पुणे : या ठिकाणी म्हणे भुते आहेत
☬ पुण्यात अश्या अनेक जागा आहेत जिथे भुतांचा वावर आहे असे मानले जाते. ते किती खरे आणि किती खोटे आहे माहीत नाही. परंतु अनेक लोकांना या जागांवर अमानवीय अनुभव आल्याचे सांगितले जाते.
अशी काही ठिकाणी पहावुया
या पुलावरून रात्रीच्या अंधारात गाडी चालवणे कुठल्याही धाडसापेक्षा कमी नाही. या पुलाने अनेक दुर्दैवी मृत्यू पाहिले असून इथे काहीतरी असामान्य आहे यावर अनेक लोक विश्वास ठेवतात. कित्येकांनी पुलाच्या कठड्यावर भूत पाहिल्याचे छातीठोकपणे सांगितले आहे शक्यतो रात्री या पुलावरुन प्रवास करणे टाळले जाते. पुलाच्या थोडे पुढेच स्मशानभूमी असून त्यात सतराव्या शतकातील जुनी बांधकामे आहेत. एखाद्याच्या अंगावर काटा आणण्यासाठी हे भयावह वातावरणच पुरेसे असणार!
या वाड्याने राजकारणातून झालेल्या अनेक हत्या पाहिल्या आहेत. शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात असलेली ही वास्तू आपल्या पोटात इतिहासातील अनेक रहस्य बाळगून आहे. इथे अनेकांना अमानवीय आवाज, कुजबुज, किंचाळ्या ऐकू आल्या आहेत.
कित्येक जणांनी वाड्यात एका तरुणाचा आत्मा फिरतो असा अनुभव आल्याचे सांगितले आहे. आसपासच्या स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार पौर्णिमेच्या रात्री काका मला वाचवा’ अश्या किंकाळ्या ऐकू येतात. नमूद करण्यासारखी गोष्ट अशी की, नारायणराव पेशवे यांचा खून पौर्णिमेच्या रात्रीच झाला होता.
त्यानंतरही विषबाधेतून अनेक जणांचा मृत्यू या वाड्यात झाला आहे. आतल्या लोकांसह पूर्ण वाडा जाळला गेला तेव्हापासून इथे फक्त अवशेष शिल्लक आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने संध्याकाळी साडे सहा नंतर वाड्यात प्रवेश करण्यास मनाई केली आहे हे विशेष.
असं म्हणतात की, या बंगल्यात एका तरुण स्त्रीला जाळून मारले होते. त्या स्त्रीच्या भुताने संतापून या बंगल्यावर कब्जा केला. रात्रीच्या वेळी या बंगल्यातून भयानक किंकाळ्या येतात हे अनेकांनी ऐकले आहे म्हणतात.
काही धाडसी लोकांनी या बंगल्याच्या आवारात प्रवेश केला पण त्यांना अचानक वातावरणात झालेले बदल अनुभवास आले. बर्फ पडत असल्यासारखी थंडी जाणवली. काहीजणांच्या म्हणण्यानुसार इथले जुने फर्निचर, दारे, खिडक्या एका लयीत संथ आवाज करत वाजत राहतात जणू त्यांना कुणीतरी मुद्दाम वाजवत आहे.
अजूनही चालू स्थितीत असले तरी काहीजण इथे सिनेमा पाहायला जाण्याऐवजी इथल्या भयावह वातावरणाचा अनुभव घ्यायला जातात. जवळपासच्या लोकांच्या अनुभवानुसार, दिवसभर इथे कितीही वर्दळ असली तरी रात्री मात्र शांतता पसरते.
दिवसाच्या शोला काही अनुभव येत नाहीत पण रात्रीच्या शोला मात्र हमखास वेगळे अनुभव येतात. खुर्च्या आपोआप हलणे, प्रेक्षकांच्या कानात भीतीदायक कुजबुज होणे, भयानक किंचाळी ऐकू येणे इत्यादी प्रकार इथे घडतात असे सांगितले जाते.
इथल्या लोकांच्या सांगण्यानुसार या छोट्या मुलीचा काही वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झालेला आहे. ही बांधकाम मजुराची मुलगी आपल्या बाहुलीसोबत खेळत असताना अचानक उंचावरून खाली पडून मृत्युमुखी पडली.तेव्हापासून तिचे भूत या परिसरात भटकत आहे असे म्हणतात.रात्री बाराच्या ठोक्याला या मुलीचा रस्त्यावर वावर सुरू होतो. ही मुलगी कुणाला काही त्रास देत नाही. परंतु पांढऱ्या फ्रॉकवर रक्ताचे डाग घेऊन तुमच्याकडे किंचाळत येते आणि अचानक गायब होते. एवढे तुम्हाला अटॅक आणण्यासाठी पुरेसे आहे!
शनिवारी रात्री इथले वातावरण अगदी चिडीचूप्प असते. कारण त्या रात्री इथे राज्य करते एका लाल साडीवाल्या बाईचे भूत. ही लाल साडी नेसलेली स्त्री रात्रभर कॉरिडॉर मधून इकडे तिकडे फिरत असते असे सांगतात.
कधी कधी ती बेडच्या बाजूला उभी असल्याचे क्षणभर दिसते तर कधी बाथरूममध्ये सुद्धा असल्याचा भास होतो. विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार हे भूत कुणाला त्रास देत नाही मात्र तिचा चेहरा उदास असतो आणि ती काहीतरी शोधत असते.
रात्रीच्या शांततेत तिच्या पैंजणाचा आवाज आला की भले भले धाडसी लोक डोक्यावर पांघरूण घेऊन गुपचूप पडून राहतात. एक अशीही वदंता आहे की, होस्टेलच्या मूळ मालकांची ही प्रथम पत्नी असून तिचा खून झाल्यामुळे ती बदला घेण्यासाठी नवऱ्याचा शोध घेत फिरते.
या जागांशीवाय पुण्यामध्ये आणखी काही जागा अश्या आहेत जिथे भुतांचा वावर असल्याचे मानले जाते. सिंहगड किल्ला, खडकी कब्रस्तान, कॅम्प एरिया, हलीमा बेगम उर्दू शाळा इत्यादी.
या लेखाचा उद्देश अंधश्रद्धा पसरवणे अथवा भीती घालणे नसून फक्त माहिती देणे हा आहे. या वरील गोष्टींमध्ये कितपत तथ्य आहे हे जाणकारच सांगू शकतील.
खरे खोटे देव जाणे.