मराठ्यांचं भूत” उतरवणारा मांत्रिक, लाकडी तोफा आणि तब्ब्ल ५ वर्षे वार झेलून नं पडलेला किल्ला!

  मराठ्यांचं भूत” उतरवणारा मांत्रिक, लाकडी तोफा आणि तब्ब्ल ५ वर्षे वार झेलून नं पडलेला किल्ला!  


दि. १२ जानेवारी   २०२१
             विशाल दळवी, इनमराठी 

फेसबुक लिंक http://bit.ly/39q6GkL
गिरिदुर्गांनी शेवटपर्यंत स्वराज्याचे रक्षण केले त्याचप्रमाणे किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त शौर्य दाखवले एका गिरीदुर्गाने, नाशिक जवळचा असा एक गिरिदुर्ग आहे ज्याने स्वराज्याच्या रक्षणार्थ सलग ५ वर्षे शत्रूचे वार झेलले. पण त्यांच्या समोर हार पत्करली नाही. तो गिरिदुर्ग म्हणजे नाशिक जवळील आशेवाडीचा किल्ले रामशेज होय.या किल्ल्यासोबत लढणाऱ्या स्वराज्याच्या मावळ्यांनी निकराने लढा देत इंचभर जमीन देखील मोघलांच्या हाती जाऊ दिली नाही.

मराठ्यांचं भूत” उतरवणारा मांत्रिक, लाकडी तोफा आणि तब्ब्ल ५ वर्षे वार झेलून नं पडलेला किल्ला!


*शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने स्वराज्य काबीज करण्यासाठी पुन्हा कंबर कसली. १६८२ साली त्याने आपल्या पराक्रमी सरदारांच्या साथीने स्वराज्यावर आक्रमण करण्याची मोहीम आखली. औरंजगजेबाने रामशेज किल्ला सर करण्याची जबाबदारी सोपवली होती शहाबुद्दीन खानावर !यावेळेस रामशेज किल्ला हस्तगत करायचाच या जिद्दीने शहाबुद्दीन खानाने तब्बल दहा हजार सैन्यांच्या साथीने रामशेज किल्ल्याला वेढा घातला.यावेळी रामशेज किल्ल्यावर अवघ्या सहाशे मावळ्यांच्या साथीने किल्लेदार सूर्याजी जेधे तैनात होते. (सूर्याजी जेधेच नक्की त्याकाळी किल्लेदार होते का याबद्दल अनेकांचा संभ्रम आहे.) यावेळेस शहाबुद्दीन खानाने पारंपरिक चढाई तंत्र न वापरता एका वेगळ्याचं अजब युद्धतंत्राचा वापर केला.तो अजब प्रकार पाहून क्षणभर सूर्याजी जेधे देखील बुचकळ्यात पडले .ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ_* शहाबुद्दीन खानाने रामशेज किल्ल्याच्या उंची एवढा लाकडी बुरुज बनवला. त्याला “धमधमा” म्हटले जायचे आणि त्यावरून त्याने रामशेजवर तोफांचा मारा सुरु केला. परंतु रामशेज किल्ला इतका अभेद्य  की शहाबुद्दीनची ही  खेळी त्याने सफल होऊ दिली नाही.त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी  सूर्याजी जेधे यांच्याकडे लोखंडी तोफा नव्हत्या, पण ते स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी आपली शक्कल लढवत लाकडी तोफा तयार केल्या आणि त्याला चामडे जोडून दगडांच्या सहाय्याने शत्रूवर जोरदार हल्ला चढविला…!
सूर्याजी जेधे यांचे अजब युद्धतंत्र पाहून काय करावे हे शहाबुद्दीन खानाला सुचेना.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, स्वराज्याच्या इतिहासात जेवढ्या लढाया झाल्या तेवढ्या लढायांमध्ये केवळ किल्ले रामशेजच्या युद्धप्रसंगात लाकडी तोफांचा वापर आढळतो ही विशेष गोष्ट !
एकीकडे सूर्याजी जेधे लाकडी तोफांमधून सतत दगडांचा मारा करत होते आणि दुसरीकडे शहाबुद्दीनच्या सैन्याची चांगलीच तारांबळ उडाली होती.
या हल्ल्यामध्ये शहाबुद्दीन खानाचे कित्यके मोगल अधिकारी आणि हजारो सैन्य मारले  गेले. त्याचवेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी रामशेजच्या भोवतालचा शत्रूचा वेढा फोडण्यासाठी रुपाजी भोसले आणि मानाजी मोरे यांना पाठवले.
त्यांनी वारंवार हल्ले चढवून खानाच्या फौजेला अगदी बेजार करू सोडले होते. दोन्ही बाजूकडून शहाबुद्दीन पुरता अडकला होता.
दरम्यान मोगलांना नाशिकमधून येणारी रसद लुटण्याचे काम संभाजी महाराजांची एक तुकडी करत होती…!
शहाबुद्दीन खानाची ही  परिस्थिती औरंगजेबाला कळताच त्याने १२ मे १६८२ रोजी खानाच्या  मदतीसाठी आपला सावत्रभाऊ खानजहाँ बहाद्दूर कोकलताश याला पाठविले. कोकलताश खानाच्या मदतीला येऊन देखील काहीही उपयोग झाला नाही.
“रामशेजवर मराठा सैन्याची भुते आहेत, त्यांच्यामुळे आपल्याला विजय मिळत नाही!” ही बातमी कोकलताश याला कळली आणि त्या विद्वानाने त्यावर विश्वास देखील ठेवला. या भुतांना  पळवून लावावे म्हणून त्याने मांत्रिकाला पाचारण केले.
ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ
मांत्रिकाने १०० तोळे सोन्याचा नाग बनवून आणण्यास सांगितले. तेव्हाचे ३७,६३० रुपये खर्च करून बनवलेला तो नाग घेऊन  मांत्रिक किल्ला चढू लागला.
त्याच्या मागोमाग मोघल सैन्य देखील चढू लागले. किल्ल्याच्या मध्यावर आल्यावर गोफणीतून सुटलेल्या एका दगडाने मांत्रिकाचा अचूक वेध घेतला आणि मुघल सैन्य वाट मिळेल तिकडे पळू लागले…!
अश्यप्रकारे पूढे जवळपास अजून तीन वर्षे औरंगजेबाने किल्ला हस्तगत करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले.
या काळात बहाद्दूर खान, फतेह खान, कासीम खान किरमानी यांसारख्या कित्येक मोघल सरदारांनी रामशेज जिंकण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले, पण पराभवा व्यतिरिक्त त्यांच्या हाती काहीच आले नाही
अखेर नाईलाजाने औरंगजेबाने रामशेजवरचा वेढा उठवला आणि रामशेज काबीज करण्याचा नाद सोडून दिला.
१६८२-१६८७ या पाच वर्षांच्या काळात रामशेज कित्येक वार झेलून देखील अभिमानाने मान उंचावून उभा होता. सलग पाच वर्षे किल्ला लढविण्याच्या या अतुलनीय पराक्रमाबद्दल छत्रपती संभाजी महाराजांनी किल्लेदार सूर्याजी जेधे यांचा रत्नजडित कडे, चिलखत पोशाख आणि द्रव्य देऊन जंगी सत्कार केला.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম