वंशावळीचे रेकॉर्ड ठेवणारे इतिहासकार "हेळवी"

 वंशावळीचे रेकॉर्ड ठेवणारे  इतिहासकार "हेळवी"


ग्रामीण भागात सुगीच्या दिवसात येणारे हेळवी लोक तुम्ही पाहिले असतील.ग्रामीण भागात या हेळवी लोकांना गावकरी खुप मानतात.एखादया घराण्याची वंशावळ पाहयाची असल्यास या हेळवी लोकाकडे ती उपलब्ध होते.आपणास फार फार तर आजोबांच्या वडीलांचे नाव माहिती असते पण या हेळवी लोकाकडे आपल्या घराण्याची दहाबारा पिढीतील लोकांची नावे असतात शिवाय आपले पुर्वज मुळ कोणत्या गावचे,या गावी कधी आले,याचाही उल्लेख आढळुन येतो.हेळवी हा भटका समाज.हा समाज कर्नाटक भागात आढळुन येतो .नंदीबैल हा त्यांचा वाहतुकीचा प्राणी. मोडी लिपी लिहिता-वाचता येणारी ही एकमेव भटकी जमात आहे. गावा गावांतील लोकांची वंशावळी सांभाळणे, त्यांत नवीन नावे घालणे, कुळांचा इतिहास नोंदवणे हा हेळव्यांचा परंपरागत व्यवसाय आहे.  ग्रामीण व्यवस्थेत जसे गावगाडा चालवणारे अलुतेदार-बलुतेदार तयार झाले तसे गावातील लोकांची वंशावळ जतन करण्याचे काम हेळव्यांकडे आले.

वंशावळीचे रेकॉर्ड ठेवणारे  इतिहासकार "हेळवी"
______________________________

वंशावळीचे रेकॉर्ड ठेवणारे  इतिहासकार "हेळवी"

वंशावळीचे रेकॉर्ड ठेवणारे  इतिहासकार "हेळवी"


वंशावळीचे रेकॉर्ड ठेवणारे  इतिहासकार "हेळवी"
प्रत्येक हेळव्याकडे साधारणपणे दहा ते पंधरा गावे असतात. त्यातील काही त्यांची मुले सांभाळतात. प्रत्येक गावातील मूळ कुळांच्या वंशावळी व त्यांचा इतिहास हेळव्यांकडे असतो. गावात हेळव्यांची मुक्कामाची जागा ठरलेली असते. गावात आल्यानंतर ते एक महिनाभर तरी तेथे राहतात. त्यांच्या कुटुंबाची सोय लावून ते बैलांवरून घरोघरी फिरतात. प्रत्येक वाड्यावाड्यावर, वस्तीवर जाऊन प्रत्येक घरातील लोकांच्या समोर त्यांची वंशावळ चोपड्यांमधून हेळवी त्यांच्या खास आवाजाच्या ठेक्यात वाचून दाखवतात.विशेष म्हणजे हेळवी वंशावळ सांगताना पाय झाकून घेतात. कारण त्यांच्या मतानुसार हेळव्यांचा मूळ पुरुष हा लंगडा होता.म्हणुन वंशावळ सांगताना ते पाय दाखवत नाहीत.

आपल्या कुळाची माहिती सांगत असताना ते प्रथम त्या मुळाचा मूळपुरुष, मूळगाव सांगतात. आपले वंशज कोणकोणती गावे बदलत बदलत केव्हा आज राहत असलेल्या गावी, का व कसे आले ते सांगतात. यांच्या  तारखा शक कालगणनेनुसार असतात. वंशावळीतील पूर्वजांची जुन्या वळणाची नावे ऐकताना आपणास गंमत वाटते कारण आपल्या पुर्वजांची नावे तत्कालीन रूढीनुसार दगडु,धोंडु,झकासराव,आधिकराव अशी असु शकतात. आपल्या  कुळाचे गोत्र, प्रवर, ऋषिगोत्र, व्यवसाय, कुलदेवी इत्यादी माहिती ते  सांगतात. वंशावळीतील नावे मूळ पुरुषापासून ती आजच्या पिढीपर्यंत  सांगुन थक्क करून  सोडतात. त्यानंतर दक्षिणा म्हणून हेळवी धान्य घेतात. आता काही ठिकाणी पैसे घेवु लागले आहेत. तसेच सध्या घरात कोणाचे लग्न झाले आहे का? कोणाला मूल झाले आहे का? तसेच नवीन सून आली असेल तर तिचेही नाव वंशावळीत घालतात., पूर्वी हेळवी वंशवळीच्या नोंदी या ताम्रपटावर नोंदवून ठेवायचे. नंतर ताम्रपट बंद होऊन कागदांच्या पोतड्यावर त्यांनी नोंदी करायला सुरू केल्या. विशिष्ट पद्धतीने शिवलेल्या त्यांच्या नोंद वहीतील कागदं जीर्ण व्हायला लागल्यावर नव्या वहीत पुन्हा सगळ्या नोंद केल्या जातात.पुर्वी पुरूषसत्ताक  प्रथेमुळे फक्त पुरुषांची नावे वंशावळीत आढळून येतात. पण अलीकडील पाच पंचविस वर्षात  हेळवी स्त्रियांची नावे वंशावळीत नोंदवुन घेवु लागले आहेत.

