पेठवडगाव येथील हनुमान मंदिरातील दुर्लक्षित शिल्प
फेसबुक लिंक http://bit.ly/2Q6dcrm
महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी गावच्या वेशीजवळ, मंदिरांच्या प्रांगणात, किल्ल्यांच्या वाटांवर काही शिळा शिल्पे आढळतात.असेच एक शिल्प पेठवडगाव येथील मारूती मंदिराच्या परिसरात आहे..मंदिरातील या शिल्पाबाबत कोठेही लिखित स्वरूपाचा इतिहास उपलब्ध नाही,मी आधिक जाणुन घेण्याचा प्रयत्न केला पण कोणालाही हे शिल्प कसले आहे हे सांगता आले नाही.या शिल्पावर अनेक भाविक लोक "शनी" समजुन तेल आोततात.यामुळे शिल्प तेलकट झाले आहे. पण हे शिल्प शनिचे नाही.आधिक निरिक्षण केले असता यावर एक हात व शिवलिंगाची पुजा स्पष्ट दिसून येते. वरच्या भागात वीर योद्धा कैलास पर्वताला गेला आहे आणि शंकराच्या पिंडीची पूजा करत आहे,असे दाखवलेले आहे. या शिल्पातुन युद्धात मरण आल्यास स्वर्गलोक प्राप्ती होते असे यातुन सुचवायचे असावे. काही वीरगळ हे चंद्र सूर्य यांनी अंकित असतात. आकाशात चन्द्र सूर्य तळपत आहेत तोपर्यंत या वीरांची स्मृती कायम राहिल असे यातून सूचित करायचे असावे. काही वीरगळ हे सतीच्या हाताने अंकित असतात. एखाद्या बलिदान केलेल्या वीराची पत्नी त्याच्यासह सती गेली असेल तर तिचे ते स्मारक मानले जाते. वीरगळावर फ़ार कमी प्रमाणात शिलालेख आहेत. त्यामुळे वीरगळ पाहून त्यातील वीर कोण आहे, कुठल्या युध्दात तो कामी आला आणि वीरगळाचा निर्माता कोण आहे हे सांगता येत नाही.वीरांबरोबर सती जाणार्या स्त्रियांच्या स्मरणार्थ सतीशिळा बनवल्या जात.महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळ्णार्या सतीशिळांमध्ये स्त्रीचा खांद्यापासून हात चित्रीत केलेला असतो. हा हात कोपरात काटकोनात वळलेला असतो. हातात बांगड्या असतात. हाताखाली दोन प्रतिमा कोरलेल्या असतात. त्या स्त्रीच्या मुलांच्या प्रतिमा असाव्यात. या हाताची रचना आशिर्वाद देणार्या हाताप्रमाणे असते. तसेच सतीशिळा देवळाच्या परिसरात उभारल्या जात असत.वडगाव मधील शिल्प अशाच प्रकारातील आहे.या मंदिराच्या मागे वाडा होता असे म्हणतात.सध्या तेथे फक्त अवशेष आहेत. पेठवडगाव येथील मारूती मंदिराच्या आवारात असणाऱ्या या शिल्पाचा कालखंड ६०० वर्षापूर्वीचा असावा.