विहीरिचा अजब गुण :या विहीरीचे पाणी पिताच लोक आपसात भांडु लागतात
दि ११ जानेवारी २०२१
एक विहीर मध्य प्रदेशात आहे. या विहिरीचे पाणी पिताच संबंधित लढण्यास आणि झगडण्यास सुरुवात करतो.ही रहस्यमयी विहीर मध्य प्रदेशातील शोपूर शहरातील सुमारे 250 वर्षांपूर्वीच्या महालात बांधण्यात आली आहे. या विहिरीस ‘तांत्रिक विहीर’ म्हणून ओळखले जाते. ही शापित विहीर असून जो कोणी या विहिरीचे पाणी पितो तो आपले संतुलन गमावून बसतो. याशिवाय भाऊ-भावाविरुद्धच झगडण्यास सुरुवात करतो. राजघराणे आणि अन्य लोकांच्या बाबतीत अशा घटना घडण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने तत्कालीन राजाने ही विहीर वापरण्याकरिता बंद केली.
तत्कालीन राजा गिरिधर सिंह यांनी 250 वर्षांपूर्वी राजमहल परिसरात एकूण आठ विहिरी खोदल्या.
यातीलच एक विहीर ‘तांत्रिक विहीर’ म्हणून ओळखली जाते. एका नाराज मांत्रिकाने जादूटोना केला आणि तेव्हापासून या विहिरीचे पाणी पिल्यास लोक झगडण्यास, लढण्यास सुरुवात करतात. म्हणूनच आजही ही विहीर बंद आहे.हिरापुरी असे नांव असलेल्या या जागेला आता गिरीधरपूर असे नांव असून एका गढीमध्ये ही विहिर आहे. या गढीचेही पडके अवशेष सध्या पहायला मिळतात.या विहिरीजवळ एक शिवमंदिरही आहे. पूर्वी येथे आमराई होती तेथे राजे लोक नेहमीच येत असत. या गढीतील एका विहिरात आजही पाणी आहे. बाकी बुजल्या गेल्या आहेत. गिरीधरपूर हे नगर गिरीधर गौड राजानेच वसविले होते
Tags
नवल