🛫️ जगातील एकमेव विमानतळ, जेथे विमानालाच ट्रेन जाण्याची पाहावी लागते वाट! 🛫
________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
________________________
दि ६ जानेवारी २०२०
विमानतळाचे नाव होताच धावपट्टीवर धावणारया विमानाचे दृश्य सर्वांच्या डोळ्यासमोर येते. परंतु न्यूझीलंडमध्ये असे विमानतळ आहे ज्यास जगातील सर्वात विचित्र विमानतळ म्हटले जाते.विमानतळ गिरबर्न शहराबाहेर आहे. हे विमानतळ दोन प्रकारे वापरले जाते. एक रेल्वे लाइन म्हणून आणि दुसरे विमानतळ म्हणून. ही गाडी थेट पामर्स्टन उत्तर ते गिसबोर्न पर्यंत जाते. गाड्या गेल्यानंतर या विमानतळावर विमानांचे लँडिंग केले जाते. येथे धावपट्टीच्या मध्यभागी गाड्या धावतात.जगातील एकमेव असे ठिकाण आहे. ट्रेन जाण्यासाठी विमानाला वाट पाहावी लागते हे सुद्धा जगातील एकमेव आणि दुर्मिळ उदाहरण आहे.हे विमानतळ न्यूझीलंडमध्ये आहे. या विमानतळावरील विमानांना रेल्वे जाण्याची वाट पहावी लागते कारण या विमानतळाच्या धावपट्टीवरच रेल्वे ट्रॅक आहे.न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडजवळ गिसबोर्न एयरपोर्ट नावाचे हे विमानतळ स्थित आहे.येथे सकाळी ६:३० ते रात्री ८:३० वाजेपर्यंत रेल्वे मार्ग आणि विमानतळाचा रनवे दोन्ही वर सारखी रेल्वे आणि विमानाची ये जा सुरु असते.
रोज रात्री ८:३० वाजता रनवे बंद केला जातो. या एयरपोर्टवरून 60 पेक्षा अधिक देशांतर्गत विमानाचे उड्डाण होते. तसेच 15 लाख प्रवासी वर्षभर येथून प्रवास करतात.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,रेल्वे मार्ग हा रनवेच्या अगदी मध्यातून गेला आहे.अनेक वर्षांपुर्वी ही बांधणी करण्यात आल्याने, रेल्वे आणि विमान या दोघांसाठी एकच परिसर असेल, याची विचार झाला नव्हता. त्यामुळे ट्रेन आली तर विमानाला थांबवले जाते आणि विमानाची वेळ असेल तर ट्रेनला थांबवले जाते.
पण ट्रेनला सिग्नल मिळण्याचे प्रमाण फारच कमी आहे. बिचाऱ्या विमानांनाच ट्रेनची जास्त प्रतीक्षा करावी लागते.धावपट्टीवर रेल्वे रुळामुळे बर्याच वेळा विमानाला खाली उतरण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागते. ट्रेन आणि विमान दोन्ही चालविण्यापूर्वी वाहतूक नियंत्रकाकडून परवानगी घ्यावी लागते. विमानतळ प्राधिकरणासाठी येथे काम करणे खूप आव्हानात्मक आहे.
Tags
नवल