या’ गावातील लोक 40 व्या वर्षीच होतात म्हतारे

 या’ गावातील लोक 40 व्या वर्षीच होतात म्हतारे


दि. ११ जानेवारी   २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/2XBjqiN
             काही गावांचे वेगळेच वैशिष्ट्य असते. कुठे ‘जुळ्यांचे गाव’ आहे तर कुठे ‘झोपणार्‍या लोकांचे गाव’ आहे. छत्तीसगढमध्ये एक गाव असे आहे की जिथे ऐन 25 व्या वर्षीच लोकांवर हातात काठी घेऊन चालण्याची वेळ येते. वयाच्या चाळीशीपर्यंत ही माणसं जख्ख म्हातारी होतात. हे सर्व घडते तेथील भूगर्भातील दूषित पाण्यामुळे. सरकारनेही या गावातील लोकांसाठी शुद्ध पाण्याची अद्याप व्यवस्था केलेली नाही.

या’ गावातील लोक 40 व्या वर्षीच होतात म्हतारे


या गावातील हँडपंप आणि विहिरींमधून जे पाणी येते, त्यामध्ये फ्लोराईडचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे गावातील लोकांमध्ये विकलांगता वाढत आहे. शुद्ध पेयजलाची व्यवस्थाच नसल्याने गावातील लोकांना अजूनही हेच पाणी नाईलाजाने प्यावे लागत आहे.  गावातील आठ ते 40 वर्षे वयोगटातील प्रत्येक तिसर्‍या व्यक्‍तीला कुबड येणे, दात किडणे, शरीर पिवळे पडणे किंवा म्हातारपणाची लक्षणे दिसणे अशा समस्या भेडसावत आहेत. प्रशासनाने गावात रस्ता बनवला; पण महत्त्वाची गोष्ट असलेल्या पाण्याची व्यवस्था केली नाही. गावातील गरीब लोक शहरात जाऊन पाणी विकत आणू शकत नाहीत. उन्हाळ्याच्या दिवसात गावातील काही लोक तीन किलोमीटरवरील इंद्रावती नदीचे पाणी आणून ते उकळून पितात.
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🎖       
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            ጦඹիiᎢi

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম