वाहनांवरील विविध रंगाच्या नंबर प्लेट व त्याचा अर्थ
दि ११ जानेवारी २०२०
वाहनाच्या वेगवेगळ्या रंगांच्या नंबर प्लेटचा अर्थ देखील वेगवेगळा असतो. काय आहे त्या वेगवेगळ्या रंगाच्या नंबर प्लेट मागील महत्व, जाणून घेऊया. ⚡लाल नंबर प्लेट –
जर कोणत्या गाडीवर लाल रंगाची नंबर प्लेट असेल तर ते वाहन भारताच्या राष्ट्रपतींचे किंवा कोणत्यातरी राज्याच्या राज्यपालांचे असते. हे लोक विना लाइसेंस या ऑफिशियल गाड्याचा वापर करु शकतात. या प्लेट मध्ये सुवर्ण रंगाचे नंबर असतात.⚡तारे असणारी नंबर प्लेट –
सैन्याच्या वाहनांसाठी अशा प्रकराच्या वेगळ्या नंबरिंग प्रणालीचा वापर केला जातो. अशा नंबर असलेल्या वाहनांना रक्षा मंत्रालयाकडून मान्यता मिळालेली असते. या नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांवर नंबरच्या आधी किंवा पहिल्या तीन अक्षरांनंतर अंकाच्या जागी वर इशारा करणारा एक बाण लावलेला असतो. ज्याला ब्रॉज एरो म्हणाले जाते. बाणानंतर जो पहिला दोन अंक हे वर्षांना दर्शवतात ज्या वर्षी सेनेेने ते वाहन खरेदी केले आहे. ही नंबर प्लेट 11 अंकांची देखील असते.⚡पांढरी नंबर प्लेट –
ह्या रंगाच्या नंबर असलेल्या गाड्या रस्त्याला आपण नेहमी पाहतो. या वाहनांचा वापर व्यापारिक कारणांसाठी केला जाता नाही. यावर काळ्या रंगाचे आकडे असतात. त्यामुळे पांढऱ्यात रंगाची नंबर प्लेट पाहून लोक लगेचच अंदाज बांधतात की गाडी वैयक्तिक कारणासाठी वापरले जाणारे वाहन आहे.⚡पिवळी नंबर प्लेट –
याचा वापर ट्रांसपोर्टच्या वाहनांसाठी केला जातो. ही नंबर प्लेट पाहिली की लगेच लक्षात येते की ही टँक्सी आहे. या नंबर प्लेटचा वापर टँक्सी ट्रक साठी केला जातो ज्या व्यापारिक कारणासाठी वापरल्या जातात. या पिवळ्या नंबर प्लेटवर काळ्या रंगाचे आकडे असतात.⚡निळी नंबर प्लेट –
निळ्या रंगाच्या नंबर प्लेटचा वापर अशा वाहनांसाठी केला जातो जी वाहने विदेशी प्रतिनिधींद्वारे वापरली जातात, या रंगाची वाहने जास्त करुन दिल्ली सारख्या शहरात जास्त दिसून येतात कारण तेथे विदेशी प्रतिनिधीची सतत रेलचेल असते. ह्या गाडीवरील निळ्या रंगाची नंबर प्लेट असे स्पष्ट करते की हे वाहन विदेशी दुतावासाचे आहे किंवा युएन मिशनसाठी आहे.⚡काळी नंबर प्लेट –
काळ्या रंगाच्या नंबर प्लेट असणारी वाहने देखील कमर्शियल कारणासाठी वापरी जातात. परंतु त्या एखाद्या खास व्यक्तीसाठी असतात, या प्रकारच्या काळ्या नंबर प्लेट असलेली वाहने आपल्याला मोठ मोठ्या हॉटेल्सच्या बाहेर पाहायला मिळतात. अशा नंबर प्लेटवर पिवळ्या रंगात नंबर लिहिलेले असतात.⚡हिरवी नंबर प्लेट –
रस्ते मंत्रालयाच्या इलेक्ट्रिक परिवहन वाहनांना या रंगाच्या नंबर प्लेट लावलेल्या असतात. नंबर प्लेटचा रंग हिरवा असतो आणि त्यातील आकडे वाहनाच्या श्रेणीनुसार पिवळा आणि पांढरा असतो. तसेच आता वैयक्तिक इलेक्ट्रीक वाहन असल्यास त्याच्या आकड्याचा रंग पांढरा आणि नंबर प्लेट हिरवी असेल तर कमर्शियल इलेक्ट्रिक वाहन असल्यास त्याच्या आकड्यांचा रंग पिवळा असेल, ती वाहने ट्रक्सी म्हणून वापरी जातील
Tags
जनरल नॉलेज