शिवसेनेचा जबरदस्त फॅन : मारूती यादव

  शिवसेनेचा जबरदस्त फॅन : मारूती यादव  

🚩 मोहन यादव यांच्या मुलांचीही नावे राज आणि उद्धव.

🚩 बाळासाहेबांच्या प्रत्येक सभेला उपस्थिती
दि. २२ मार्च २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3c5VJqY
             मोहन यादव हे पुणे महापालिकेत वॉचमन म्हणून काम करत होते. पण शिवसेनेचे काम करतो म्हणून आपल्याला आणि आपल्या मुलाला कामावरुन काढून टाकल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यानंतर छोटी-मोठी कामे करुन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.
🚩 मोहन यादव उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या सभेला मोटरसायकल वरून गेले होते.

शिवसेनेचा जबरदस्त फॅन : मारूती यादव


मोहन यादव यांची बाईकही भगव्या रंगाची आहे. त्यावर केशरी रंगाची फुलं लावल्याने अधिक उठाव आला आहे. बाईकवरही त्यांनी विविध घोषणा लिहिल्या आहेत.
🚩विशेष म्हणजे, या दौऱ्यासाठी मोहन यादव स्वतः वीस हजार रुपयांची पदरमोड करुन अयोध्येत गेले होते कार्यकर्ते आपल्या नेत्यावर जीवापाड प्रेम करतात, याची उदाहणं आपण देशभरात अनेकदा पाहतो. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनाही शिवसैनिकांचं असंच प्रेम मिळालं होतं.मोहन यादव हा पुणे जिल्हातील दौंड तालुक्यातला रहिवासी आणि हाडाचा शिवसैनिक.यादवांच्या पायाच्या नखापासून डोक्यातील टोपीपर्यंत सर्व काही भगवं आहे  मोहन यादव यांचं शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावरील प्रेम एवढं की त्यांनी आपल्या मुलांचीही नावं उद्धव आणि राज असं ठेवलं आहे.
पण प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्त्यांची जी अवस्था असते तीच मोहन यादव यांचीही आहे. कारण त्यांच्या वाट्याला आजवर पक्षाकडून केवळ उपेक्षाच आली.
________________________________
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
⛱ माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  ⛱    
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.           爪卂卄丨ㄒ

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম