, रामदंडी, रामदंडे, रामदास, रामदासी, रामदेरकर, रामधरणे, रामनवमीवाले, रामनाथकर, रामनामे, रामपर्तीवार, रामपूरकर, रामपुरे,रामरक्षे, रामराजकर, रामराजे, रामराव, रामले, रामाडे, रामाणी, रामाणे, रामायणे, रामिष्टे, रामीण, रामे, रामेकर, रामुगडे, रामेके आणि रामोशी अशी 'राम' असलेली आडनावे आहेत. आडनावांच्या शेवटी 'गडे' किंवा 'गुडे' असे शब्द असलेली अनेक आडनावे आहेत. उदा. अदगडे, अरगडे, अंबागडे,उबगडे, घाटुगडे, तानुगडे, आटुगडे, गुईगडे, रेवगडे, देवगडे,भिवगडे, सागडे, लेंगडे, कोलंगडे,म्हारुगडे वगैरे. रामुगडे हे याच गटातले पण 'राम' असलेले आडनाव असावे. झगडे आणि लुगडे हेही याच गटात बसतात असे वाटते, पण तसे नसावे. कानगुडे, धायगुडे, काळगुडे, भरमगुडे,निरगुडे, सालगुडे, ससगुडे, चांदगुडे, सुरगुडे, अजगुडे, तरगुडे, किर्तगुडे, बामगुडेवगैरे आडनावांच्या गटात 'रामगुडे' बसतात. रावण, रावणकर, रावणगावकर,रावणंग आणि रावणंगे अशी ‘रावण’ धारी आडनावे आहेत.अस्वले, अुंटवाले, अुंदीर, काळवीट, कुत्रे, श्वान, कोकरे, कोल्हे, खेकडे, गाढवे, गाय,गोम , घोडे, घोरपडे, घोणस, घोणसे, जिराफे, झुरळे, डुकरे, डोंगळे, तरस, नागे, बकरे,बैले, बोकड, बोकडे, मुंगळे, मुंगी, मुंगे, सरडे, ससे, सापे, सांबरे, सिंह, हत्ती, हत्ते,हरणे वगैर 'वाघ्ये, वाघ, वाघे किंवा वाघिरे'.वाघडोळे'वाघमारे,वाघमोडे,वाघचवडे, वाघचवरे, वाघचौरे, वाघचौंडे 'वाघमळे' तसेच वाघचोर, वाघचोरे किंवा वाघचौरे ही आडनावे आहेत.आडनावात वाघ असलेली आणखी काही आडनांवे - काळवाघे, तांबेवाघ, परतवाघ व्याघ्रळकर, वाघ्रळकर, वाघदर, वाघपांजर, वाघराळकर,वाघरी, वाघरु, वाघरे, वाघलगावकर, वाघवले, वाघसकर, वाघळकर, वाघळे, वाघंबे, वाघंबेकर,वाघाटे, वाघाडे, वाघापूरकर, वाघीकर वगैरे. 'गाय' हे आडनाव तर आहेच शिवाय वाघासारखेच 'गायचोर' आणि 'गायडोळे'ही सुद्धा आडनावे आहेत. गायकर, गायकैवारी, गायचारे, गायतोंडे, गायधनी, गायदंडे, गायमार,गायमुखे ही सुद्धा आडनावे आहेत. 'वाघमळे' या आडनावासारखे 'गायसमुद्रे' हे ही आडनाव गायखे, गायगोळे, गायटे, गायधने, गायंगी ही आणखी काही 'गाय' असलेली आडनावे आहेत.या आडनावांच्या कुटुंबातील अनादर करण्याचा माझा मुळीच उद्देश नाही.𝕺✿𝖐 𝕺✿𝖐 Tags अजब गजब Facebook Twitter शेअर करा:चित्र विचित्र आडनावे Facebook Twitter WhatsApp Pinterest LinkedIn Reddit Tumblr Telegram Email