‘या’ देशात पुरुषाला करावी लागतात दोन लग्नं!
फेसबुक लिंक http://bit.ly/3nyClpd
‘दोन बायका फजिती ऐका’ अशी म्हण आपल्याकडेच संभवू शकते. इरिट्रिया नामक देशात मात्र प्रत्येक पुरुषाला दोन लग्नं करावीच लागतात. जर एखाद्याने दोन लग्नं केली नाहीत तर त्याला तुरुंगवासही होऊ शकतो! त्यामुळे तेथील बहुतांश पुरुष हे दोन बायकांचे दादले आहेत. अर्थातच आता या कायद्याला विरोध होत आहे.
या देशात स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांची संख्या कमी आहे. त्यामुळे तेथील सरकारने हे तुघलकी फर्मान काढलेले आहे. या कायद्याचे तंतोतंत पालन होते आहे की नाही यावर प्रशासनाची कडक नजरही असते. कायदा मोडणार्यास प्रसंगी आयुष्यभरासाठी तुरुंगात जाण्याची भीती असते. जर पहिल्या पत्नीने दुसर्या विवाहात अडथळा आणला तर तिलाही जन्मठेप होऊ शकते. त्यामुळे तेथील स्त्रियांनीही आपल्या नशिबात सवत आहेच, हे गृहित धरलेले असते. अनेक घरांमध्ये नवरोबाचा दोन बायकांबरोबरचा संसार पाहायला मिळतो. या कायद्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरही टीका झाली
आहे.
माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव
Tags
नवल