उडदामाजी काळे गोरे उक्तीनुसार काही आपमतलबी हेळवी लोक नाडुुन या समाजास बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन खोटी माहिती देऊन  काही मंडळी समाजाला बदनाम करत आहेत या लोकांना "हेळवी समाज" आोळखुन आहे.पण सगळेच हेळवी तसे नाहीत.

हेळव्यांचे मुख्य ठिकाण हे  बेळगाव असून मूळस्थान चिंचणी हे गाव आहे. त्या गावी काही हेळव्यांना थोड्या फार जमिनी आहेत. हेळवी लोकांची मातृभाषा कन्नड आहे. हेळवी लोकांची मूळची जात धनगर. परंतु सर्वांनी नंतर लिंगायत पंथ स्वीकारलेला आहे. त्यामुळे त्यांना मांसाहार वर्ज्य आहे.हेळव्यांच्याकडे ८०० ते ९०० वर्षाच्या तपशील आढळून येतो.पुर्वी वंशावळीच्या नोंदी मौखिक स्वरूपात ठेवल्या जात.हेळवी वंशावळी तोंडपाठ करत.नंतरच्या काळात ताम्रपटावर नोंदी ठेवल्या.आता कागदावर नोंदी करण्यात येतात. प्रत्येक गावासाठी वेगळी वही असते.यांनी काही गावे,गावातील भावकी वाटुन घेतलेल्या आहेत.त्याप्रमाणे ते त्या त्या गावी दोन वर्षातून जातात.हेळव्यांना कन्नड-मराठी दोन्ही भाषा येतात. त्यांचे दत्परातील लिखाण मात्र मोडी लिपीत आहे. त्यांची मोडीही कन्नड-मराठी मिश्रित आहे. त्यामुळे ती हेळव्यालाच वाचता येते. हेळव्याच्या दप्तरात काही ठिकाणी कन्नड, काही ठिकाणी मराठी शब्द असतात, त्यामुळे मोडीच्या अभ्यासकांनाही हेळव्यांनी लिहिलेला काही  मजकूर वाचता येत नाही.जातींच्या दाखल्यांसह विविध दाखल्यांसाठी हेळव्यांच्या नोंदी सरकार दरबारी ग्राह्य धरल्या जातात. वंशावळीच्या नोंदी ग्राह्य धरण्यात येत होत्या. कुणबी नोंदीचं महत्व लक्षात आलं तेव्हा आपली वंशावळ, त्यात कुणबी शब्द शोधताना हेळव्याच्या नोंदीचा खूप उपयोग झाला. नंतर महाराष्ट्र सरकारने जात प्रमाणपत्रांसाठी या नोंदी ग्राह्य धरण्यास नकार दिला. पण बेळगाव आणि कर्नाटकात आजही या नोंदी सरकारी कामासाठी अधिकृत दस्तऐवज मानली जातात.दहा वर्षांतून एकदा सर्व माहिती नव्या वहीत लिहितो. वही जुनी झाल्यावर पाने खराब व्हायच्या अगोदर सगळी माहिती नव्या वहीत लिहुन घेतो.

खरे तर हेळवी म्हणजे इतिहासकार आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणुन त्यांच्याकडील नोंदी आधुनिक डिजिटल स्वरूपात जतन करायला पाहिजेत.आग,पुर,चोरी अशा स्वरूपाच्या घटना सांगुन येत नाहीत. 

-अनिल पाटील,पेठवडगाव

_________________________

काही हेळवी लोकांचे मोबाईल नंबर देत आहे जिज्ञासुनी आपली माहिती त्या नंबरवर त्यांना विचारावी.

१)चेंदू बाळाप्प हेळवी. वटूर ता. राजापूर जि बेळगाव

Mobile- 95034 11495

२) बाबु हेळवी,पट्टणकुडी

Mob.9632304887

3) बंगाली आप्पा हेळवी

Mob. 9604900646

४) सिध्दु हेळवी

Mob. 9535528197

५) सदाशिव बाबु हेळवी

9637120514

महादेव बाबु हेळवी

9923564622

६) बाळु नाग्गाप्पा हेळवी

75591 50631

वरील नंबर वर संपर्क साधुन तुमच्या भागातील येणारे आणि कोण हेळवी लोक आहेत त्यांचा नंबर यांच्याकडून घ्यावा

वंशावळीचे रेकॉर्ड ठेवणारे  इतिहासकार "हेळवी"

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম