पोलीस अधिकारी इसाक बागवान व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा किस्सा
"तुमचे नियम गेले चुलीत" असे सांगत बाळासाहेबांनी मुख्यमंत्री जोशीना निर्णय मागे घेण्याचा आदेश दिला होता
१९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीच सरकार आलं, मनोहर जोशी मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. रिमोट अर्थात बाळासाहेब ठाकरे यांच्या कडे होता.शिवसेनेचे जुने नेते छगन भुजबळ यांनी १९९१ साली शिवसेना सोडुन कॉंग्रेस मध्ये गेले असले तरी भुजबळ व शिवसेना वाद विकोपाला गेला होता.ेएकमेकाना वचपे काढणयाची संधी दोघेही शोधत असत.त्यावेळी छगन भुजबळ विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते होते.रमेश किणी प्रकरण व रमाबाई आंबेडकर नगर प्रकरणात भुजबळ यांनी शिवसेना सरकारचे वाभाडे काढले. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, शिवसेनेचा त्यांच्या वरील राग वाढत गेला होता. शिवसैनिक संधीची वाट बघत होते.जुलै १९९७. रविवारचा दिवस होता.छगन भुजबळांचा मुक्काम मंत्रालया समोरच्या अ-१० या शासकीय बंगल्यात होता. सकाळ सकाळी भुजबळांच्या घराबाहेर गर्दी गोळा होऊ लागली. घोषणाबाजी, गडबड सुरु झाली.आणि भुजबळांच्या बंगल्यावर हल्लाबोल करण्यात आला, खिडकीच्या काचा दगड फेकून तोडण्यात आल्या जमावाने भुजबळांच्या बंगल्यावर चाल केली. दरवाजा तोडून टाकला. दिसेल त्या वस्तूची तोडफोड करण्यास सुरवात केली.
छगन भुजबळ आपल्या बेडरूममध्ये होते. त्यांना शोधत काही लोक तिथवर येऊन ठेपले.मंत्रालयात ड्युटीवर एसीपी इसाक बागवान होते. कारवाई केली नाही तर हा जमाव आटोक्यात येत नाही हे स्पष्ट होते. पण मुख्यमंत्री कार्यालयातून हालचाल करू नका असा आदेश पोलिसांना आला होता.तर गृह मंत्री असलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी लागेल ते पाऊल उचला असा आदेश दिला. होता.काय करावे हे बागवानाना सुचत नव्हते,कोणाचा आदेश मानावा या द्विधा परिस्थितत त्यांनी अंतर्मनाचा आवाज एेकुन जमावावर लाठी चार्ज करून पळवून लावले. यामुळे छगन भुजबळ यांचे त्या दिवशी प्राण वाचले.गंभीर प्रसंग टळला.पण मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी इसाक बागवान व त्यांच्या सहकारी टीमवर आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवला व पोलीस दलातून निलंबित केलं
.गृहमंत्री गोपीनाथ मुंडे काही करू शकत नव्हते.जोशी व मुंडे एकमेकावर कुरघोडी करत होते.पण याचा फटका इसाक बागवान यांना बसला होता. त्यांनी संजय राऊत यांचे मार्फत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्री वर भेट घेऊन सत्य परिस्थिती कथन केली.ती घटना एेकताच शिवसेना प्रमुखानी ताबडतोब मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना फोन लावुन एका कर्तव्यदक्ष पोलीस आधिकारयावर झालेला अन्याय मी सहन करणार नाही,तुमचे नियम तिकडे चुलीत घाला असे जोशीना सुनावत,बागवान यांचे निंलबन २४ तासाच्या आत मागे घेण्यास आदेश दिला.
बाळासाहेबांचे हे शब्द ऐकताच इसाक बागवान यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले.राजकीय दृष्ट्या सोयीचं काय याचा विचार न करता खऱ्याच्या बाजूने उभे राहणारे, त्याच तडफेने जागच्याजागी निर्णय घेणारे बाळासाहेब ठाकरे त्यादिवशी त्यांना अनुभवायला मिळाले.यावेळी बाळासाहेबांनी बागवान यांची जात धर्म पाहिला नाही,पाहिला तो फक्त नि फक्त कर्तव्यदक्षपणा.त्यानंतर काही दिवसातच इसाक बागवान व त्यांच्या साथीदार अधिकाऱ्यांवरचे आरोप मागे घेऊन त्यांना सन्मानाने नोकरीवर रुजू करून घेण्यात आले.तर असा हा किस्सा बागवान यांनी आपल्या पुस्तकात नमुद केला आहे.
शब्दांकन- अनिल पाटील,पेठवडगाव
9890875498
Tags
बाळासाहेब ठाकरे